एक्स्प्लोर

Hindi OTT Web Series : हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण

Hindi OTT Web Series Marathi Actress : ओटीटीवर रिलीज होणाऱ्या 'कमांडर करण सक्सेना' या वेब सीरिजमध्ये हृता दुर्गुळेसोबत आणखी एक मराठी अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करत आहे.

Hindi OTT Web Series Marathi Actress : मराठी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप सोडणारी आणि 'महाराष्ट्राची क्रश' ओळखली जाणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही आता हिंदी वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करत आहे. ओटीटीवर रिलीज होणाऱ्या 'कमांडर करण सक्सेना' (Commander Karan Saxena) या वेब सीरिजमध्ये हृता दुर्गुळेसोबत आणखी एक मराठी अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करत आहे. टीआरपीमध्ये आघाडीवर असणारी 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) हिंदी वेब सीरिज मध्ये झळकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने निरोप घेतला होता. 

'स्टार प्रवाह' वाहिनीवर ठिपक्यांची रांगोळी ही मालिका चांगलीच लोकप्रिय होती. या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकरने अप्पू ही व्यक्तीरेखा साकारली होती. मालिकेतील अप्पू आणि शंशाक या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले होते. आता ज्ञानदा रामतीर्थकर ही 'कमांडर करण सक्सेना'मध्ये भूमिका साकारणार आहे. 

सोशल मीडियावर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.  ज्ञानदा रामतीर्थकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,  'कमांडर करण सक्सेना' या वेब सीरिजमध्ये मी मिली ही व्यक्तीरेखा साकारत आहे. माझी ही पहिली हिंदी वेब सीरिज असल्याचे तिने सांगितले. या हिंदी वेब सीरिजमधील संधीसाठी ज्ञानदाने दिग्दर्शक जतीन वागळे यांचे आभार मानले आहे. 

 गुरमीत चौधरी हा या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 8 जुलैपासून ही वेब सीरिज 'डिस्ने हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by द मराठी सोशल | digital creator (@themarathisocialofficial)

हृता झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे ही तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या भूमिकेतला एक फोटो पोस्ट केला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by Hruta Durgule (@hruta12)

‘फुलपाखरू’ मालिकेमुळे हृता दुर्गुळे ही  घराघरात पोहचली. तर,  ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. 'अनन्या', 'टाईमपास 3', 'कन्नी', 'सर्किट' या चित्रपटातून ती झळकली. मराठी छोटा पडदा आणि  वेब सीरिजमध्ये कमाल दाखवल्यानंतर हृता आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. हृता आता 'कमांडर करण सक्सेना' या वेबसीरिज मधून ओटीटी विश्वात आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीमध्ये झळकणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget