Henry Silva Dies At 95: ‘ओशन इलेव्हन’ फेम हॉलिवूड स्टार हेन्री सिल्वा यांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Henry Silva Dies At 95: हॉलिवूड चित्रपटांमध्ये हेन्री यांनी नेहमीच गँगस्टर आणि खलनायकाची प्रत्येक पात्रे खूप छान वठवली.
Henry Silva Dies At 95: ‘ओशन्स इलेव्हन’ (Oceans eleven) आणि ‘द मंचुरियन कँडीडेट’ (The Manchurian Candidate) यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते हेन्री सिल्वा (Henry Silva) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 95 वर्षांचे होते. हॉलिवूड चित्रपटांमध्ये हेन्री यांनी नेहमीच गँगस्टर आणि खलनायकाची प्रत्येक पात्रे खूप छान वठवली. हेन्री यांना वाढत्या वयातील आजारांमुळे मोशन पिक्चर्स अँड टेलिव्हिजन कंट्री हाऊस अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हेन्रीचा मुलगा स्कॉट सिल्वा याने त्यांच्या मृत्यूची दुखःद बातमी चाहत्यांना दिली.
अभिनेते हेन्री सिल्वा (Henry Silva) हे हॉलिवूडमधील अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांचे आवडते ‘खलनायक’ होते. सिल्वा यांनी ‘सिनात्रा’सोबत इतर अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला.
खलनायिकी वातावरण गेले बालपण
हेन्री सिल्वा (Henry Silva) यांचा जन्म 1926 मध्ये ब्रुकलिन येथे झाला होता. एक खतरनाक खलनायक बनण्यास मदत करणाऱ्या वातावरणातच त्यांचे संगोपन झाले. हेन्री यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘ब्रॉडवे अँड लेटर’पासून केली होती. 90 च्या दशकाच्या अखेरीस त्यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आल्फ्रेड हिचकॉकच्या प्रेझेंट आणि सस्पिशियसमधील हेन्री यांनी साकारलेल्या पात्राने त्यांच्या कारकिर्दीला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवले. हेन्री यांनी 'द ओरिजिनल ओशन इलेव्हन' मध्ये रॉबरी गँगच्या सदस्याची भूमिका केली होती. 'डॅडी ओशन'च्या रिमेकमध्ये हेन्री यांचा कॅमिओ होता. हेन्री यांची कारकीर्द 1970 च्या दशकात सुरू झाली होती. त्याकाळात हेन्री प्रचंड चर्चेत होते.
निगेटिव्ह भूमिकाच खूप गाजल्या!
हेन्री यांनी 1963मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉनी कूल’ चित्रपटामध्ये मारेकऱ्याची भूमिका साकारली होती. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या बर्ट रेनॉल्ड्सच्या शार्किस मशीनमध्ये ड्रग व्यसनी, तर 1998च्या ‘द लॉ’ चित्रपटात भ्रष्ट सीआयएची अधिकाऱ्याची भूमिका केली होती. याव्यतिरिक्त, हेन्री यांनी ‘सुपरमॅन’ आणि ‘बॅटमॅन’मधील खलनायक बेन याला आवाज दिला होता. हेन्री (Henry Silva) यांनी स्वःत एकदा सांगितले होते की, त्यांनी आजपर्यंत कोणतेही पात्र पुन्हा रिपीट केले नव्हते.
हेही वाचा :