Happy Birthday Mandira Bedi : मंदिरा बेदीला वाटायची ‘आई’ होण्याची भीती! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
Mandira Bedi Birthday : 'शांती'मधील ग्लॅमर आणि चकाकीपासून दूर राहणारी मंदिरा बेदी आज तिच्या फॅशन आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते.
![Happy Birthday Mandira Bedi : मंदिरा बेदीला वाटायची ‘आई’ होण्याची भीती! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का? Happy Birthday Mandira Bedi Actress have a fear of becoming a 'mother' Happy Birthday Mandira Bedi : मंदिरा बेदीला वाटायची ‘आई’ होण्याची भीती! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/109e54b962ce7e44f51a5df655900cd4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mandira Bedi Birthday : मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिने केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर यशस्वी मॉडेल, फॅशन डिझायनर आणि टीव्ही प्रेझेंटर म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. मंदिरा बेदी ही अशी अभिनेत्री आहे, जिने 90च्या दशकातील टीव्ही शो 'शांती' द्वारे घराघरात आपला ठसा उमटवला होता. मंदिरा बेदीचा जन्म 15 एप्रिल 1972 रोजी कोलकाता येथे झाला. यावेळी ती तिचा 50वा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. पतीच्या निधनानंतर मंदिरा आता एकटीच दोन मुलांचे संगोपन करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक काळ असा होता जेव्हा मंदिरा बेदी आई बनण्यासाठी घाबरत होती.
'शांती'मधील ग्लॅमर आणि चकाकीपासून दूर राहणारी मंदिरा बेदी आज तिच्या फॅशन आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. 14 फेब्रुवारी 1999 रोजी तिने दिग्दर्शक आणि निर्माता राज कौशलशी लग्न केले. लग्नाच्या 11 वर्षानंतर, त्यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले. मंदिरा-राज कौशल हे वीरचे पालक झाले. यानंतर मंदिराने जुलै 2020 मध्ये एक मुलगी दत्तक घेतली, तिचे नाव तिने तारा ठेवले.
आई होण्याची भीती वाटायची!
मंदिरा बेदीला आई होण्याची भीती वाटत होती. तिने स्वतः याचा खुलासा केला होता आणि सांगितले होते की, तिला आधी गर्भधारणेची भीती वाटत होती. कारण देताना, तिने सांगितले की, तिच्या कामाच्या प्रकल्पांमुळे तिला गर्भवती होता आलं नाही. आणि गर्भधारणेमुळे आपली कारकीर्द संपुष्टात येईल, अशी भीती तिला होती. मंदिराला वाटले की, आई झाल्यानंतर तिला काम मिळणार नाही.
टीव्ही आणि चित्रपटांपासून केलं स्वतःला दूर!
बोल्ड इमेज आणि वक्तव्यांमुळे मंदिरा बेदी नेहमीच चर्चेत असते. मंदिरा आता चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये पूर्वीपेक्षा कमी दिसत असली तरी, मंदिरा शेवट 'वोडका डायरीज'मध्ये दिसली होती, ज्यामध्ये मंदिराच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.
मंदिरा तिचे काम आणि फिटनेस यांच्यात संतुलन राखते. यामुळेच ती इतक्या वयातही तंदुरुस्त आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतील, ज्यामध्ये तिचे डेडीकेशन दिसते.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)