Entertainment News Live Updates 9 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 09 Dec 2022 12:29 PM
Salman Khan,Pooja Hegde: 32 वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्रीला 56 वर्षाचा सलमान करतोय डेट? चर्चेला उधाण

Salman Khan,Pooja Hegde: बॉलिवूडचा भाईजान आशी ओळख असणाऱ्या सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सलमान हा त्याच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.सध्या एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत सलमान खानचं नाव जोडलं जात आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे(Pooja Hegde) ही सध्या सलमान खानला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. या दोघांच्या नात्याबाद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 



The Legend of Maula Jatt: 'राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार...'; पाकिस्तानी चित्रपट ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ बाबत अमेय खोपकर यांचे ट्वीट

The Legend of Maula Jatt:  'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' (The Legend of Maula Jatt) या पाकिस्तानी चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  हा चित्रपट 13 ऑक्टोबरला रिलीज झाला.  'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' मध्ये अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  हा चित्रपट पकिस्तानासोबतचन अन्य काही देशांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता मनसे नेते अमेय खोपकर  (Ameya Khopkar) यांनी ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


पाहा ट्वीट: 





Aamir Khan: आमिर खाननं केलं कलश पूजन, किरणसोबत केली आरती; फोटो व्हायरल होताच नेटकरी म्हणाले...

Aamir Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान(Aamir Khan) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. आमिरनं त्याच्या आमिर खान प्रोडक्शन्सच्या ऑफिसमध्ये पूजेचे आयोजन केले. यावेळी आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव (Kiran Rao) यांनी आरती देखील केली. आमिर आणि किरण यांच्यासोबतच आमिर खान प्रोडक्शन्सच्या स्टाफ मेंबर्सनं देखील या पूजेला हजेरी लावली. नुकतेच सोशल मीडियावर आमिरच्या आमिर खान प्रोडक्शन्सच्या ऑफिसमध्ये झालेल्या पूजेचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 



Akshay Kumar: खिलाडी कुमारनं पहिल्यांदाच चाहत्यांना दाखवलं त्याचं मुंबईतलं आलिशान घर; दिली नव्या ब्रँडची माहिती

Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar) नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय हा त्याच्या नव्या ब्रँडची माहिती चाहत्यांना देताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ: 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Top Actors OTT In 2022 : कार्तिक आर्यनपासून ते कुणाल खेमूपर्यंत 'या' कलाकारांनी ओटीटीवर धुमाकूळ घातला; येथे आहे संपूर्ण यादी


Top Actors OTT In 2022 : यावर्षी, कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कुणाल खेमूने (Kunal Khemu) OTT वर प्रदर्शित केलेल्या त्यांच्या चित्रपटांमधून जबरदस्त काम करून चाहत्यांना खूश करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या अभिनेत्यांसह इतर अनेक कलाकारांनीही ओटीटीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. कार्तिक आर्यन, कुणाल खेमूशिवाय यावर्षी इतर कोणते अभिनेते प्रेक्षकांना खूप आवडले ते जाणून घ्या.  


Singham Again : 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण दिसणार 'लेडी सिंघम'च्या भूमिकेत; दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिली माहिती


Singham Again : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पहिल्यांदाच एका चित्रपटात लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा चित्रपट बनवणार असून या चित्रपटाचे नाव 'सिंघम अगेन' (Singham Again) असे असणार आहे. रोहित शेट्टीने यापूर्वी दीपिका पदुकोणबरोबर 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस' (Chennai Express) या चित्रपटात काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.   


बॉलिवूड अभिनेता अजय देवगण 'सिंघम अगेन'मध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे आणि दीपिका पदुकोण कॉप युनिव्हर्समध्ये लेडी कॉपच्या भूमिकेत येणार आहे. दीपिका पदुकोणबरोबर 'सिंघम अगेन'मध्ये काम करणार अशी माहिती स्वत: रोहित शेट्टीने आज मुंबईत त्याच्या आगामी 'सर्कस' (Cirkus) या चित्रपटातील 'करंट लगा रे' या गाण्याच्या लाँचच्या वेळी केली. 


Most Searched South Films : RRR ते KGF 2; 2022 मध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला; जाणून घ्या सर्वाधिक सर्च केलेले 'टॉप 10' चित्रपट


 


2022 मध्ये सर्वाधिक सर्च केलेले दहा सिनेमे (Top 10 Movies) : 


1. ब्रम्हास्त्र : पार्ट वन (Brahmastra : Part One)
2. केजीएफ : चॅप्टर 2 (KGF : Chapter 2)
3. द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files)
4. आरआरआर (RRR)
5. कांतारा (Kantara)
6. पुष्पा: द राइज (Pushpa : The Rise)
7. विक्रम (Vikram)
8. लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha)
9. दृश्यम 2 (Drishyam 2)
10. थोर: लव्ह अॅन्ड थंडर (Thor : Love And Thunder)


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.