VIDEO : महाराष्ट्राच्या सूनेची वटपौर्णिमा, जिनेलियाची रितेशसाठी खास प्रार्थना; पाहा खास व्हिडीओ
Genelia Deshmukh Vat Purnima VIDEO : महाराष्ट्राच्या सूनेची वटपौर्णिमा, जिनेलियाची रितेशसाठी खास प्रार्थना; शेअर केला खास व्हिडीओ

Genelia Deshmukh Vat Purnima VIDEO : बॉलिवूड अभिनेत्री जिनेलिया हिने आज (दि.10) वटपौर्णिमेच्या निमित्ताने खास प्रार्थना केली आहे. (Genelia Deshmukh Vat Purnima VIDEO) जिनेलियाने तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुख याच्या दिर्घआयष्यासाठी देवाकडे खास पद्धतीने प्रार्थना केली आहे. जिनेलियाने या संपूर्ण विधीचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. (Genelia Deshmukh Vat Purnima VIDEO) यावेळी जिनेलियाने देवापुढे लोटांगण देखील घातलं आहे.
View this post on Instagram
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया यांची जोडी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. रितेश आणि जिनेलिया सोशल मीडियावर एकत्रितपणे नेहमी रील्स शेअर करताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावर रितेश आणि जिनेलियाच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. दोघांच्या रील्सवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.
‘तुझे मेरी कसम’ च्या सेटवर झाली होती पहिली भेट
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांची 2002 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. हा दोघांचा डेब्यू म्हणजे पहिलाच चित्रपट होता आणि शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले आणि 2012 साली त्यांनी लग्न केलं. रितेश आणि जेनेलियाला रियान आणि राहेल असे दोन मुले आहेत. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमी काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. त्यांची एक प्रोडक्शन कंपनीदेखील आहे, ज्याच्या अंतर्गत मराठी चित्रपटांची निर्मिती केली जाते.
खरंतर रितेश देशमुखची जेनेलियाशी भेट त्यावेळी झाली होती जेव्हा जेनेलिया केवळ 16 वर्षांची होती. ही भेट ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती, ज्यात त्यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. शूटिंगसाठी जेव्हा दोघं हैदराबादला गेले होते, तेव्हा जेनेलियाला रितेशला पाहून वाटलं होतं की तो मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे नक्कीच बिघडलेला आणि गर्विष्ठ असेल. पण जेव्हा सेटवर त्यांच्यात संवाद झाला, तेव्हा जेनेलिया रितेशच्या नम्र आणि साध्या स्वभावाने खूप प्रभावित झाली. दुसरीकडे, रितेशला ती गोड आणि साधी जेनेलिया पाहताक्षणीच खूप आवडली होती. आणि मग काय, पहिल्याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या मैत्रीतून जवळीक वाढू लागली. काही काळानंतर दोघांनी ठरवलं की ते लग्नबंधनात अडकतील. आणि शेवटी, 9 वर्षांच्या डेटिंगनंतर, 2012 साली दोघांनी धूमधडाक्यात लग्न केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कारेगावच्या सरपंच मॅडमची वटपौर्णिमा; खास व्हिडीओ केला शेअर VIDEO























