Housefull 5 Nana Patekar : Housefull 5 मध्ये 'इन्स्पेक्टर दगडू'च्या भूमिका नाना पाटेकरांसाठी कधीच नव्हती; 200 ब्लॉकबस्ट फिल्म्स करणाऱ्या सुपरस्टारला मिळालेली ऑफर
Housefull 5 Nana Patekar : तुम्हाला माहीत आहे का? 'हाऊसफुल 5'मध्ये इन्स्पेक्टर दगडूच्या भूमिकेसाठी नाना पाटेकर दिग्दर्शकांची पहिली पसंत कधीच नव्हते, त्यांच्या आधी ही भूमिका दुसऱ्या एका सुपरस्टारला ऑफर करण्यात आली होती.

Housefull 5 Nana Patekar : 'हाऊसफुल 5' (Housefull 5) मध्ये पहिल्यांदाच 17 स्टार्सनी एकत्र काम केलंय. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) नाना पाटेकर (Nana Patekar) देखील या चित्रपटात आहेत. नाना पाटेकरांनी सिनियर इन्स्पेक्टर दगडूची (Senior Inspector Dagdu) भूमिका साकारली आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? ही भूमिका पहिल्यांदा दुसऱ्या सुपरस्टारला ऑफर करण्यात आली होती, पण त्यानं ही भूमिका नाकारली आणि त्यानंतर प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ही भूमिका नाना पाटेकरांच्या पदरात पडली.
'हाऊसफुल 5' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करतोय. कॉमेडी फ्रेंचायझीच्या या पाचव्या भागासह, निर्मात्यांनी प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले. 'हाऊसफुल 5' हा चित्रपट केवळ लोकांना हसवत नाही तर चित्रपटात खूप सस्पेन्सही दडला आहे. या चित्रपटात डबल क्लायमॅक्स आहे, जो 5A आणि 5B वर्जन अशा दोन वेगवेगळ्या भागांत प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाच्या कथेपेक्षा या कॉमेडी फ्रँचायझीचा आकर्षणबिंदू या चित्रपटाची स्टारकास्ट. 17 स्टार्सनी एका यशस्वी फ्रँचायझीमध्ये एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि सर्वांना पूर्ण स्क्रीन स्पेस मिळाली आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त, ट्रेलरमध्ये नाना पाटेकरला पाहून चाहते उत्सुक झाले होते. त्यांनी चित्रपटात सिनियर इन्स्पेक्टर 'दगडू' ची भूमिका साकारली आहे, जी लोकांना खूप आवडली. पण, तुम्हाला माहीत आहे का? नाना पाटेकर या भूमिकेसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंत कधीच नव्हते, त्यांच्या आधी ही भूमिका दुसऱ्या एका सुपरस्टारला ऑफर करण्यात आली होती.
View this post on Instagram
1054 कोटी कमावणाऱ्या 'या' अभिनेत्याला मिळालेली ऑफर
नाना पाटेकर अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' चित्रपटात होते, पण साजिद नाडियाडवाला यांच्या मनात इन्स्पेक्टर 'दगडू'च्या भूमिकेसाठी एका वेगळ्यात सुपरस्टारचं नाव होतं. सर्वात आधी हा रोल त्या सुपरस्टारला ऑफर करण्यात आला. तर, नाना पाटेकर यांना संजय दत्त यांच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं आणि इन्स्पेक्टर 'दगडू'च्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांची निवड केली होती.
बॉलिवूड हंगामानं दिलेल्या वृत्तानुसार, साजिद नाडियाडवाला यांनी सर्वात आधी संजय दत्त आणि जॅकी श्रॉफची भूमिका अनिल कपूरला ऑफर केली होती. त्यांना उदय आणि मजनूची जोडी पुन्हा एकदा चित्रपटात साकारायची होती. दोघांनीही 'वेलकम' आणि 'वेलकम बॅक' सारखे चित्रपट एकत्र केलेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल कपूर यांनी 'हाऊसफुल 5'साठी नकार दिला, त्यानंतर ती भूमिका संजय-जॅकीनं साकारली.
'हाऊसफुल 5'ला अमिताभ बच्चन यांचा स्पष्ट नकार
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा साजिद नाडियाडवाला यांनी 80 वर्षीय अमिताभ बच्चन यांना इन्स्पेक्टर 'दगडू'च्या भूमिकेसाठी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी नम्रपणे ही भूमिका नाकारली. असं सांगितलं जातं की, अमिताभ बच्चन आजही आपल्या भूमिकांबाबत खूप निवडक आहेत.
'हाऊसफुल 5'च्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चार दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दुसरीकडे, हा चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची तयारी करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























