(Source: Poll of Polls)
Indian Cinema Biggest Murder Mystery Film: 60 वर्षांपूर्वीची बॉलिवूडची सर्वात मोठी मर्डर मिस्ट्री, बेटावर अडकलेले 8 जण अन् काळजाचा थरकाप उडवणारा क्लायमॅक्स; पाहिलाय का?
Indian Cinema Biggest Murder Mystery Film: 1965 मध्ये 'गुमनाम' सिनेमा प्रदर्शित झाला आणि हिंदी सिनेसृष्टीचा चेहरा-मोहराच बदलूव गेला. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजा नवाथे यांनी केलं होतं.

Indian Cinema Biggest Murder Mystery Film: भारतीय सिनेमांचा इतिहास खूप मोठा आहे. सिनेसृष्टीत फार पूर्वीपासूनच सस्पेन्स-थ्रीलर चित्रपटांची क्रेझ आहे. अशातच आता ओटीटीनं मर्डर मिस्ट्री आणि सस्पेन्स थ्रीलरचा जणू वसाच घेतला आहे. कित्येक वर्षापासून अनेक सस्पेन्स-थ्रीलर सिनेमे रिलीज होत आहेत. बॉलिवूड असो वा साऊथ दोन्ही इंडस्ट्रीमध्ये सस्पेन्स-थ्रीलर मूव्हीची चलती आहे. पण, आज आम्ही तुम्हाला एका 60 वर्षांपूर्वीच्या हिंदी मर्डर मिस्ट्रीबाबत सांगणार आहोत. जो बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाला हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सस्पेन्स थ्रिलर मर्डर मिस्ट्री चित्रपटाचा टॅग मिळाला आहे. आजकालचे सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आणि वेब-सिरीज या चित्रपटासमोर फिके पडतात. तुम्ही पाहिलाय का हा 60 वर्षांपूर्वीची सस्पेन्स-थ्रीलर चित्रपट?
1965 मध्ये 'गुमनाम' सिनेमा प्रदर्शित झाला आणि हिंदी सिनेसृष्टीचा चेहरा-मोहराच बदलूव गेला. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजा नवाथे यांनी केलं होतं. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता, ज्यामध्ये मनोज कुमार, नंदा, प्राण, हेलन, मेहमूद, तरुण बोस, मदन पुरी, मनमोहन आणि धुमल सारखे स्टार्स दिसले होते. या चित्रपटातील 'हम काले हैं, तो क्या हुआ दिलवाले हैं' हे गाणं आजही लोकांच्या ओठांवर आहे. चित्रपटाची कथा आणि त्याचा सस्पेन्स आजही प्रेक्षकांना रोमांचित करतो. 'गुमनाम' मध्ये मनोज कुमार यांनी एका पोलिसाची भूमिका साकारली होती, जे चित्रपटात एका खुन्याचा शोध घेत असतात.
चित्रपटाची कहाणी काय?
चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर, ती एका बेटावर अडकलेल्या 8 लोकांभोवती फिरते. अशा परिस्थितीत, ते सर्वजण एका हवेलीत पोहोचतात, जिथे एक संशयास्पद व्यक्ती आधीच उपस्थित असते. यानंतर, हवेलीतील या 8 लोकांपैकी काहींची हत्या केली जाते. पण, चित्रपटाच्या शेवटपर्यंत कोणालाही माहिती नाही की, हे खून का होत आहेत? आणि कोण करतंय? चित्रपटाचा क्लायमॅक्स इतका भावनिक आहे की, तुम्हाला पुन्हा-पुन्हा हा चित्रपट पाहावासा वाटेल. त्यावेळी 'गुमनाम' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 2.6 कोटी रुपये कमावले होते. आयएमडीबीनं या चित्रपटाला 10 पैकी 6.9 रेटिंग दिलं आहे. जर तुम्ही मर्डर मिस्ट्री चित्रपटांचे चाहते असाल, तर तुम्ही गुमनाम हा चित्रपट पाहू शकता.



















