Happy Birthday Ajay Devgn : सेटवरची पहिली भेट ते लग्न, अजय देवगण-काजोलची फिल्मी लव्हस्टोरी माहितीये?
Ajay Devgn Birthday Special : आज (2 एप्रिल) अजय देवगण त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला अजय देवगण आणि काजोल यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत, जी खूपच फिल्मी आहे.

Ajay Devgn Birthday Special : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. काजोल तिच्या बबली स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते, तर अजय देवगणचे शांत वागणे चाहत्यांना खूप प्रभावित करते. अजय देवगण आणि काजोल एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत, यात काही शंका नाही. पण, दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत. दोघांना एकत्र पाहून चाहतेही खूप खूश होतात. 2 एप्रिलला अजय देवगण त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला अजय देवगण आणि काजोल यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत, जी खूपच फिल्मी आहे.
1995 मध्ये रिलीज झालेल्या 'हलचल' या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. अजय देवगण शांत स्वभावाचा आहे आणि याच कारणामुळे तो चित्रपटाच्या सेटवर कोणाशीही जास्त बोलत नव्हता. अशा स्थितीत लोक त्याला अहंकारी समजू लागले होते. पण, काजोल त्याच्या पूर्णपणे विरुद्ध होती. अभिनेत्री सगळ्यांशी गप्पा मारायची. काजोल अजय देवगणशीही बोलायची आणि त्यातूनच त्यांच्यात संवाद सुरू झाला. यानंतर काजोल आणि अजय देवगण यांची वरचेवर भेट होऊ लागली आणि त्यानंतर त्यांची लव्हस्टोरीही सुरू झाली. दोघांनीही त्यांच्या डेटिंग लाईफचा आनंद बराच काळ लुटला आहे.
डेटिंगनंतर बांधली लग्नगाठ
काजोल आणि अजय देवगणने डेटिंग लाइफ एन्जॉय केल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, काजोलच्या वडिलांना तिने करिअर सोडून, अजय देवगणशी लग्न करावे असे वाटत नव्हते. पण, दोघांच्या प्रेमापुढे त्यांना हार मानावी लागली. काजोल आणि अजय देवगणने 1999 मध्ये लग्न केले होते. दोघांचे लग्न अगदी साधेपणाने पार पडले. काजोल आणि अजय देवगणने त्यांच्या घराच्या गच्चीवरच लग्न केले होते. दोघांच्या लग्नाची माहिती घरच्यांशिवाय कुणालाही नव्हती. याचा खुलासा खुद्द अजयने केला होता.
घराच्या गच्चीवर घेतले सात फेरे!
अजयने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे लग्न घराच्या गच्चीवरच झाले होते. तो बेडरूममधून बाहेर पडला आणि गच्चीवर गेला आणि लग्न झाल्यावर पुन्हा बेडरूममध्ये आला. काजोल ही एक सामान्य गृहिणी आहे. अजय सांगतो की, काजोल पैसे वाचवण्यासाठी ऑनलाईन स्वस्त वस्तू खरेदी करते.
प्रेक्षकांची लाडकी जोडी!
काजोल आणि अजय देवगणने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु, दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. हे दोघे 'गुंडाराज', 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'दिल क्या करे', 'यू मी और हम' आणि 'राजू चाचा' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. काजोल आणि अजय देवगण शेवटचे 'तानाजी द अनसंग वॉरियर' चित्रपटात एकत्र दिसले होते.
हेही वाचा :
- Boss Mazi Ladachi : 'बॉस माझी लाडाची' मालिकेतील राजेश्वरी अखेर लग्नासाठी तयार
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर अशोक सराफ लावणार हजेरी, सूरांच्या मंचावर पसरणार उत्साह
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























