नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या प्रकरणी आरोपी रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतच्या कुटुंबियांनी त्याचं स्वागत केलं आहे.

Continues below advertisement


सुशांतचे मित्र, शुभचिंतक, मीडिया आणि जगभरातील सुशांतच्या फॅन्सचे मनापासून आभार. सुशांतवर दाखवलेल्या प्रेमाबद्दल या परिस्थितीत आमच्यासोबत उभे राहिल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहार सरकारचे विशेष आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळे न्यायप्रक्रियेला गती मिळाली असं सुशांतच्या कुटुंबियांनी म्हटलं.


आता देशातील सर्वात विश्वसनीय तपास संस्था सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे, त्यामुळे दोषींनी नक्की शिक्षा होईल याचा आम्हाला विश्वास आहे. संस्थांवरचा लोकांना विश्वास कायम राहिला पाहिजे. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आमचा लोकशाहीवरचा विश्वास आणखी मजबूत झाला आहे,असं सुशांतच्या कुटुंबियांनी म्हटलं.


सुप्रीम कोर्टाने बुधवारी रिया चक्रवर्तीच्या मुंबई पोलिसांकडे एफआयआर ट्रान्सफर करण्याच्या मागणी फेटाळून लावली. तसेच बिहार सरकार आणि सुशांतच्या कुटुंबियांनी केलेली सीबीआय तपासाची मागणी योग्य ठरवली आहे. तसेच तपासाचे अधिकारही बिहार सरकारकडे दिले आहेत.


सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निकालानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंहा कीर्तीने ट्वीट करत देवाचे आभार मानले आहेत. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'देवा तुझे आभार. तू आमची प्रार्थना ऐकली. परंतु, ही फक्त सुरुवात आहे. सत्याच्या दिशेने पहिलं पाऊल आहे. सीबीआयवर पूर्णपणे विश्वास आहे.'




संबंधित बातम्या