Vinay Apte Death Anniversary : भारदस्त आवाज, थेट भिडणारी नजर, सटल अभिनय... दूरचित्रवाणीच्या प्रांगणात नावीन्याचा ध्यास घेतलेले विनय आपटे
Vinay Apte : चतुरस्त्र रंगकर्मी अशी विनय आपटे यांची ओळख आहे.
Vinay Apte Death Anniversary : निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता अशा विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे चतुरस्त्र रंगकर्मी म्हणजे विनय आपटे (Vinay Apte). त्यांनी अनेक नाटक, सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मराठीसह त्यांनी हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
विनय आपटे यांनी विद्यार्थीदशेत असताना 'मॅन विदाऊट शॅडो' या नाटकाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं. अभिनेते, दिग्दर्शक असणाऱ्या विनय आपटेंनी पुढे 'गणरंग' या संस्थेच्या माध्यमातून अनेक कलाकृतींची निर्मिती केली. दूरचित्रवाणीच्या प्रांगणातला नावीन्याचा ध्यास घेतलेले सर्जनशील कलावंत म्हणून विनय आपटे ओळखले जात.
मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून विनय आपटेंच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 'नाटक', 'गजरा','युवावाणी' अशा अनेक दर्जेदाक कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली होती. विनय आपटेंना भारदस्त आवाजाची देणगी लाभली होती. त्यामुळेच त्यांनी अनेक माहितीपट आणि जाहिरातींना आपला आवाज दिला होता. तसेच ते एक उत्कृष्ट सूत्रसंचालकदेखील होते.
विनय आपटेंनी दिला पहिला ब्रेक
आज प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अनेक कलाकारांना विनय आपटे यांनी पहिला ब्रेक दिला आहे. यात महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोडे, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णीसह अनेक कलाकारांचा समावेश आहे.
'दुर्वा' ठरली शेवटची मालिका
'मी नथुराम गोडसे बोलतोय' या बहुचर्चित वादग्रस्त ठरलेल्या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा विनय आपटेंनी सांभाळली होती. विजय तेडुंलकरांच्या अनेक नाटकांत त्यांनी अभिनय केला होता. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या लोकप्रिय मालिकेत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. 'दुर्वा' ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
भारदस्त आवाज, थेट भिडणारी नजर आणि सटल अभिनय अशी विनय आपटे यांची ओळख होती. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा तिन्ही क्षेत्राची विजय तेडुंलकरांना उत्तम जाण होती. एकांकिका, प्रायोगिक, हौशी, व्यावसायिक रंगभूमी, मालिका आणि सिनेमांत विनय आपटेंनी वेगळेपणा राखला होता.
विनय आपटेंचं व्यक्तिमत्तव अत्यंत उठावदार होतं. त्यांना अभिनय प्रेक्षकांना थक्क करत असे. मनोरंजन क्षेत्रात विनय आपटे यांनी चार दशकं काम केलं आहे. तेडुंलकरांपासून ते प्रदीप दळवींपर्यंत अनेकांच्या उत्कृष्ट संहितांना हा परिसस्पर्श लाभला आहे.
संबंधित बातम्या