Farmani Naaz : 'हर हर शंभू' गायिका हिंदू धर्म स्वीकारणार? पाहा काय म्हणाली फरमानी नाज
गेल्या अनेक दिवसांपासून गायिका फरमानी (Farmani Naaz) ही हिंदू धर्म स्वीकारणार आहे, अशी चर्चा सुरु होती.
Farmani Naaz Video : प्रसिद्ध गायिका आणि इंडियन आयडॉल फेम फरमानी नाज (Farmani Naaz) सध्या चर्चेत आहे. फरमानीने 'हर हर शंभू' (Har Har Shambhu) हे गाणं तिच्या युट्यूब चॅनलवर रिलीज केलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून गायिका फरमानी ही हिंदू धर्म स्वीकारणार आहे, अशी चर्चा सुरु होती. फरमानीनं एका व्हिडीओद्वारे या प्रकरणावर मौन सोडलं आहे. फरमानीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फरमानी नाज नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, त्यामध्ये लिहिलं होतं की, फरमानी ही हिंदू धर्म स्वीकारणार आहे. आता एबीपी न्यूजच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये फरमानीनं धर्माबाबत आणि फेक ट्विटर अकाऊंटबद्दल सांगितलं.
काय म्हणाली फरमानी?
'कोणीतरी माझ्या नावाने फेक ट्विटर अकाऊंट बनवले आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की, मी हिंदू धर्म स्वीकारणार आहे. माझे पूर्वज देखील गेल्या काही वर्षांपासून हिंदू धर्माची पूजा करत आहेत, असंही या ट्विटर आयडीच्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. हे सर्व खोटं आहे. लोक अफवा पसरवत आहेत. अशा लोकांच्या ट्विटर आयडीला रिपोर्ट करा. त्या लोकांना सांगा की कोणाबद्दल विचार न करता असं करु नका. फरमानी नाज 786 हा माझा खरा ट्विटर आयडी आहे.'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
फरमानीला गाणं गाण्याची आवड आहे. फरमानीचं गाणं राहुल नावाच्या एका व्यक्तीने ऐकलं आणि ते रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकलं. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर फरमानीने स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केलं. युट्यूबवर फरमानीचे 38.4 लाख सब्सक्रायबर आहेत.
हेही वाचा:
Bigg Boss 16 : भाईजानच्या बहुचर्चित कार्यक्रमात फरमानी नाजची एन्ट्री? 'बिग बॉस 16' लवकरच होणार सुरू