Sitaare Zameen Par Director R S Prasanna Interview: आमिर खानचा 'सितारे जमिन पर' थिएटरमध्ये जाऊन का पाहावा? 'ही' 5 मोठी कारणं; दिग्दर्शकांनी सगळंच सांगितलं
Sitaare Zameen Par Director R S Prasanna Interview: 'सितारे जमीन पर'चे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांनी फिल्मबाबत 5 मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला या फिल्म्स पाहाव्याच लागतील.

Sitaare Zameen Par Director R S Prasanna Interview: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सध्याच्या त्याचा आगामी सिनेमा 'सितारे जमीन पर'मुळे (Sitaare Zameen Par) चर्चेत आहे. आमिरचा बहुचर्चित सिनेमाचं दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना (RS Prasanna) यांनी केलं आहे. तसं पाहायला गेलं तर, दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना हे काही बॉलिवूडमध्ये (Bollywood News) नवे नाहीत. त्यांनी 2017 मध्ये 'शुभ मंगल सावधान' बनवलेला. तसेच त्यांनी 'कल्याण समयल साधम' नावाच्या तमिळ चित्रपटातून पदार्पण करत अद्भूत शैली दाखवली होती. अशातच आता त्यांनी 'सितारे जमीन पर'चं दिग्दर्शन केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केलेला आयुष्मान खुरानाचा 'शुभ मंगल सावधान' हा तमिळ सिनेमा 'कल्याण समयल साधम' चा रिमेक होता. या चित्रपटांचा विषय 'इरेक्टाइल डिसफंक्शन'वर आधारित होता. अशा विषयावर भारतात बनवलेले हे पहिले चित्रपट होते. वेगळ्या धाटणीचे सिनेमे तयार करण्यात आर.एस. प्रसन्ना यांचा हात कुणी धरू शकत नाही.
आता ते 'सितारे जमीन पर' घेऊन येत आहेत आणि चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर कळतंय की, यावेळीही त्यांच्या चित्रपटाचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. चित्रपटात डाऊन सिंड्रोमनं ग्रस्त मुलांची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, त्यांना चित्रपटात आमिर खानचा पाठिंबा मिळाला आहे, जो वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न उपस्थित करणारे चित्रपट बनवत आहे.
THE WAIT IS OVER! 🥳🥳🥳
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) June 19, 2025
Book your tickets now.
🔗 - https ://linktr.ee/SZPTickets#SitaareZameenPar In Theatres - 20th June.@geneliad @r_s_prasanna @DivyNidhiSharma @aparna1502 @AroushDatta #GopiKrishnanVarma #VedantSharmaa #NamanMisra #RishiShahani #RishabhJain… pic.twitter.com/ouIjpK7F8w
'सितारे जमीन पर'बद्दल काय म्हणाले दिग्दर्शक प्रसन्ना?
दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांनी एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना चित्रपटाबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी काही गोष्टी देखील सांगितल्या आहेत, ज्या तुम्ही आतापर्यंत ऐकल्या नसतील. यामध्ये आमिर खानसोबत काम करणं आणि चित्रपटात मुलांच्या अभिनयाशी संबंधित मनोरंजक गोष्टींचा समावेश आहे. त्यांच्या या गोष्टी फक्त शब्द नाहीत, तर ती 5 कारणं आहेत ज्यामुळे तुम्ही हा चित्रपट पाहण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.
तुम्ही 'सितारे जमीन पर' मध्ये का सामील झालात?
दिग्दर्शक प्रसन्ना यांनी आर. के. नारायण आणि प्रेमचंद यांच्यासह अनेक लेखकांचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की, त्यांच्या कथा थेट काळजाला भिडतात. म्हणूनच मी या चित्रपटात सामील झालो कारण ही कथा लोकांना जोडणारी आणि त्यांचं मनोरंजन करणारी आहे. या चित्रपटात एक मानवी भाव आहे, जो हृदयाला स्पर्श करणारा आहे.
आर. एस. प्रसन्ना यांनी आमिर खानबद्दल काय म्हटलं?
गेल्या अनेक वर्षांतली आमिर खान आणि प्रसन्ना यांची जोडी अशी पहिली जोडी आहे, ज्यामध्ये दिग्दर्शक आणि अभिनेता एकसारखेच आहेत, कारण ते वेगवेगळे आणि काळजाला भिडणारे विषय निवडतात. जेव्हा आम्ही त्यांच्याशी याबद्दल बोललो, त्यावेळी त्यांनी आमिर खानबद्दल एका छोट्या ओळीत फार मोठा अर्थ असणारं उत्तर दिलं. ते म्हणाले की, "खरं तर मी आमिर सरांकडून खूप काही शिकलोय. खरं सांगायचं तर, ते मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे प्रिंसिपल आहेत."
आमिर खानसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
आर.एस. प्रसन्ना म्हणाले की, "आमिर सरांसोबत काम करायला खूप मजा आली, तो कोणत्याही दिग्दर्शकासाठी स्वप्नातील अभिनेता आहे." मिस्टर परफेक्शनिस्ट कामाबद्दल खूप गंभीर आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात प्रसन्ना म्हणतात, "मिस्टर परफेक्शनिस्ट हे फारसं योग्य डिस्क्रिप्शन नाही. खरं तर याचा अर्थ असा की, आमिर खान जादू शोधतो, म्हणून त्याच्यासोबत खूप मजा येते आणि तो कामाबाबत खूप कमिटेड आहे."
त्यांनी पुढे सांगितलं की, तो खूप गंभीर आहे हा गैरसमज आहे, खरं तर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खूप मैत्रीपूर्ण आणि मजेदार वातावरण होतं, अगदी ट्रेलरमध्ये दिसत असल्यासारखं.
'सितारे जमीन पर' हा केवळ एक सिक्वेल नाही तर एक स्प्रिचुअल सिक्वेल आहे, का?
जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की, या चित्रपटाला 'तारे जमीन पर'चा स्प्रिचुअल सीक्वेल का म्हटलं जातं? तर दिग्दर्शक प्रसन्ना म्हणाले, "कथा, पात्रं बदलल्यानंतरही, जे बदललं नाही ते म्हणजे आत्मा." या चित्रपटाचा आत्मा 2007 च्या 'तारे जमीन पर' सारखाच आहे. हा चित्रपटही त्याच भावनेनं पुढे जातो, म्हणूनच हा एक आध्यात्मिक सीक्वेल आहे.' ते म्हणाले की, या चित्रपटात आम्ही जुन्या चित्रपटाप्रमाणेच भेदभावावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
'सितारे जमीन पर' बद्दल घरी दिग्दर्शक प्रसन्ना यांना काय सांगितलं?
शेवटी, दिग्दर्शकानं त्यांच्या पत्नीसोबत चित्रपटाशी संबंधित एक अतिशय मनोरंजक संभाषण देखील शेअर केलं. त्यांनी सांगितलं की "माझ्या पत्नीनं मला सांगितलं की, प्रत्यक्षात हा फक्त एक चित्रपट नाही, तर चित्रपटातील 'स्टार्स' कडून तुम्हाला मिळणारी ऊर्जा आहे."
त्यांच्या पत्नीनं असंही म्हटलं की, "चित्रपटात तुमच्यासोबत काम करणारे स्टार, खरं तर ही त्यांची ऊर्जा आहे आणि तुम्हाला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतंय." दिग्दर्शक या चित्रपटात काम करणाऱ्या डाऊन सिंड्रोमनं ग्रस्त असलेल्या मुलांसाठी 'स्टार्स' हा शब्द वापरत होते."
दरम्यान, 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक प्रसन्ना यांचा हा चित्रपट आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसनं तयार केला आहे. आमिर खान आणि जेनेलिया डिसूझा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























