VIDEO : छोट्या पुढारीची राधा पाटीलसोबत 'मस्ती', डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Ghanshyam Darode Chhota Pudhari dance with Radha Patil : छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने नृत्यांगणा राधा पाटील हिच्यासोबत हिच्यासोबत भन्नाट डान्स केलाय.

Ghanshyam Darode Chhota Pudhari dance with Radha Patil : महाराष्ट्राचा लाडका छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे याने एक इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केलीये. या पोस्टमध्ये त्याने नृत्यांगणा राधा पाटील हिच्यासोबतचा खास व्हिडीओ आणि एक फोटो शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये घनश्याम दरोडे राधा पाटील हिच्यासोबत भन्नाट डान्स करताना पाहायला मिळतोय. घनश्याम दरोडे याच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. काही नेटकऱ्यांनी छोटा पुढारी घनश्याम दरोडे याला ट्रोल केलेलं देखील पाहायला मिळत आहे. (Ghanshyam Darode Chhota Pudhari dance with Radha Patil)
*VIDEO : छोट्या पुढारीची राधा पाटीलसोबत मस्ती, डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस* pic.twitter.com/NXAPs4kx9o
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) August 19, 2025
View this post on Instagram
घनश्याम दरोडे हा ग्रामीण भागातील राजकीय भाष्यकार म्हणून ओळखला जातो. लहानपणापासून त्याने भाषण करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून आलेल्या घनश्यामने महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली. अनेक राजकीय नेते मंडळींच्या स्टेजवर तो भाषण करताना पाहायला मिळाला. घनश्यामचं प्राथमिक शिक्षण घारगाव (सध्या श्रीगोंदा) येथील आश्रमशाळेत पूर्ण केले. त्यानंतर श्रीगोंदा, महाराष्ट्रातील महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. (Ghanshyam Darode Chhota Pudhari dance with Radha Patil)
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या मी येतोय... छोटा पुढारी या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे मराठी मनोरंजनसृष्टीत मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले आणि त्यांना ओळख मिळाली. घनश्याम दरोडे याने बिग बॉस मराठी 5 या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला, जिथे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि करिष्म्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. शेतकरी कुटुंबातील साध्या पार्श्वभूमीतून सुरू झालेला घनश्यामचा प्रवास अभिनय तसेच राजकीय भाष्य या दोन्ही क्षेत्रात पुढे गेला. (Ghanshyam Darode Chhota Pudhari dance with Radha Patil)
इतर महत्त्वाच्या बातम्या























