Baipan Bhaari Deva : त्या आल्या...त्यांनी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं... 'बाईपण भारी देवा'ने पार केला 50 कोटींचा टप्पा

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 16 Jul 2023 03:17 PM
Telly Masala : अलका कुबल यांची 'माहेरची साडी' ते 'बाईपण भारी देवा'ची कमाई; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment : कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Baipan Bhaari Deva : त्या आल्या...त्यांनी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं... 'बाईपण भारी देवा'ने पार केला 50 कोटींचा टप्पा
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने आतापर्यंत 50.10 कोटींची कमाई केली आहे. Read More
Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? 'या' पक्षाकडून लढवणार निवडणुक
Abhishek Bachchan Politics : अभिषेक बच्चन राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. Read More
Maherchi Sadi : 'माहेरची साडी' सिनेमासाठी अलका कुबल यांनी किती मानधन घेतलं होतं? जाणून घ्या...
Maherchi Sadi : 'माहेरची साडी' या सिनेमाच्या तिकीटाची किंमत फक्त चार रुपये होती. Read More
Jawan Theme Song : शाहरुखच्या 'जवान'चं थीम साँग आऊट! व्हिडीओ शेअर करत किंग खान म्हणाला,"एक घट्ट मिठी..."
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या आगामी 'जवान' सिनेमातील थीम साँग आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
Saroj Kothare : महेश कोठारे यांना मातृशोक; वडिलांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी आईचं निधन
Mahesh Kothare Mother Passed Away : महेश कोठारे यांची आई सरोज कोठारे (जेनमा) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.