Entertainment News Live Updates 6 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jul 2022 05:52 PM
Govinda Net Worth : आलिशान बंगला, लक्झरी गाड्या...गोविंदा आहे कोट्यवधींचा मालक

Actor Govinda Net Worth : गोविंदाने (Govinda) 'इल्जाम' (Ilzaam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अभिनय आणि नृत्याने त्याने जगभरातील चाहत्यांना वेड लावलं आहे. सध्या गोविंदाची क्रेझ कमी झालेली असली तरी गोविंदा नव्वदच्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेता होता. सध्या तो पूर्वीसारखं काम करत नसला तरी आजही तो कोट्यवधींचा मालक आहे.

Vithala Tuch : 'तूच माझा प्राण सखा..तूच माझा पाठीराखा..!; 'विठ्ठला तूच' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Vithala Tuch : सध्या सर्वत्र विठ्ठलमय वातावरण आहे. विठ्ठल सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. या विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेंचा खडतर प्रवास 'विठ्ठला तूच' (Vithala Tuch) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

777 Charlie : '777 चार्ली'ने 25 दिवसांत केली कोट्यवधींची कमाई; रक्षित करणार सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत

'777 चार्ली' (777 Charlie) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. हा दाक्षिणात्य सिनेमा सध्या जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 20 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 25 दिवसांत 80.48 कोटींची कमाई केली आहे. 



Sharad Ponkshe : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावरकरांना मानवंदना, हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं : शरद पोंक्षे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या मुंबईतील विविध ठिकाणी भेटी देत आहेत. भर पावसात एकनाथ शिंदे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले. मंगळवारी एकनाथ शिंदेंनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिदेंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यासंदर्भात अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

दिशानं रिजेक्ट केल्या या बिग बजेट चित्रपटांच्या ऑफर्स

Disha Patani : अभिनेत्री  दिशा पाटनी (Disha Patani) ही लवकरच एक व्हिलन रिटर्न्स (Ek Villain Returns) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिशा तिच्या अभिनयानं आणि फिटनेसनं नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिपोर्टनुसार, दिशानं काही बिग बजेट चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. जाणून घेऊयात दिशानं रिजेक्ट केलेल्या बिग बजेट चित्रपटांबाबत...


वाचा सविस्तर बातमी

अर्जुननं शेअर केला मलायकासोबतचा खास फोटो

बिट्टू घेणार टप्पूची जागा? राज अंदकतनं शो सोडल्याची चर्चा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. पण अनेक कलाकार सध्या हा शो सोडून जात आहेत. त्यामुळे या शोमध्ये काही नव्या कलाकारांची एन्ट्री होणार आहे,असं म्हटलं जात आहे.  लवकरच बिट्टू (Bittu) हा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये सहभागी होणार आहे. आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की बिट्टू हा टप्पूची जागा घेणार आहे की नाही? काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, टप्पू ही भूमिका साकारणारा अभिनेता राज अंदकत (Raj Anadkat) हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्यानं तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सोडला आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

Chhavi Mittal : 'तू सहानभूती मिळवत आहेस'; कॅन्सरमुक्त झालेल्या छवी मित्तलचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Chhavi Mittal : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री छवी मित्तल  (Chhavi Mittal) ही तिच्या कॅन्सर लढ्यामुळे चर्चेत आहे.  छवी मित्तलवर 25 एप्रिल रोजी ब्रेस्ट कॅन्सरची अर्थात स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर छवी कॅन्सरमुक्त झाली आहे. छवी सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करुन लोकांना तिच्या कॅन्सर लढ्याबाबत माहिती देत आहे. पण एका नेटकऱ्यानं छवीला ट्रोल केलं आहे. या ट्रोलरच्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन छवीनं ट्रोलर करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 


वाचा सविस्तर बातमी

जान्हवी कपूरनं शेअर केला वरुण धवनसोबचा खास फोटो

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


‘अनन्या’च्या भावना व्यक्त झाल्या 'न कळत'; रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता ‘अनन्या’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हृता दुर्गुळे आणि चेतन चिटणीस यांच्यात खुलत जाणारे हळूवार नाते यात दिसत आहे. ‘न कळत’ असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडेचा सुमधूर आवाज या गाण्याला लाभला आहे. तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून समीर साप्तीसकर यांनी गाण्याला संगीत दिले आहे.


संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित


गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'तमाशा लाईव्ह'. या चित्रपटाचे नावच इतके निराळे आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक दिसत आहे. 'तमाशा लाईव्ह'मध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या 15 जुलै रोजी हा भव्य चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


'साई तुझं लेकरू'; 'टाइमपास 3' मधील धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण दोन भागांमध्ये पाहिले आहे. दगडूचे हेच साईप्रेम 'टाइमपास 3' मध्येही पाहायला मिळणार आहे. 'साई तुझं लेकरू' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून साईच्या चरणी दगडूचे कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत.


बहुचर्चित 'आर्या'चा तिसरा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; निर्मात्यांनी केली घोषणा


बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुष्मिता सेनच्या बहुचर्चित 'आर्या' या वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे. लेडी डॉनच्या भूमिकेत पुन्हा एकदा सुष्मिता सेन दिसणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.