एक्स्प्लोर

Gautami Patil On Ashok Kharat Case: अशोक खरातकडून केबिनमध्ये महिलांचं लैंगिक शोषण; गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

Gautami Patil On Ashok Kharat Case: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Gautami Patil On Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचे अनेक काळे कारनामे बाहेर येत असून महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहे. याचदरम्यान, प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिने अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. (Gautami Patil On Ashok Kharat Case)

भोंदूबाबा अशोक खरातवर योग्य ती कठोर कारवाई झाली पाहीजे. यावर लक्ष द्यायला पाहीजे. परत आपल्याकडे अशा घटनाच घडल्या नाही पाहीजे, असं गौतमी पाटील म्हणाली. तसेच यासाठी कडक कारवाई व्हायला हवी, म्हणजे देशात असे प्रकार कुठे घडणार नाहीत, असंही गौतमी पाटीलने सांगितले. (Gautami Patil On Ashok Kharat Case)

अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल- (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झालाआहे. अशोक खरात यासह समता पतसंस्थेच्या राहाता शाखेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला. 2021 साली समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत उघडली 100 खाती उघडून या खात्यातून आतापर्यंत 60 कोटीपेक्षा अधीक रकमेची देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डी पोलीसांकडून 19 खातेदारांची चौकशी सुरू असताना हा घोटाळा समोर आला आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणाच्या तपासात खरातच्या अनेक मालमत्ता आणि बँक खात्यांबाबत माहिती उघड झाली. अनेकांना जाळ्यात फसवून भोंदू खरातने अमाप माया जमवल्याचं तपासात समोर आलं आहे. याचवरुन भोंदू खरात आता ईडीच्याही निशाण्यावर येण्याची शक्यता आहे.. अशोक खरात प्रकरणाचा आता ईडी तपास करणार असून यामध्ये सहभागी असलेल्या कुणालाही सोडणार नाही असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. (Ashok Kharat Case Nashik)

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालवायचा 'हवाला रॅकेट'- (Ashok Kharat Case)

अशोक खरात याने केवळ अंधश्रद्धेच्या नावाखालीच नव्हे, तर 'हवाला' रॅकेटच्या माध्यमातूनही आपले जाळे विणल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे रॅकेट चालवण्यासाठी मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक खरातने मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एक स्पेशल सूट कायमस्वरूपी बुक केला होता. या रूमचे दिवसाचे भाडे 25 हजार रुपये इतके होते. वर्षाचे 365 दिवस ही रूम खरातच्या नावावर बुक असायची. याच आलिशान रूममधून कोट्यवधी रुपयांच्या हवाला व्यवहारांची देवाण-घेवाण आणि आखणी केली जात असल्याचे तपासात समोर येत आहे.

पंतसंस्थेच्या अनेक खात्यांमध्ये खरात वारसदार- (Ashok Kharat Case)

कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याची माहिती आहे. या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामध्ये आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा दोन नावांनी खाते असल्याची माहिती आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव प्रतिभा आहे.

संबंधित बातमी:

Anjali Damania On Ashok Kharat Case: रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स काढले, मंत्र्यांचीही नावं घेतली!

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget