Grammys 2022 : ऑस्कर अन् ग्रॅमीला लता मंगेशकरांचा विसर पडल्यानं कंगना रनौत भडकली; म्हणाली....
आता कंगना रनौतनं (Kangana Ranaut) देखील एक पोस्ट शेअर करून लोकांना ग्रॅमी आणि ऑस्कर या पुरस्कारांचा निषेध करण्यास सांगितलं आहे.
Grammys 2022 : काही दिवसांपूर्वी 64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा (Grammy Awards) लास वेगसमधील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे पार पडला. या सोहळ्यात संगीत क्षेत्रातमधील अनेक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. भारतातील प्रसिद्ध संगीतकार रिकी केज आणि फाल्गुनी शाह यांना देखील ग्रॅमी पुरस्कार पटकवला आहे. पण ऑस्कर आणि ग्रॅमी या दोन्ही पुरस्कारांच्या सोहळ्या दरम्यान प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही, त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांना ट्रोल केले. आता अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)नं देखील याबाबत एक पोस्ट शेअर करून लोकांना या पुरस्काराचा निषेध करण्यास सांगितलं आहे.
कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही बातम्यांचे स्क्रिनशॉर शेअर केले आहेत. हे स्क्रिनशॉट शेअर करून कंगनानं पोस्टमध्ये लिहिले, 'अशा लोकल पुरस्कारांचा निषेध करा. हे पुरस्कार आंतरराष्ट्रीय असण्याचा दावा करतात पण दिग्गज लोकांना हे विसरतात. ऑस्कर आणि ग्रॅमी या दोन्ही पुरस्कारांना लता मंगेशकर यांचा विसर पडला. '
कंगना वेगवेगळ्या विषयांवरील तिची मत सोशल मीडियावर मांडते. सध्या ती लॉक-अप या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे ती सूत्रसंचालन करते. या शोमुळे सध्या ती चर्चेत आहे. कंगनाच्या पंगा, क्विन आणि तन्नू वेड्स मनु या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच तिचा धाकड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या
- Sri lanka Curfew : श्रीलंकेत 36 तासांचा कर्फ्यू हटवला, नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार, पंतप्रधान करणार संबोधित
- ...तर आपलीही अवस्था श्रीलंकेसारखी होईल, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त
- आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेत निदर्शने, कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी 600 पेक्षा जास्त जणांना अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha