एक्स्प्लोर

7th December In History : अभिनेते विनय आपटे यांची पुण्यातिथी, पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे विमान कोसळले , इतिहासात 7 डिसेंबर  

On This Day In History : जेष्ठ नाट्यदिग्दर्शक, निर्माते, अभिनेते आणि मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तीमत्व विनय आपटे यांचे  7 डिसेंबर 2013 रोजी निधन झाले.

On This Day In History : 7 डिसेंबर हा दिवस इतिहासात अनेक महत्वाच्या घटनांनी नोंद आहे. आजच्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर 1941 रोजी जपानी बॉम्बर्सनी हवाई येथील अमेरिकन नौदल तळ असलेल्या पर्ल हार्बरवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सहा युद्धनौका, 112 नौका आणि 164 लढाऊ विमाने नष्ट झाली. शिवाय या हल्ल्यात  2400 हून अधिक अमेरिकन सैनिक मारले गेले. याबरोबरच आजच्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर 2001 रोजी अफगाणिस्तानातील तालिबानने कंदाहारचा त्यांचा किल्ला सोडला. त्यामुळे 61 दिवसांच्या युद्धाचा शेवट झाला. 

 1825 : बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे जहाज भारतात पोहोचले

 आजच्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर 1825 रोजी बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे जहाज भारतात पोहोचले. हे जहाज प्रथम कोलकत्यामध्ये आले होते.

1941 : जपानी सैन्याने हवाई येथील अमेरिकन नौदल तळ पर्ल हार्बरवर हल्ला केला
आजच्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर 1941 रोजी जपानी बॉम्बर्सनी हवाई येथील अमेरिकन नौदल तळ असलेल्या पर्ल हार्बरवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सहा युद्धनौका, 112 नौका आणि 164 लढाऊ विमाने नष्ट झाली. शिवाय या हल्ल्यात  2400 हून अधिक अमेरिकन सैनिक मारले गेले.

1975 : इंडोनेशियन सैन्याने पूर्व तिमोर ताब्यात घेतले. 

पूर्व तिमोर हा दक्षिणपूर्व आशियातील एक देश आहे. पूर्व तिमोर 16 व्या शतकात पोर्तुगालने राज्य केले आणि पोर्तुगालने माघार घेईपर्यंत पोर्तुगीज तिमोर म्हणून ओळखले जात असे. पूर्व तिमोरने 1975 मध्ये आपले स्वातंत्र्य घोषित केले. परंतु, एका वर्षानंतर इंडोनेशियाने आक्रमण करून देशावर कब्जा केला आणि तो आपला 27 वा प्रांत म्हणून घोषित केला.  

1988 : आर्मेनियाच्या वायव्य भागात झालेल्या जोरदार भूकंपामुळे अनेक शहरे उद्ध्वस्त झाली 

आजच्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर 1988 रोजी आर्मेनियामध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. यामध्ये 25 हजार लोकांचा मृत्यू झाला. तर सुमारे एक लाख लोक बेघर झाले होते. स्पिटक आणि ग्युमरी शहरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपामुळे आर्मेनियामधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली होती.   

1995 : इन्सॅट 2C या संप्रेषण उपग्रहाचे प्रक्षेपण 

7 डिसेंबर 1995 रोजी इन्सॅट 2C या संप्रेषण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण  करण्यात आले. 
 
2001 :   अफगाणिस्तानातील तालिबानने कंदाहारचा त्यांचा किल्ला सोडला

7 डिसेंबर 2001 रोजी अफगाणिस्तानातील तालिबानने कंदाहारचा त्यांचा किल्ला सोडला. त्यामुळे 61 दिवसांच्या युद्धाचा शेवट झाला. 

2004 : हमीद करझाई यांनी अफगाणिस्तानचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

2001 मध्ये अफगाणिस्तानातील तालिबानने कंदाहारचा त्यांचा किल्ला सोडला. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2004 मध्ये हमीद करझाई यांनी अफगाणिस्तानचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली

2013 :  ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन 

जेष्ठ नाट्यदिग्दर्शक, निर्माते, अभिनेते आणि मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तीमत्व विनय आपटे यांचे  7 डिसेंबर 2013 रोजी निधन झाले. 1947 साली दूरदर्शनच्या माध्यामातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहण्याची वेळ या कलाकारावर आली नाही. चित्रपट असो वा नाटक प्रत्येक ठिकाणी आपला वेगळा ठसा आणि वेगळी ओळख विनय आपटेंनी निर्माण केली. मराठी चित्रपटसृष्टीतील भारदस्त आवाज आणि तेवढ्याच ताकदीचा कलाकार चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीने गमावलाय. त्यांच्या अभिनयाची दखल हिंदी चित्रपटसृष्टीला सुद्धा घ्यावी लागली होती. कुठे खलनायक तर कुठे चरित्र अभिनेता या भूमिका त्यांनी तेवढ्याच ताकदीने साकारल्या आणि जीवंत केल्यात. टेलिव्हिजन, चित्रपट आणि रंगभूमीवरचा चतुरस्त्र आणि वेगळ्या जातकुळीचा अभिनेता ओळखले जाणारे विनय आपटे अनेक मराठी कलाकारांचे गुरु होते.

2016 :  पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे विमान कोसळले 

 7 डिसेंबर 2016 रोजी पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे पीके 661 हे विमान कोसळले. यात 47 लोकांचा मृत्यू झाला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Hathras Stempede: पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Kamal Haasan Movie : कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दरTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :03 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :  7:30 AM:  03 JULY  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Hathras Stempede: पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Kamal Haasan Movie : कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
Shahrukh Khan :  किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Embed widget