Ganesh Murti Sthapana | गणेश चतुर्थीचं पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरं करण्यात येत आहे. बुद्धिचं दैवत असलेल्या विघ्नहर्त्याच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न झालं आहे. कोरोनामुळे यंदाचा गणोशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. परंतु तरिही सगळीकडे आवश्यक ती सर्व काळजी घेत बाप्पाचं आगमन झालं आहे. असं मानलं जातं की, गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख, शांती नांदते. तसेच येणारी सर्व संकटं दूर होतात.
पंचागानुसार, शुभ मुहूर्तावरच गणेशाच्या मूर्तीची स्थापला घरी करवी. 22 ऑगस्ट 2020 म्हणजेच, आज (शनिवारी) गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा मूहुर्त पंचांगानुसार, अत्यंत सुक्ष्म आहे. या शुभ वेळी मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
गजाननाच्या मुर्ती स्थापनेचा शुभ मूहुर्त
पंचांगानुसार, चतुर्थी 21 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी सुरु होणार असून 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच, गणेश चतुर्थीची पूजा दुपारच्या वेळीच करण्यात येते. कारण श्रीगणेशाचा जन्म दुपारच्या वेळी झाला होता. गणरायाच्या पूजेचा वेळ 22 ऑगस्टपर्यंत दुपारी 2 तास 36 मिनिटांपर्यंत आहे. 22 ऑगस्ट रोजी म्हणजेच, आज सकाळी 11 वाजून 06 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना करू शकता. पंचांगानुसार, 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपासून ते संध्याकाळी 4 वाजून 48 मिनिटांपर्यंतचा मुहूर्तही अत्यंत शुभ आहे.
गणरायाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. बुद्धिचं दैवत असणाऱ्या आणि आपलं सर्व विघ्न दूर करणाऱ्या या विघ्नहर्त्याच्या 108 नावांचा जप केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व बाधा दूर होतात, असं सांगण्यात येतं. आज आम्ही तुम्हाला गणेशाची 108 नावं सांगणार आहोत. ज्यांचा मनापासून जप केल्याने गणपतीचा आशिर्वात प्राप्त होतो, असं सांगितलं जातं.
गणरायाच्या नावांचा जप करण्याचा विधी
गजाननाचा जन्म दुपारच्या वेळी झाला होता. पंचांगानुसार, 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. चुतुर्थी तिथीचा आरंभ 22 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. तर चतुर्थी तिथीची समाप्ती 22 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे. या दिवशी गणेश पुजेचा वेळ 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 7 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत आहे. पूजेच्या वेळी गणरायाच्या या नावांचा जप करण्याला अत्यंत महत्त्व आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
गणरायाच्या 'या' 108 नावांनी दूर होतात संकटं; भाविकांची श्रद्धा