सिनेरसिकांची प्रतिक्षा संपली! IFFI 2024 महोत्सवाचा पडदा उघडला, किती मराठी कलाकृतींचा समावेश?
गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर मराठी कलाकृतींना व्यासपीठ मिळण्यासाठी इफ्फी या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट, वेबसिरिजची निवड करण्यात येते.
IFFI 2024: सिनेरसीक ज्या चित्रपट मोहोत्सवाची आतुरतेनं वाट पाहत असणारा आणि जागतिक स्तरावर नावाजला जाणारा इंटरनॅशल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबरपासून गोव्यात पणजी येथे सुरू होत आहे. यंदाचा हा 55 वा चित्रपट महोत्सव 28 तारखेपर्यंत चालणार आहे. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात गेल्या काही वर्षांपासून पाच ते सहा मराठी चित्रपटांची निवड केली जाते. पण यंदा कथाबाह्य विभागात ४ चित्रपटांना स्थान मिळणार आहे. यात निपूण धर्माधिकारीच्या लंपन या वेबसिरिजचाही समावेश आहे.
28 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार IFFI 2024
इफ्फी चित्रपट महोत्सव येत्या २० नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणार असून गोव्यातील पणजीमध्ये इफ्फीच्या ५५ वा चित्रपट महोत्सव २८ तारखेपर्यंत सुरु असणार आहे. मायकल ग्रेसी यांच्या ‘बेटर मॅन’ या चित्रपटाने या महोत्सवाचा पडदा उघडणार असून, इंडियन पॅनोरमा विभागात रणदीप हुड्डा अभिनित व दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर हा उद्घाटनाचा चित्रपट असणार आहे. इफ्फीमध्ये यंदा 101 देशांमधून सादर झालेले असून 180 हून अधिक चित्रपट या महोत्सवात सादर होणार आहेत.
किती मराठी चित्रपटांचा समावेश?
गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर मराठी कलाकृतींना व्यासपीठ मिळण्यासाठी इफ्फी या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट, वेबसिरिजची निवड करण्यात येते. मागील दोन तीन वर्षांपासून मराठी चित्रपटांनी यातून चांगलं नाव कमावलंय. यंदा चार मराठी चित्रपटांची इफ्फीसाठी निवड करण्यात आली आहे. यात ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘तेरवं’, ‘विषय हार्ड’ आणि ‘छबिला’ या चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. वेबसिरिज विभागात निपूण धर्माधिकारी या दिग्दर्शकाची लंपन ही वेबसिरिजही दाखवण्यात येणार आहे. यात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या मालिकेला १० लाख रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जातं.
ओटीटीवरील या वेबसिरिजला नामांकन
इफ्फीत दाखवल्या जाणाऱ्या वेबसिरिजमध्ये सर्वोत्कृष्ट वेबमालिकांमध्ये ओटीटी विभागालाही प्राधान्य देण्यात येतं. यात पुरस्कारासाठी आलेल्या अर्जांमध्ये नेटफ्लिक्सवरील कोटा फॅक्टरी, काला पानी या दोन वेबमालिका आहेत. सोनी लिव्हवर प्रसारित करण्यात आलेली मराठी वेबसिरिज लंपन आणि झी 5 वरील अयाली तर प्राईमवरील ज्युबली ही वेबसिरिजला नामांकन देण्यात आलं आहे.
नव्या कलाकारांच्या या चित्रपटांचा समावेश
नव्या कलाकारांना संधी देण्यासाठी इफ्फी चित्रपट महोत्सवात वर्क इन प्रोग्रेस विभागासाठीही एका मराठी चित्रपटाचा समावेश करण्यात आलाय. यात सिद्धार्थ बादी यांचा ‘उमल’ आहे. शक्तीधर बीर यांचा गांगशलिक रिव्हर बर्ड, मोहन कुमार यांचा येरा मांडरम अशा काही चित्रपटांचाही समावेश आहे.