Gayatri Wedding: गायत्रीच्या लग्नात मित्रांची उडाली धांदल, नवरीला मंडपात नेताना सोसाट्याचा वारा अन्... वधूही भांबावली VIDEO
Marathi actress Gayatri wedding viral video: गायत्री दातारच्या एन्ट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल.

Gayatris Wedding Goes Viral: मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) हिचं नुकतंच लग्न झालं. तिनं श्रीकांत चौरेसोबत (Shrikant Chaure) सात फेरे घेऊन साताजन्माची गाठ बांधली. रविवारी 26 एप्रिल रोजी पुण्यात तिचा विवाहसोहळा (Wedding) थाटामाटात पार पडला. काही दिवसांपासून तिच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. अलिकडेच अभिनेत्रीच्या लग्नादरम्यानचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गायत्री आणि तिचे काही मित्र दिसत आहे. गायत्रीला मंडपात नेताना तिच्या मित्रांची पूर्ती वाट लागली होती. नेमकं काय झालं होतं पाहूयात.
गायत्री दातारच्या लग्नातील मंडपातील एन्ट्रीचा व्हिडीओ व्हायरल (Marathi actress Gayatri ties the knot with Shrikant Chaure)
गायत्रीच्या लग्नातील व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका व्हिडीओची प्रचंड चर्चा होत आहे. या व्हिडीओत गायत्री गुलाबी साडीत दिसत आहे. नवरीला तिच्या मित्रांनी मंडपपर्यंत नेले. पण खराब वातावरणामुळे मंडपबाहेर पुरती धांदल उडाली होती. पुण्यातील वातावरणात बदल झाला आहे. पाऊस - वाऱ्यामुळे वातावरण बिघडलं होतं. मे सुरू होण्यापूर्वीच काही ठिकाणी पावसाळा सुरू झाला आहे. गायत्रीच्या लग्नाच्या दिवशीही वारा सुटला होता. गायत्रीला मंडपात नेताना तिच्या मित्रांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, गायत्रीने याचा पुरेपूर आनंद घेतला. या व्हिडीओत गायत्री आनंदात दिसत आहे.
गायत्रीचा लग्नातील दोन्ही सुरेख लूक्स व्हायरल (Marathi actress Gayatri wedding viral video)
View this post on Instagram
गायत्रीने खास लग्नासाठी गडद गुलाबी रंगाची पैठणी नेसली होती. या साडीत गायत्री सुरेख दिसत होती. तर, तिच्या नवऱ्याने अर्थात श्रीकांत चौरेने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. लग्नविधींसाठी गायत्रीने मरुन कलरची नऊवारी साडी नेसली होती. या नऊवारी साडीत अभिनेत्री खूप देखणी दिसत होती. सध्या गायत्रीच्या लग्नातील खास मजेशीर क्षणांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















