एक्स्प्लोर

Friday Release: पडद्यावर भीतीचा खेळ, OTT वर सस्पेन्सचा धमाका! या शुक्रवारी 7 फिल्म्स-सिरीज तुमचं डोकं चक्रावणार

 चित्रपटगृहांपासून ते ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत या शुक्रवारी ( 17 एप्रिल ) प्रेक्षकांसाठी कोणते खास चित्रपट प्रदर्शित होत आहेत ? चला जाणून घेऊया.

Friday New Release: एप्रिल महिन्याचा तिसरा शुक्रवार प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी घेऊन आला आहे .एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुरंधर 2 ने कमाईचे नवे रेकॉर्ड मोडले आहेत . धुरंधर ला टक्कर देण्यासाठी अक्षय कुमारचा हॉरर कॉमेडी आता प्रदर्शनाच्या तयारीत आहे. चित्रपटगृहांसह आठवड्यात ओटीटीवरही उत्कृष्ट चित्रपट आणि वेब सिरीजचं वादळ येणार आहे.  चित्रपटगृहांपासून ते ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत या शुक्रवारी ( 17 एप्रिल ) प्रेक्षकांसाठी कोणते खास चित्रपट प्रदर्शित होत आहेत ? चला जाणून घेऊया. (OTT relese this Week)

अस्सी (Assi)

तापसी पन्नूचा कोर्टरूम ड्रामा 'अस्सी' चित्रपटगृहांमध्ये फारसा यशस्वी ठरला नसला तरी, आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि तापसी पन्नू हॅट-ट्रिक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कथा एका शालेय शिक्षिकेभोवती फिरते.  तिच्यावर  तिच्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून बलात्कार होतो. यानंतर, ती त्यांच्याविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेते. वकील रवी म्हणजेच  तापसी पन्नू तिची केस लढवते, पण या प्रवासात तिला अनेक गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागते.

रिलीज डेट:17 एप्रिल
प्लॅटफॉर्म:ZEE5
जॉनर:कोर्टरूम ड्रामा

भूत बंगला (Bhooth Bangla)

अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची ब्लॉकबस्टर जोडी 16  वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परत येत आहे. 'हेरा फेरी', 'भागम भाग' आणि 'गरम मसाला' यांसारखे अनेक यशस्वी विनोदी चित्रपट दिल्यानंतर, ही जोडी आता 'भूत बंगला' या चित्रपटाद्वारे चित्रपटगृहांमध्ये परत येत आहे. या चित्रपटाचा 16  एप्रिल रोजी पेड प्रिव्ह्यू झाला होता आणि तो शुक्रवारी प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होईल. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पेड प्रीव्यू:16 एप्रिल
रिलीज डेट: 17 एप्रिल
प्लॅटफॉर्म: चित्रपटगृह
जॉनर:हॉरर कॉमेडी

रूममेट्स (Roommates)

दर आठवड्याला नेटफ्लिक्स तरुण पिढीला आवडेल असे काहीतरी नवीन घेऊन येतं.या आठवड्यात 'रूममेट्स' नावाची एक 'कमिंग-ऑफ-एज' कॉमेडी-ड्रामा मालिका येत आहे. ही मालिका तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुंतागुंत उलगडते. ही कथा डेव्हन नावाच्या एका साध्याभोळ्या विद्यार्थिनीभोवती फिरते. तिची कॉलेजमध्ये आल्यावर तिच्या रूममेटसोबत घट्ट मैत्री होते. मात्र, लवकरच या मैत्रीचे रूपांतर एका  भांडणात होते.

रिलीज डेट: 17 एप्रिल
प्लॅटफॉर्म: Netflix
जॉनर: कॉमेडी ड्रामा

अल्फा मेल्स सीजन 5 (Alpha Males Season 5)

नेटफ्लिक्स आपली लोकप्रिय विनोदी मालिका 'अल्फा मेल्स'चा पाचवा सीझन घेऊन परत येत आहे. पाचव्या सीझनमध्ये पेड्रो, लुईस, राऊल आणि सांती हे घटस्फोट आणि मुलांच्या ताब्यासाठीच्या कायदेशीर लढाईतील आव्हानांना तोंड देताना दिसतात. यात नातेसंबंध, घटस्फोट आणि आयुष्यातील संघर्ष विनोदी पद्धतीने दाखवले आहेत.

रिलीज डेट: 17 एप्रिल
प्लॅटफॉर्म: Netflix
जॉनर: कॉमेडी

मटका किंग (Matka King)

चाहते विजय वर्माच्या 'मटका किंग' या क्राईम ड्रामा मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित या मालिकेत विजय वर्माने 'बृज भाटी' या महत्त्वाकांक्षी कापूस व्यापाऱ्याची भूमिका साकारली आहे. तो 'मटका' नावाची स्वतःची एक सट्टेबाजीची पद्धत सुरू करतो, जी श्रीमंत आणि सामान्य माणसाला जोडते. मात्र, ब्रज गुन्हेगारीच्या अंधाऱ्या दुनियेत अडकतो.

रिलीज डेट: 17 एप्रिल
प्लॅटफॉर्म: Amazon Prime Video
जॉनर: क्राइम ड्रामा

उस्ताद भगत सिंह (Ustaad Bhagat Singh)

पवन कल्याण आणि श्रीलीला अभिनीत 'उस्ताद भगत सिंग', ज्याने दाक्षिणात्य बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' ला कडवी टक्कर दिली होती, तो आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, ते आता तो घरी बसून पाहू शकतात. हा चित्रपट ओटीटीवर हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे.

रिलीज डेट: 16 एप्रिल
प्लॅटफॉर्म: Netflix
जॉनर: अ‍ॅक्शन ड्रामा

द ममी (The Mummy)

'ईविल डेड राइज'चे दिग्दर्शक ली क्रोनिन यांनी 'द ममी' या हॉरर फ्रँचायझीला नव्या रूपात सादर केले आहे. या चित्रपटाचा 2017 च्या टॉम क्रूझच्या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. या चित्रपटात जॅक रेनर, लाया कोस्टा आणि व्हेरोनिका फाल्कॉन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा हॉरर चित्रपट भारतात 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. तो इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

रिलीज डेट: 17 एप्रिल
प्लॅटफॉर्म: थिएटर्स
जॉनर: हॉरर

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget