मुंबई : सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. दोन महिने उलटूनही अद्याप या घटनेचा निश्चित तपास लागलेला नाही. आता सुशांत प्रकरण सीबीआयच्या ताब्यात केलं आहे. ही बातमी ताजी असतानाच, सुशांतच्या कुटुंबियांनी सुशांतसाठी प्रार्थनेचं आयोजन केलं आहे. आज, 22 ऑगस्ट रोजी ही ग्लोबली ही प्रार्थना होणार आहे.


सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने सुशांतच्या चाहत्यांना प्रार्थनेत सहभागी व्हायचं आवाहन केलं. https://prayforsushant.com या वेबसाईटवर त्यासाठी रजिस्टर व्हावं लागणार आहे. याला #GayatriMantra4SSR असा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. गायत्री मंत्रामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते. सर्वंत्र पवित्र वातावरण तयार होतं. त्यामुळे आपल्याला सुशांतच्या न्यायासाठी लञण्याचं बळ मिळेल असं श्वेता लिहिते. यात जस्टिस फॉर सुशांत. फेथ इन सीबीआय असं हॅशटॅग तयार करण्यात आले आहेत.

SSR Case | सीबीआयच्या चौकशीला सुरुवात, मुंबई पोलिसांनी तपासाची कागदपत्रे सोपवली

भारतीय प्रमाण वेळेनुसार 22 ऑगस्टला रात्री साडेआठ वाजता झूम द्वारे हे गायत्री मंत्रपठण होणार आहे. या मंत्रपठणातल्या 23 मुख्य मंडळींचे फोटो या साईटवर आहेत. जास्तीत जास्त सुशांतच्या चाहत्यांनी या मंत्रपठणात सहभागी व्हावं अशी इच्छा सुशांतची बहीण श्वेताने वर्तवली आहे. सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे जाणं हे त्यादृष्टीने पडलेलं सकारात्मक पाऊल आहे हे लक्षात घेऊन या प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या