Fauji Movie : 'फौजी'च्या सेटवर जमली सौरभ आणि प्राजक्ताची जोडी, 30 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर चाहत्यांच्या भेटीला
Fauji Marathi Movie Release Date : 'फौजी' चित्रपटातून सौरभ गोखले आणि प्राजक्ता गायकवाडची जोडी या चित्रपटातून भेटीला येणार आहे.
मुंबई : 'फौजी' चित्रपटातून सैनिकाची जीवनगाथा समोर येणार आहे. या चित्रपटातून लवकरच मराठी रुपेरी पडद्यावर आणखी वेगळी एक जोडी पाहायला मिळणार आहे. सौरभ गोखले आणि प्राजक्ता गायकवाडची जोडी या चित्रपटातून भेटीला येणार आहे. ‘फौजी’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजवण्यासाठी सज्ज आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित, घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या 30 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
'फौजी'च्या सेटवर जमली सौरभ आणि प्राजक्ताची जोडी
देशभक्तीची पार्श्वभूमी असलेल्या ‘फौजी’ (Fauji Marathi Movie) या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे प्रथमच एकत्र आले आहेत. या चित्रपटात वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणं हे खरंच आम्हाला सुखावणारी बाब असल्याचे दोघांनीही सांगितलं आहे. ‘पहिल्यांदाच एकत्र काम करत असूनही आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. एकमेकांच्या भूमिका आणि त्या भूमिकांची गरज ओळखत आम्ही काम केल्यामुळे आम्ही एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकलो’ अशा भावना या दोघांनी व्यक्त केल्या.
View this post on Instagram
30 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर चाहत्यांच्या भेटीला
देशाच्या सीमेवर आपले सैनिक हातात बंदूक घेऊन कायम आपल्या रक्षणासाठी सतत सीमेवर खंबीरपणे पहारा देत असतात, तेदेखील कोणताही स्वार्थ न ठेवता. अशा निडर सैनिकांचा जीवन प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या चित्रपटात अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार, शाहबाज खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे हे कलाकार झळकणार आहेत.
शौर्य आणि संघर्षाची गाथा
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा शूरवीरांचा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे. देशाचे जवान आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असतात, त्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. अशाच जवानांच्या शौर्यगाथेवर आधारित फौजी हा चित्रपट आहे. सीमेवरच्या जवानांची अंगावर काटा आणणारी शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर ‘फौजी’ चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे हे आहेत, तर सहनिर्मात्या सौ.स्वप्नजा विश्वनाथ नाथ आहेत.