Entertainment News Live Updates 9 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 09 Nov 2022 06:07 PM
The Crew: 'द क्रू' चित्रपटाची घोषणा; तब्बू, करिना अन् क्रिती साकारणार प्रमुख भूमिका

The Crew: तब्बू (Tabu), करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांनी त्यांच्या अभिनयाने आणि मनोरंजक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन नेहमीच जिंकले आहे. आता पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या तीन सुंदर 'लीडिंग लेडीज' कॉमिक कॅपर 'द क्रू' (The Crew) साठी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती 'वीरे दी वेडिंग'च्या सुपरहिट निर्मात्या जोडी एकता आर कपूर आणि रिया कपूर यांनी केली असून, दर्शकांना ड्रामा आणि कॉमेडीचा डोस देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 



Bigg Boss Marathi 4: टास्कमध्ये होणार तुफान राडा; बिग बॉसच्या घरात नवा ग्रुप तयार होणार ?

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये आज यशश्री, रोहित आणि रुचिरा नवा ग्रुप तयार व्हावा यावर चर्चा करताना दिसणार आहेत. यशश्रीचे म्हणणे आहे, मला एक कळत नाहीये जेव्हा सॅम आली होती तुमच्याकडे प्रोपोसल घेऊन कि आपण एक वेगळा ग्रुप तयार करूयात. पण त्याच्या आधीपासून माझ्या डोक्यात होतं ते. मी जेव्हा या ग्रुपमध्ये गेले होते. तेजू, अमृता, तू, मी आणि रोहित असा एक वेगळा ग्रुप असावा त्यात सॅम नव्हती कुठेही. सॅम जरी म्हणत असली ती वैयक्तिक खेळते तरी तिचा कल त्या ग्रुपकडे खूप जास्त आहे आणि ते तिला कधीपण परत खेचून आणू शकतात हे मी पाहिलं आहे. मला असं वाटतं तुम्हालाही खूप ग्रांटेड घेतलं जातं आणि सगळ्याच बाबतीत कि, जेव्हा हवं तेव्हा आपण त्यांना परत खेचून आणू शकतो. रुचिराचे त्यावर म्हणणे आहे, म्हणजे नॉमिनेट करायला आम्ही पाहिजे पण आमची कॅप्टीन्सी, किंवा container शिप गेली तर हे असताना कशी गेली? तिथे त्यांनी ती जपून ठेवली पाहिजे, पण यांना नॉमिनेट करताना आम्ही करू शकतो. आता रुचिराचा नक्की काय मुद्दाच आहे हे कळेलच आजच्या भागामध्ये .



Adarsh shinde : 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाच्या वादादरम्यान आदर्श शिंदेची भावासाठीची पोस्ट व्हायरल

Adarsh Shinde On Vedat Marathe Veer Daudle Saat : महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle Saat) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही राजकीय पक्ष आणि संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. या सिनेमात बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) सूर्याजी दांडकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या भूमिकेला सर्वत्र विरोध होत असताना त्याचा भाऊ आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदेने (Adarsh Shinde) मात्र सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत भावाचं कौतुक केलं आहे. 



Saleel Kulkarni : लिप सिंकवर सलील कुलकर्णींची नाराजी

Saleel Kulkarni on Live Concert : डॉ. सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) हे  मराठीतील नावाजलेले गायक, संगीतकार आणि लेखक आहेत. गेल्या काही दिवसांत संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लाइव्ह कॉन्सर्टदेखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अनेकदा रेकॉर्ड गाणी लावली जातात. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान होणाऱ्या लिप सिंकवर अखेर सलील कुलकर्णीने नाराजी व्यक्त केली आहे. 


Salman Khan And Boxer Nikhat Zareen: 'साथिया तूने क्या किया....'; बॉक्सर निखत जरीनसोबत सलमानचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल

Salman Khan And Boxer Nikhat Zareen Dance Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सलमान त्याच्या स्टाईलनं आणि फिटनेसनं अनेकांची मनं जिंकतो. नुकताच सलमानचा एक खास व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो निखत जरीनसोबत (Nikhat Zareen) डान्स करताना दिसत आहे. 





Pratap Sarnaik : ऐतिहासिक चित्रपटांच्या मान्यतेसाठी इतिहास तज्ज्ञांची समिती स्थापन करावी : प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik On Har Har Mahadev : 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही राजकीय पक्ष आणि संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडे एक इतिहास तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून ती समिती यापुढे येणाऱ्या ऐतिहासिक महापुरुषांसंदर्भातील सिनेमांचा अभ्यास करून ते सिनेमे प्रदर्शित करणे योग्य आहे की नाही यासंदर्भात सरकारला सल्ला देऊ शकेल.

Kanishka Soni: स्वत:शीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर? पोस्ट शेअर करत म्हणाली...

Kanishka Soni: स्वत:शीच लग्न करण्याचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीनं देखील स्वत:शी लग्न केलं. कनिष्का सोनी (Kanishka Soni) ही अभिनेत्री गळ्यात मंगळसूत्र आणि सिंदूर लाऊन फोटो शेअर करत असते. एक पोस्ट शेअर करुन कनिष्कानं स्वत:शीच लग्न केल्याबाबत माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी कनिष्कानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी कनिष्काला 'तू गरोदर आहेस का?' असा प्रश्न विचारला. त्यानंतर कनिष्का गरोदर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. 



Gangubai Kathiawadi : आलियाची स्टाईल विदेशात हिट

Alia Bhatt Gangubai Kathiawadi : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. तिचा चाहतावर्ग जगभरात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाची क्रेझ देश-विदेशात पाहायला मिळत आहे. 





Rashmika Mandana: ट्रोलिंगबाबत रश्मिकानं व्यक्त केल्या भावना; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मला त्रास होतोय....'

Rashmika Mandana: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. रश्मिकानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील लोकप्रियता मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकानं गुडबाय या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पुष्पा या चित्रपटामुळे रश्मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर काही नेटकरी रश्मिकाच्या अभिनयाचं कौतुक करतात तर काही तिला ट्रोल करतात. आता नुकतीच रश्मिकानं ट्रोलिंगबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. 



Narendra Modi : पलक-मिथुन अडकले लग्नबंधनात; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Palak Muchhal- Mithun Wedding : बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार मिथुन शर्मा (Mithun Sharma) आणि पार्श्वगायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 





Leslie Phillips: हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे निधन; वयाच्या 98 व्या घेतला अखेरचा श्वास

Leslie Phillips: ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स (Leslie Phillips) यांचे निधन झाले आहे. 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.  कॅरी ऑन या सीरिजमधील त्यांच्या भूमिकेची प्रेक्षकांना पसंती मिळाली. तर हॅरी पॉटरमधील (Harry Potter) सॉर्टिंग हॅटला (Sorting Hat) लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनानं हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. 

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर पार केला 75 मिलियनचा टप्पा

Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्रींच्या तुलनेत श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) खूपच कमी चर्चेत असते. तिच्या साधेपणामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. सिनेसृष्टीत कमी चर्चेत असलेली श्रद्धा कपूर इंस्टाग्रामरवर मात्र खूप अॅक्टिव्ह असते. आता तिने इंस्टाग्रामवर 75 मिलियनचा टप्पा पार केला आहे.





Nana Patekar : बॉलिवूडचे माफिया नाना पाटेकरांचं ओटीटीवर पदार्पण!

Nana Patekar Laal Batti Web Series : मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करणारे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून गायब आहेत. पण आता बॉलिवूडचे माफिया नाना पाटेकर प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या आगामी सीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत. 

Happy Birthday Subodh Bhave : मराठी सिनेसृष्टीतील बायोपिकचा बादशाह सुबोध भावे!

Subodh Bhave Birthday : मराठी सिनेसृष्टीतील बहुगुणी अभिनेता म्हणजे सुबोध भावे (Subodh Bhave).मराठी सिनेसृष्टीतील एकाहून एक अप्रतिम बायोपिक सुबोधच्या नावे आहेत. मराठीतला हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावेचा आज 47 वा वाढदिवस आहे. 9 नोव्हेंबर 1975 रोजी सुबोधचा पुण्यात जन्म झाला. 





Zee Studio : 'हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादावर झी स्टुडिओचा खुलासा

Zee Studio On Har Har Mahadev : 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. 'हर हर महादेव' सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच  चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत अखेर वादावर मौन सोडलं. त्यानंतर आता सिनेमाच्या वादावर झी स्टुडिओने भाष्य करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Ekdam Kadak:  'एकदम कडक' चा टिझर सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ


'एकदम कडक' चित्रपटाच्या टिझरने साऱ्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "आपल्या रेशनकार्डवर तुझंच नाव असणार" या डायलॉगने तर सर्वत्र धुमाकूळच घातलाय असे म्हणायला हरकत नाही. 'प्रेम बीम काय नाय बरं का' पासून ते 'प्रेम एकदम कडक हाय' पर्यंतचा प्रवास चित्रपटात पाहणे विशेष ठरणार आहे. तरुण कलाकारांच्या जोडीला ज्येष्ठ कलाकारांचा प्रवासही दमदार आहे हे टिझर वरूनच कळतंय. तर एकदम कडक म्हणत तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या लक्षणीय अभिनेत्रींच्या कामाची पोचपावती टिझरवरून येतेय. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत एकदम कडक चित्रपटातून अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत. चित्रपटाच्या टिझरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली असून येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे. 


तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला


अक्षय विलास बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रॉडक्शन निर्मित 'सुमी' (Sumi) या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित  करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये आनंदी, मनमुराद हसणारी 'सुमी' (Sumi) दिसतेय. एका महत्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची कहाणी असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. 'सुमी' 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' ठरला असून या चित्रपटातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार' या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 'सुमी'मध्ये स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका असून अजय गोगावले यांनी या चित्रपटात गाणं गायले असून संगीतकार रोहन-रोहन यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. 'सुमी' लवकरचं प्लॅनेट मराठी ओटीटीच्या (Planet Marathi Ott) माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.


Jitendra Joshi : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर येणार जितेंद्र जोशी


Jitendra Joshi On Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  नेहमी वेगवेगळे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर उपस्थिती लावतात. आता महाराष्ट्राचा लाडका जितेंद्र जोशी हास्याच्या मंचावर उपस्थिती लावणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.