एक्स्प्लोर

Harmonium Player Seema Shirodkar Passes Away: संगीत मैफलीतील सुरेल साथसंगत हरपली; सुप्रसिद्ध हार्मोनियमवादक सीमा शिरोडकर काळाच्या पडद्याआड

Harmonium Player Seema Shirodkar Passes Away: प्रसिद्ध हार्मोनियमवादक सीमा शिरोडकर यांचं हृदयविकारानं निधन झालं. त्या 60 वर्षांच्या होत्या.

Harmonium Player Seema Shirodkar Passes Away: प्रसिद्ध हार्मोनियमवादक (Harmonium Player) सीमा शिरोडकर (Seema Shirodkar) यांचं सोमवारी अबुधाबी इथे हृदयविकारानं निधन झालं. त्या 60 वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्यानं संगीत मैफलीतील सुरेल साथसंगत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रसिद्ध तबलावादक पंडित विश्वनाथ शिरोडकर (Pandit Vishwanath) यांच्या त्या पत्नी. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात सीमा शिरोडकर यांचे मोठे योगदान आहे. अनेक वर्षे सोलो हार्मोनियम वादन आणि ख्यातनाम कलावंतांना साथसंगत करताना त्यांनी आपल्या जादुई बोटांनी श्रोत्यांना अलौकिक स्वरसाजाची पर्वणी दिली. त्यांचे 'याद पिया की आये ही' ठुमरीचे सूर तर कधीच विसरता येणार नाहीत. सीमा यांनी देशविदेशात हार्मोनियमवादनाचे अनेक कार्यक्रम केले. अनेक शिष्यगण घडवले.

संवादिनीवादन क्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी असताना सीमा शिरोडकर यांनी मात्र आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला. सीमा शिरोडकर यांच्या घरात संगीताचा वारसा होता. त्यांचे वडील पायपेटीवर भजने गात. त्यांनी सुरुवातीच्या काळात आतेभाऊ उमेश इन्सुलकर यांच्याकडून शिक्षण घेतले. त्यानंतर प्रसिद्ध हार्मोनियमवादक पंडित तुळशीदास बोरकर व पंडित विश्वनाथ पेंढारकर यांच्याकडे तालीम घेतली. प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, अश्विनी भिडे-देशपांडे, पद्मा तळवलकर, वीणा सहस्रबुद्धे, राशीद खान यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या मैफलींना साथसंगत करण्याची संधी शिरोडकर यांना मिळाली. सहजसुंदर वादन, गायकाला डिस्टर्ब न करणारी खरी रंगतदार संगत, प्रचंड रियाज आणि आत्मविश्वास ही त्यांच्या वादनाची वैशिष्ट्ये होती.

दरम्यान, सीमा शिरोडकर यांचे पार्थिव डोंबिवली MIDC मधील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर डोंबिवली दत्तनगर स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संगीत विश्वातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. 

आशिष शेलार यांचं श्रद्धांजली वाहणारं ट्वीट

आशिष शेलार यांनी सीम शिरोडकर यांना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केलं होतं. आशिष शेलार यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, "भावपूर्ण श्रद्धांजली... प्रसिद्ध हार्मोनियम वादक सीमा शिरोडकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांनी  आपली प्रतिभा, सातत्य आणि कठोर साधनेच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली. सोलो हार्मोनियम वादन असो वा नामवंत कलाकारांना दिलेली साथ, प्रत्येक सादरीकरणातून त्यांची संगीतनिष्ठा आणि सौंदर्यदृष्टी प्रकट होत असे..."


Harmonium Player Seema Shirodkar Passes Away: संगीत मैफलीतील सुरेल साथसंगत हरपली; सुप्रसिद्ध हार्मोनियमवादक सीमा शिरोडकर काळाच्या पडद्याआड

"संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबातून आलेल्या सीमा शिरोडकर यांनी गुरूंप्रती निष्ठा राखत परंपरा जपली आणि पुढे अनेक शिष्य घडवून ती पुढे नेली.त्यांच्या जाण्याने एक प्रतिभावान कलाकार, एक संवेदनशील संगीतसाधिका आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान हरपले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो... ॐ शांती", असं आशिष शेलारांनी लिहिलेलं. 

महत्त्वाच्या बातम्या

Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकं मोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकं मोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Embed widget