Forbes Billionaire List 2025: ना शाहरुख, ना आमिर-सलमान, कधीकाळी टूथब्रश विकणारा बनलाय बॉलिवूडचा अब्जाधीश; नेटवर्थ तर...
Forbes Billionaire List 2025: बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणताही अभिनेता नाही, तर एक फिल्म प्रोड्यूसर आहे. पण, त्याचा श्रीमंतीचा मार्ग काही सोपा नव्हता, हा माणूस कधीकाळी टूथब्रश विकायचा आणि आता त्यानं अब्जावधींचं साम्राज्य उभं केलंय.

Forbes Billionaire List 2025: बॉलिवूड स्टार्सची (Bollywood Stars) एकूण संपत्ती कोट्यवधींमध्येच नाहीतर अब्जावधींमध्ये आहे आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) संपत्तीच्या बाबतीत सर्व स्टार्सना मागे टाकतो. सलमान खान (Slaman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांची एकूण संपत्तीही शाहरुख खानपेक्षा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत किंग खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. पण, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती तीन खान्सपैकी नाही, तर दुसरीच कुणीतरी आहे. फोर्ब्सनं अब्जाधीशांची ताजी यादी (Forbes Releases Latest List Of Billionaires) जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा (Richest Person in Bollywood) उलगडा झाला आहे. पण, ही व्यक्ती कोणताही अभिनेता नाहीतर, एक फिल्म प्रोड्यूसर आहे.
फोर्ब्स 2025 च्या अब्जाधीशांच्या यादीत जगातील 3028 डॉलर अब्जाधीशांची नावं उघड झाली आहेत. या यादीत भारतातील मनोरंजन उद्योग आणि माध्यमांसह विविध क्षेत्रातील 205 लोकांचा समावेश आहे. या यादीनुसार, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती अभिनेता नाही, तर एकेकाळी टूथब्रश विकणारा आणि आता चित्रपट निर्माता आहे.

तिन्ही खानांच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही श्रीमंत
फिल्म प्रोड्यूसर आणि उद्योजक रॉनी स्क्रूवाला बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादी 2025 नुसार, त्यांची एकूण संपत्ती 12,062 कोटी रुपये (1.5 अब्ज डॉलर्स) आहे. अशाप्रकारे, रॉनी स्क्रूवालानं संपत्तीच्या बाबतीत शाहरुख खानला मागे टाकलं आहे, ज्याची एकूण संपत्ती 6,566 कोटी रुपये आहे. एवढंच नाही तर, शाहरुखसोबत सलमान खान (3,325 कोटी) आणि आमिर खान (1,876 कोटी) यांची एकूण संपत्ती जोडली, तरी रॉनी स्क्रूवालाची एकूण संपत्ती आणखी जास्त असेल. तिन्ही खान्सची एकत्रित संपत्ती 11,784 कोटी रुपये आहे.
View this post on Instagram
सुपरस्टार्ससोबतच, रॉनी स्क्रूवालानं संपत्तीमध्ये प्रसिद्ध श्रीमंत निर्मात्यांनाही मागे टाकले आहे. त्याने गुलशन कुमार (7674 कोटी) आणि आदित्य चोप्रा (6821 कोटी) यांच्या एकूण संपत्तीलाही मागे टाकलं आहे.
रॉनी स्क्रूवाला कधीकाळी टूथब्रश विकायचा
रॉनी स्क्रूवाला यांनी आपली बिझनेस जर्नी टूथब्रश उत्पादन कंपनीपासून सुरू केली होती. त्यानंतर ते फिल्म इंडस्ट्रीकडे वळले. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली अनेक उत्तम चित्रपट बनवले गेले. यामध्ये 'स्वदेस', 'रंग दे बसंती', 'जोधा अकबर', 'फॅशन' आणि 'दिल्ली बेली' या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय 'हिप हिप हुर्रे', 'शाका लाका बूम बूम', 'खिचडी' आणि 'शरारत' सारखे टीव्ही शो देखील रॉनी स्क्रूवालाच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवले गेले होते.


















