Entertainment News Live Updates 7 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 07 Dec 2022 03:02 PM
Kantara Ott Release: प्रतीक्षा संपली! ओटीटीवर हिंदीमध्ये पाहता येणार 'कांतारा', 'या' दिवशी होणार रिलीज

Kantara:   'कांतारा' (Kantara)   या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार? असा प्रश्न अनेकांना प्रेक्षकांच्या पडला होता. आता हा चित्रपट हिंदी भाषेत ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच ऋषभ शेट्टीनं एक व्हिडीओ शेअर करुन या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती दिली.



Jivachi Hotiya Kahili : भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी 'जिवाची होतिया काहिली'

Jivachi Hotiya Kahili : भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) ही मालिका आहे. मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी या मालिकेत पाहायला मिळत आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. रेवथी आणि अर्जुनचं सत्य अप्पांसमोर येणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 



Honey Singh: घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय हनी सिंह? व्हायरल व्हिडीओनं चर्चेला उधाण

Honey Singh: प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंह (Honey Singh) त्याच्या गाण्यांनी नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. हनी सिंहच्या (Yo Yo Honey Singh) स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळते. गेल्या काही दिवसांपासून हनी सिंह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हनी सिंह आणि त्याची एक्स वाईफ शालिनी तलवार (Shalini Talwar) यांचा घटस्फोट काही दिवसांपूर्वी झाला. घटस्फोटानंतर आता हनी सिंह एका तरुणीच्या प्रेमात पडला आहे, असं म्हटलं जात आहे. 



TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेला टप्पूने ठोकला रामराम

TMKOC Tapu Quits The Show : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेली 14 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शैलेश लोढाने ही मालिका सोडली होती. आता शैलेशनंतर या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकने (Raj Anadkat) या मालिकेला रामराम ठोकला आहे. 





Akshay Kumar Troll : 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटातील अक्षयचा लूक पाहून भडकले नेट

Akshay Kumar Troll : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात खिलाडी कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ शेअर केल्यापासून या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून टीका केली जात आहे. 





Mazhi Tuzhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील अभिनेत्री रुग्णालयात दाखल

Swati Deval : 'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत परीच्या मामीच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री स्वाती देवलला (Swati Deval) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. 





Rajinikanth : 'थलायवा' रजनीकांत यांचा 'बाबा' 20 वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर

Rajinikanth : सिनेसृष्टीला कोरोनाचा मोठा फटका बसला. कोरोनाकाळात अनेक बिग बजेट सिनेमे सिने-रसिकांना सिनेमागृहात वळवण्यात कमी पडले. पण आता पुन्हा एकदा सिनेसृष्टीला सुगीचे दिवस येऊ शकतात. सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) 'बाबा' हा सिनेमा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहात पाहता येणार आहे.





Akshaya Hardeek Wedding : महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

Akshaya Hardeek Wedding  : अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) ही महाराष्ट्राची लाडकी जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या लाडक्या जोडीला व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. 





Aryan Khan : आर्यन खानला मिळाला मोठा ब्रेक

Aryan Khan First Directorial Project : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लाडका लेक आर्यन खान (Aryan Khan) आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. आर्यन सिनेसृष्टीत येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. पण आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. 



North Korea : उत्तर कोरियाच्या दोन विद्यार्थ्यांना चित्रपट पाहणं पडलं महागात

North Korea Student Death : उत्तर कोरियाच्या (North Korea) दोन विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियन आणि अमेरिकन चित्रपट पाहणं महागात पडलं आहे. दक्षिण कोरियन आणि अमेरिकन पाहिल्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने (Kim Jong Un) दोन विद्यार्थ्यंना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा दावा करण्यात आला आहे. उत्तर कोरियामध्ये इतर देशाचं संगीत आणि चित्रपट पाहण्यावर बंदी आहे. कुणीही असं करताना आढळल्यास त्याला कठोर शिक्षा दिली जाते.  

Vinay Apte : चतुरस्त्र रंगकर्मी विनय आपटेंबद्दल जाणून घ्या...

Vinay Apte : निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता अशा विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे चतुरस्त्र रंगकर्मी म्हणजे विनय आपटे (Vinay Apte). त्यांनी अनेक नाटक, सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मराठीसह त्यांनी हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 


Vinay Apte Death Anniversary : भारदस्त आवाज, थेट भिडणारी नजर, सटल अभिनय... दूरचित्रवाणीच्या प्रांगणात नावीन्याचा ध्यास घेतलेले विनय आपटे

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Shah Rukh Khans Pathaan Look: हातात बंदुक अन् भेदक नजर; पठाणमधील शाहरुखचा खास लूक


Shah Rukh Khans Pathaan Look:  बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असाणारा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याचा पठाण  (Pathaan)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे करणार आहेत. पठाणचं नवं पोस्टर नुकतच प्रदर्शित झालं असून या पोस्टरमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत. 


Vishal Nikam : "पुन्हा इथे येण्यास..."; 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशाल निकमची खास पोस्ट


Vishal Nikam : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावं यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात तिसऱ्या पर्वातील काही स्पर्धक वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून सहभागी झाले होते. यात बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकमचादेखील (Vishal Nikam) सहभाग होता. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशाल निकमने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे,"हक्काच्या घरी नवीन लोकांसोबत नवीन खेळ खेळायला जबरदस्त मज्जा आली. तिसऱ्या पर्वाचे 100 आणि चौथ्या पर्वाचे सात असा 107 दिवसांचा प्रवास केला आहे. पुन्हा इथे येण्यास तयार असेन नक्कीच". 


Akshay Kumar: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार


Vedant Marathe Veer Daudale Saat: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedant Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अक्षयनं आज एक पोस्ट शेअर करुन चित्रपटाबाबत माहिती दिली. आता नुकताच अक्षयनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. 


Mohandas Sukhtankar : ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन


Mohandas Sukhtankar : ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर (Mohandas Sukhtankar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 मुंबईतल्या राहत्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहनदास सुखटणकर  यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली. तसेच त्यांच्या नाट्य प्रवासात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ते ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.