मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयावरआनंद व्यक्त केला आहे.


अंकिता लोखंडेने आपल्या ट्विटर अकाउंटवर न्याय देवतेचा फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे. तिने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'जस्टिस इज द ट्रुथ इन अॅक्शन... सत्याचाच विजय होतो.'





सुशांत अंकिताच्या घराचे भरत होता हफ्ते?


सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आर्थिक व्यवहाराप्रकरणी ईडी तपास करत आहे. ईडी अधिकृतरित्या तपासाची कोणतीही माहिती दिलेली नाही. पण मीडियामध्ये आलेल्या काही वृत्तात दावा केला जात आहे की, सुशांत सिंह राजपूत त्याची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडेच्या एका फ्लॅटचे हफ्ते भरत होता. मात्र अंकिताने हे वृत्त फेटाळलं होतं. अंकिता लोखंडेच्या माहितीनुसार, तिने हा फ्लॅट 1.35 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता आणि त्याचे हफ्तेही तिच फेडत आहे. अंकिताने फ्लॅटचे कागदपत्रे आणि तिच्या खात्यामधून जाणाऱ्या हफ्त्यांची माहिती दिली आहे. अंकिताच्या मते या फ्लॅटचे हफ्ते तिच भरत आहे. या घराची किंमत 1.35 कोटी रुपये आहे. काही वृत्तानुसार, सध्याच्या घडीला या फ्लॅटचा बाजारमूल्य सुमारे 4.5 कोटी रुपये आहे.


दरम्यान, 2010 मध्ये 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेदरम्यान सुशांत आणि अंकिता यांच्यात जवळीक वाढली. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान दोघे लिव्ह इनमध्ये होते आणि याच फ्लॅटमध्ये राहत होते. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. या फ्लॅटबाबत अंकिताने आता स्पष्टीकरण दिलं आहे.





सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी सतत होत होती. याआधी अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सुशांतला न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. या व्हिडीओमध्ये अंकिता पोस्टरसोबत दिसून आली होती. 'देशाला माहिती आहे की, सुशांत सिंह राजपूतसोबत काय झालं? जस्टिस फॉर सुशांत. सीबीआय फॉर SSR' तसेच पोस्टवर #CBIFORSSR लिहिलं होतं.


सुशांत सिंह राजपूत 14 जन रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर मुंबई पोलिस याप्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर सुशांतच्या वडिलांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये रिया चक्रवर्तीवर सुशांतचा छळ केल्याचे आणि त्याच्याकडून कोट्यवधी रूपये लुटून आत्महत्येसाठी त्याला प्रवृत्त केल्याचा आरोप लावला होता. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती.


महत्त्वाच्या बातम्या :