Ritiesh Deshmukh Birthday : जिनेलिया वहिनींनी रितेश भाऊंना वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा, बायकोच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला...
Ritiesh Deshmukh Birthday : रितेश देशमुखच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची पत्नी जिनेलिया देशमुखची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Genelia Deshmukh Birthday Post for Ritiesh Deshmukh : अभिनेता रितेश देशमुखने (Ritiesh Deshmukh) आजवर अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. सिनेसृष्टीतल्या याच चॉकलेट बॉयचा 17 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलाय देशमुखने (Genelia Deshmukh) खास शुभेच्छा दिल्या आहेत.
जिनिलायने तिच्या सोशल मीडियावर रितेशसोबतचा फोटो शेअर केला आहे. यावर जिनिलायने दिलेल्या कॅप्शननेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. इतकच नव्हे तर जिनिलायच्या या पोस्टवर रितेशनेही कमेंट केली आहे. तसेच तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत रितेशलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
जिनिलायच्या पोस्ट नेमकी काय?
जिनिलायने रितेशसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, जर तुम्ही, बेस्ट मुलगा, बेस्ट बाबा, बेस्ट भाऊ, बेस्ट नवरा शोधत असला तर तो पूर्णपणे माझा झालाय. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रितेश... मी तुझीच आहे... नो रिफंड्स... यावर रितेशनेही कमेंट करत म्हटलं की, असे प्रेम मिळणे हा एक आशीर्वाद आहे … खूप प्रेम बायको.. तुझ्या असण्यासाठी खूप धन्यवाद...माझ्याकडे कोणतेही रिटर्न पॉलिसी नाही!!!
रितेश आणि जिनिलियाची लव्ह स्टोरी
2002 मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटात रितेश आणि जिनिलियानं काम केलं आहे. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटानंतर त्यांनी 'मस्ती' या सिनेमात एकत्र काम केलं. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 3 फेब्रुवारी 2012 रोडी ते लग्नबंधनात अडकले. रितेश आणि जिनिलिया यांना 25 नोव्हेंबर 2014 रोजी रियान हा मुलगा झाला. त्यानंतर त्यांच्या दुसरा मुलगा राहिलचा जन्म 1 जून 2016 रोजी झाला.
View this post on Instagram