72 Hoorain Trailer Out : सेन्सॉर बोर्डाचा विरोध असलेला '72 हुरैन'चा ट्रेलर रिलीज

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 27 Jun 2023 05:19 PM
Milind Gawali: 'मला व्हिलनचा रोल त्यांनी ऑफर केला होता, तो रोल मी स्वीकारला नाही'; मिलिंद गवळी यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष
मिलिंद यांनी नुकताच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्री स्मिता जयकर (Smita Jaykar) यांच्याबाबत लिहिलं आहे. Read More
Telly Masala : 'लोकमान्य' मालिका महत्त्वाच्या टप्प्यावर ते मराठी मालिकांमध्ये रंगणार आषाढी एकादशी विशेष भाग; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत? हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Aflatoon: तीन अतरंगी मित्रांची धमाल; अफलातून 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस,सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर प्रमुख भूमिकेत
अभिनेता सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर या कलाकारांनी 'अफलातून’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. Read More
Fighter First Look : हृतिक रोशनच्या 'फायटर'चा फर्स्ट लूक आऊट! रिलीज डेट जाहीर
Hrithik Roshan : हृतिक रोशनचा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Baiju Paravoor Death: चित्रपट रिलीज होण्याआधीच दिग्दर्शकानं घेतला जगाचा निरोप, बैजू परावूर यांचे वयाच्या 42 वर्षी निधन
बैजू परावूर (Baiju Paravoor) यांनी वयाच्या 42 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. Read More
Rhea Chakraborty: 'त्यांच्यामुळे मी आयुष्यात थांबणार नाही...'; ट्रोल करणाऱ्यांना रिया चक्रवर्तीचं सडेतोड उत्तर
सध्या रोडीज या शोमधील रियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More
Marathi Serials Ashadhi Ekadashi : 'ठरलं तर मग' ते 'रंग माझा वेगळा'; मराठी मालिकांमध्ये रंगणार आषाढी एकादशी विशेष भाग
Marathi Serial : मराठी मालिकांमध्ये आता आषाढी एकादशी विशेष भाग रंगणार आहे. Read More
Prashant Damle : प्रशांत दामलेंच्या सुखी संसाराचं रहस्य काय? पहिल्याच भेटीत पडले होते प्रेमात
Prashant Damle : बहुरुपी प्रशांत दामले पहिल्याच भेटीत गौरी दामले (Gauri Damle) यांच्या प्रेमात पडले होते. Read More
Suchitra Bandekar: 'दार उघड बये दार उघड म्हणणारा आदेश...'; सुचित्रा बांदेकर यांचा खास उखाणा, व्हिडीओ व्हायरल
सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांनी घेतलेल्या उखाण्यानं अनेकांचे लक्ष वेधले.  Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2'चा टीझर आऊट! 'या' दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ


Squid Game 2 Teaser Out : 'स्क्विड गेम' (Squid Game 2) या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. या या बहुचर्चित कोरियन वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. 


Adipurush box office collection Day 2 : पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाच्या कमाईत घट; तरी दोन दिवसांत पार केला 150 कोटींचा टप्पा


Adipurush box office collection Day 2 : रामायणावर आधारित असलेला 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 90 कोटींची जास्त कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 65 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 


Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती


Adipurush  Movie Latest Update : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच या सिनेमावर टीका होत आहे. सिनेमातील दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. पण आता 'आदिपुरुष' सिनेमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार आहेत. काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असं मुंतशीर म्हणाले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.