Mukesh Khanna Slams Ranveer Allahbadia: थोबाड काळं करुन गाढवावरुन धिंड काढा..; ज्येष्ठ अभिनेत्यानं रणवीर अलाहाबादियाला फटकारलं
Mukesh Khanna Slams Ranveer Allahbadia: नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर रणवीरनं एक व्हिडीओ शेअर करत माफी मागितली. अशातच त्याच्यावर चोहीकडून टीकेची राळ उठली आहे.

Mukesh Khanna Slams Ranveer Allahbadia: समय रैनाच्या (Samay Raina) 'इंडियाज गॉट लेटेंट' (Indias Got Latent) शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं (Ranveer Allahbadia) केलेल्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला. बिअर बायसेप्स (Beer Biceps) म्हणून ओळखल्या जाणारा युट्यूबर रणवीर अलाहाबादियानं एका स्पर्धकाला आई-वडिलांबाबत अश्लील प्रश्न विचारला. रणवीरनं त्याला विचारलं की, तुला तुझ्या आई-वडिलांना आयुष्यभर इंटिमेट होताना पाहायचंय की, एखाद्या वेळी तरी त्यांच्यासोबत सहभागी व्हायला आवडेल? रणवीरनं हा प्रश्न विचारताच एकच गोंधळ उडाला. नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर रणवीरनं एक व्हिडीओ शेअर करत माफी मागितली. अशातच त्याच्यावर चोहीकडून टीकेची राळ उठली आहे. आता ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनीही याप्रकरणी आपली तिखट टिप्पणी दिली आहे.
अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी रणवीर अलाहबादिया तसेच असे शो/कंटेंट पाहणाऱ्या लोकांवर टीका केली. मुकेश खन्ना म्हणाले की, "लोक हे पाहत आहेत आणि म्हणूनच युट्यूबर्स पैसे कमवत आहेत. अशा परिस्थितीत, रणवीर जे म्हणाला, ते सर्वांना आवडलेलं नाही, हे खरं नाही. काही लोकांना ते आवडलं. हे YouTubers चुकीच्या दिशेने जात आहेत आणि त्यांना वाटतं की, जास्त व्ह्यूज म्हणजे, जास्त लोकप्रियता आणि पैसा. तर, ते पुढे जात आहेत. आशयाच्या चुकीच्या बाजूनं, या लोकांना भाषेचं ज्ञान नाही आणि त्यांना माहीत आहे की, नकारात्मक गोष्टी जास्त विकल्या जातात."
मुकेश खन्ना यांची रणवीर अलाहाबादियावर आगपाखड
याव्यतिरिक्त मुकेश खन्ना यांनी आपल्या पोस्टमध्ये रणवीर अलाहाबादियावर टिका-टिप्पणी केली आणि दावा केला की, अशा व्यक्तींना मारहाण केली पाहिजे. अभिनेते म्हणाले की, मला असं वाटतं की, या लोकांना धरुन मारलं पाहिजे, जेणेकरुन यांना वाईट वाटेल. अश्लीलतेचेही दर्शक आहेत, त्यामुळे तुम्ही तिथे जायला हवं आणि सांगावं की, माझा प्लॅटफॉर्म अश्लील आहे. , रणवीर अलाहाबादिया सारख्या यशस्वी युट्यूबरनं इंडियाज गॉट लेटेंट नावाच्या शोमध्ये असं भयानक वक्तव्य केलं हे दुःखद आहे. संपूर्ण देश यावर संतापला आहे.
अशा लोकांना काय शिक्षा असावी?
त्यांनी पुढे लिहिलं की, "आज आपल्या देशातील तरुण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या शक्तीचा गैरवापर करत आहेत. ही मर्यादा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. हा एक गंभीर गुन्हा आहे. हे प्रकरण हलक्यात घेऊ नये. भविष्यात अशी हलक्या दर्जाची आणि बेजबाबदार विधानं करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा लोकांसाठी माझ्याकडे एक शिक्षा आहे. त्यांचं थोबाड काळ करुन टाका आणि त्याला गाढवावर बसवून शहरात धिंड काढा.
शक्तिमानानं काय केलं असतं?
मुकेश खन्ना यांनी रणवीर अलाहाबादिया सारख्या लोकांसोबत काय करणार याबद्दल एक वक्तव्य देखील केलं आहे. ते म्हणाले की, "जर मी खरोखरच शक्तिशाली असतो, तर मी त्याला उचलून अवकाशात फेकून दिलं असतं. त्यांनी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. ते चुकीचं काम करत आहेत."
पाहा व्हिडीओ : Ranveer Allahbadia | रणबीर अलाहबादीयाविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून FIR
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Ranveer Allahbadia च्या वैयक्तिक आयुष्यातही वादळ, वादग्रस्त वक्तव्यानंतर गर्लफ्रेंडनंही केलं ब्रेकअप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
