नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या प्रकरणी आरोपी रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतच्या बहिणीनेही आपली प्रतिक्रिया दिली असून ती म्हणाली की, अखेर तपास सीबीआय करणार. तसेच बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी लोकशाही आणि न्यायव्यवस्थेचा विजय झाला, असं म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाने बुधवारी रिया चक्रवर्तीच्या मुंबई पोलिसांकडे एफआयआर ट्रान्सफर करण्याच्या मागणी फेटाळून लावली. तसेच बिहार सरकार आणि सुशांतच्या कुटुंबियांनी केलेली सीबीआय तपासाची मागणी योग्य ठरवली आहे. तसेच तपासाचे अधिकारही बिहार सरकारकडे दिले आहेत.
सत्याच्या दिशेने पहिलं पाऊल : सुशांतची बहिण
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निकालानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंहा कीर्तीने ट्वीट करत देवाचे आभार मानले आहेत. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'देवा तुझे आभार. तू आमची प्रार्थना ऐकली. परंतु, ही फक्त सुरुवात आहे. सत्याच्या दिशेने पहिलं पाऊल आहे. सीबीआयवर पूर्णपणे विश्वास आहे.'
तसेच सुशांतचे काका देवकिशोर यांनी ABP न्यूजशी बोलताना सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची संपूर्ण कुटुंबाकडून कौतुक करतो.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर सुशांतचे वडील के.के.सिंह यांच्या वतीने खटला लढणारे वकील विकास सिंह यांनी न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे आणि कुटुंबाचा विजय असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले की, 'हा एक विजय आहे सुशांतच्या कुटुंबाचा. हा योग्य निर्णय आहे. कोर्टाने निर्णयाला आव्हान देण्याची कोणालाच संधी दिली नाही. या प्रकणाशी निगडीत जर कोणतीही केस रजिस्टर झाली. तर त्याचा तपास सीबीआय करणार. सुशांतच्या मृत्यूशी निगडीत जेवढ्या प्रकरणं आहेत, त्या सर्वांचा तपास सीबीआय करणार आहे.'
पाहा व्हिडीओ : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण नेमकं काय वळण घेणार?
लोकशाही आणि न्यायव्यवस्थेचा विजय : बिहार डीजीपी
बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी या प्रकरणानंतर एबीपी न्यूजशी बोलताना हा निर्णय म्हणजे, न्यायव्यवस्था आणि लोकशाहीचा विजय असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले की, ही अन्याया विरुद्धची लढाई आहे. असत्यावर सत्याचा विजय असल्याचं सांगितलं आहे. आज मला अप्रत्यक्ष स्वरुपात न्यायमूर्तींमध्ये देवाचं रुप दिसलं आहे.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'संपूर्ण देशाने पाहिलं की, महाराष्ट्र पोलिसांनी सहकार्य केलं नाही. मध्यरात्री एका आयपीएस अधिकाऱ्याला अपराध्यासारखं शिक्का मारून क्वॉरंटाईन केलं. सुप्रीम कोर्टाने देखील हे पाहिलं.'
सुशांतच्या कुटंबाने रियावर लावले होते आरोप
सुशांतच्या वडिलांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये रिया चक्रवर्तीवर सुशांतचा छळ केल्याचे आणि त्याच्याकडून कोट्यवधी रूपये लुटून आत्महत्येसाठी त्याला प्रवृत्त केल्याचा आरोप लावला होता. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार, सुप्रीम कोर्टाचा निकाल
सत्यमेव जयते! सुशांत सिंह प्रकरणावर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया