Nina Gupta: आजीबाईंनी केलं नातीचं स्वागत, नीना गुप्तांनी मसाबाच्या बाळाला जवळ घेत टाकली पोस्ट, म्हणाल्या, माझ्या मुलीची मुलगी..
यावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय..प्रियंका चोप्रा, मृणाल ठाकूरनं आजी झालेल्या नीना गुप्ता यांचं अभिनंदन केलंय.
Nina Gupta:राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आता आजी झाल्या आहेत. सोमवारी मसाबानं तिला मुलगी झाल्याची पोस्ट केल्यानंतर आता तिच्या आजीनं म्हणजेच नीना गुप्ता यांनी मसाबाच्या बाळाला जवळ घेत कौतुकाची एक पोस्ट केली आहे. यावेळी माझ्या मुलीची मुलगी असं लिहित प्रेमानं जवळ घेत देव आमचे रक्षण करो असं लिहिलंय. यावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय..प्रियंका चोप्रा, मृणाल ठाकूरनं आजी झालेल्या नीना गुप्ता यांचं अभिनंदन केलंय. आजीबाई अभिनंदन.. निम्रत कौरनं अभिनंदन नीना मॅडम आणि खूप खूप प्रेम.. असं म्हणत अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
मसाबा गुप्ताच्या घरी गोड बातमी
प्रसिद्ध अभिनेत्री व फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. मसाबाने इंस्टाग्रॅमवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. या पोस्टवर अनुष्का शर्मा, सोनम कपूरसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी मसाबाला शुभेच्छा दिल्या आहेत. मसाबा व सत्यदीप मिश्रा यांनी 2023 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 18 एप्रिलला instagram अकाउंटवरून पोस्ट करत ते आई-बाबा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता त्यांच्या घरी लेकीचं आगमन झालं आहे. तिने केलेल्या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आजी झाल्या!
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या आजी झाल्या आहेत. त्यांच्या मुलीला मसाबाला कन्यारत्न झाल्यानंतर चाहत्यांच्या त्यांनाही शुभेच्छा मिळत आहेत. जवळपास दोन वर्षांपूर्वी मसाला आणि सत्यदीप या दोघांनी साधेपणानेच लग्न गाठ बांधली होती. या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच नीना गुप्तांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारताना चा त्यांचा फोटो पोस्ट करत मसाबाने माझ्या बाळाला सांगेन त्याची आजी सर्वात कुलेस्ट आहे. 1994 पासून ते तिच्या केसात फुले माळत राष्ट्रीय पुरस्कार जिंकत आहे. अभिनंदन. अशी कमेंटही तिने केली होती. आता कन्यारत्न झाल्यानंतर तिच्या आजीलाही शुभेच्छा देण्यात येत आहेत.
हातात चिमुकलीचा पाय घेत फोटो पोस्ट
मसाबाने इंस्टाग्राम अकाउंट वरून तिला आणि सत्यदीप मिश्रा याला 11 ऑक्टोबरला बाळाचं आगमन झाल्याची आनंदाची बातमी दिली. दुसऱ्या फोटोमध्ये आपल्या हातात बाळाच्या पाय अशा स्वरूपाचा फोटो तिने टाकलाय. यावर बॉलीवूडमधील व मनोरंजन सृष्टीतील अनेकांनी मसाबा आणि सत्यादीपचं अभिनंदन केलंय. झोया अख्तर, राधिका आपटे, भूमी पेडणेकर, आयुष्मान खुराणा यांच्यासह अनेकांनी बाळाला आशीर्वाद आणि मसाबा आणि सत्यदीपला शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्का शर्मानं लिहिलं, "तुम्हा दोघांचंही खूप अभिनंदन" तर शिल्पा शेट्टीनं माझ्या प्रिय दोघांचे खूप अभिनंदन. मसाबाची जवळची मैत्रिण सोनम कपूर हिनं मी खूप उत्सुक आणि आनंदी आहे असं लिहिलंय.