Gunaratna Sadavarte : इसका बाप बोलता था, जयश्री शादी की जरुरत नही है, गुणरत्न सदावर्तेंनी लव्ह मॅरेजबद्दल सविस्तर सांगितलं!
Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याच्या लव्ह मॅरेजविषयी सविस्तर सांगितलं आहे.
Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या बिग बॉसमधील एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली होती. पण दोन आठवड्यातच गुणरत्न सदावर्तेंना बिग बॉसच्या घराबाहेर (Bigg Boss Season 18) पडावं लागलं आहे. बिग बॉसच्या घरात असताना गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली होती. त्यानंतर आता घरातून बाहेर आल्यानंतरही त्यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या लव्ह मॅरेजविषयी सविस्तर सांगितलं आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतीच टेली मसाला या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गुणरत्न सदावर्तेंसोबत त्यांच्या पत्नी जयश्री पाटीलही सोबत होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांविषयी देखील भाष्य केलं आहे. बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्ते मल्लिका शेरावतसोबतही थिरकताना दिसले, त्यावर जयश्री पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला यावर जेलसी झाली नाही का? असा प्रश्न जयश्री पाटील यांना विचारला. त्यावर उत्तर देताना गुणरत्न सदावर्ते यांनी जयश्री पाटील यांच्या वडिलांविषयी भाष्य केलंय.
सदावर्तेंनी काय म्हटलं?
गुणरत्न सदावर्ते यांनी टेली मसालाच्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, 'ये लोखंडे हे...अंडरवर्ल्डसे पढाई हैं... इनका बाप इनसे भी ज्यादा लोखंड था...आमच्या रिलेशनला पाच ते सात वर्ष झाल्यानंतरही हिचा बाप म्हणायचा की... अरे जयश्री शादी की कोई जरुरत नहीं हैं..चल निकल मजे करेंगे गाँव में... एवढ्या खुल्या विचारांची आहे ही...'
सदावर्तेंच्या एन्ट्रीवर हायकोर्टाची नाराजी
दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी देखील सुरु आहे. पण त्याचवेळी गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरात जाऊन बसल्याने हायकोर्टाने चांगलच सुनावलं.
डॉ. गुणरत्न सदावर्तेंच्या वर्तनावर हायकोर्टाची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसलेत", अशी माहिती इतर वकिलांकडून हायकोर्टाला देण्यात आलीये. या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का? असा सवाल उपस्थित करत आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते असं हायकोर्टाने म्हटलं आहे. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले? असाही सवाल हायकोर्टाने केलाय.
मराठा आरक्षणाला विरोध करणा-या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला, आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणाची हायकोर्टातील पूर्णपीठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीये.