Entertainment News Live Updates 5 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Sep 2022 11:51 PM
अमिताभ बच्चन हे नाव आता ‘म्युझिक कंपोझर’ म्हणून झळकणार

दिग्दर्शक आर बल्की आणि अमिताभ बच्चन ही जोडी आपण बऱ्याचदा एकत्र पाहिली आहे. असं म्हंटलं जातं की बल्की यांना अमिताभ यांच्याबरोबर काम करायचं होतं म्हणूनच त्यांनी ‘चीनी कम’सारखा चित्रपट लिहिला. आता बल्की यांच्या आगामी ‘चूप’ या चित्रपटातसुद्धा अमिताभ बच्चन यांचा सहभाग असणार आहे. पण अभिनेता म्हणून नव्हे तर यावेळी बच्चन यांचं नाव पडद्यावर चक्क संगीत संयोजक म्हणून झळकणार आहे.

Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' मालिकेतील कर्णिकांनी घेतलं लालबागच्या राजाच्या दर्शन

Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) ही मालिका नुकतीच सुरू झाली असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. आता पर्यंतच्या भागात प्रेक्षकांनी पाहिलं आहे की कर्णिकांच्या घरी गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला आहे. त्यामुळे रमा सहित सर्व मंडळी फारच खुश आहे. आता मालिकेतील राघव, चिंगी आणि आनंदीने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. 



Chandramukhi : 'चंद्रमुखी'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

Chandramukhi : बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेल्या 'चंद्रमुखी' (Chandramukhi) सिनेमाचा 25 सप्टेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. 'चंद्रमुखी' सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील 'चंद्रा' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. 

Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

Maharashtrachi Hasya Jatra : मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकदेखील दर्शनासाठी जात आहेत. मुंबईतील लालबागच्या राजावर अनेकांची श्रद्धा आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी पुन्हा एकदा राजाचं दर्शन भाविकांना घेता येणार असल्यानं सगळ्यांमध्ये उत्साह आहे. आता हास्यजत्रेतील (Maharashtrachi Hasya Jatra) दमदार विनोदवीरांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. 



Bigg Boss marathi 4 : ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ लांबणीवर

‘बिग बॉस सीझन 4’ची घोषणा झाल्यापासून चाहते आणि प्रेक्षक यावेळी घरात कोण कोण असणार याचे कयास बांधत आहेत. मात्र, आता चाहत्यांना आणखी काही काळ या शोची वाट पाहावी लागणार आहे. ‘बिग बॉस मराठी 4’ सप्टेंबर महिन्यात सुरु होणार अशी चर्चा होती. मात्र, हा याला आणखी थोडा विलंब लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Babli Bouncer Trailer : 'बबली बाउंसर'चा ट्रेलर रिलीज

Tamannaah Bhatia Babli Bouncer Trailer : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. तमन्ना भाटिया सध्या तिच्या आगामी 'बबली बाउंसर' (Babli Bouncer) सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमाचा ट्रेलरदेखील रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये तमन्नाचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 





सनी देओलच्या 'चुप' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

सनी देओलच्या 'चुप' या चित्रपटाचा

शिक्षक दिनानिमित्त निम्रत आणि राधिका यांच्या 'हॅप्पी टीचर्स डे' चित्रपटाची घोषणा; टीझर रिलीज

Koffee With Karan 7: कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडचा मजेशीर प्रोमो रिलीज; ईशान, सिद्धांत अन् कतरिना करणार धमाल!

अक्षय कुमारने फ्लॉप चित्रपटांचं खापर फोडलं कपिल शर्मावर! म्हणाला ‘याच्यामुळे माझे चित्रपट...’

सध्या बॉलिवूडला ‘बॉयकॉट’चं ग्रहण लागलं आहे. यातच बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचे (Akshay Kumar) चित्रपट सलग फ्लॉप ठरले आहेत. मात्र, आता त्याने आपल्या चित्रपटांच्या अपयशाचं खापर अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्मावर (Kapil Sharma) फोडलं आहे.


 





प्राजक्ता माळीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कुटुंबासोबत घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन!

कार्तिक आर्यनला लागली मोठी लॉटरी! ‘आशिकी 3’मध्ये झळकणार मुख्य भूमिकेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली रोहित शेट्टीची भेट!

सुष्मिता अन् ललित मोदींच्या नात्यात बिनसलं? अवघ्या दोन महिन्यांत ब्रेकअपची चर्चा!

नुकताच ललित मोदी यांनी आपल्या सोशल मीडियाचा डीपी बदलला आहे आणि बायोमधून अभिनेत्रीचे नाव देखील काढून टाकले आहे. यामुळे आता दोघांचे ब्रेकअप झाल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. यानंतर आता सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.


 





‘मी खूप अस्वस्थ झालेय’, सोनाली फोगाट यांनी दिग्दर्शकाला कॉल करून सांगितली होती आपली व्यथा!

भाजप नेत्या आणि ‘बिग बॉस’ फेम सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता सोनाली फोगाट हत्याकांडप्रकरणी (Sonali Phogat Murder Case) यूपीच्या चित्रपट दिग्दर्शकाने मोठा खुलासा केला आहे. सीतापूरमध्ये राहणारे दिग्दर्शक मोहम्मद अक्रम म्हणाले की, सोनाली यांच्या मृत्यूच्या 20 दिवस आधी त्यांचे सोनालीशी बोलणे झाले होते. यावेळी त्या  खूप अस्वस्थ वाटत होत्या.


वाचा संपूर्ण बातमी

Urvashi Rautela : ट्रोलिंगनंतर पुन्हा भारत-पाकिस्तान सामना बघायला गेली उर्वशी रौतेला; नेटकरी म्हणाले, 'ऋषभ पंत...'

उर्वशीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती  भारत-पाकिस्तान सामना बघताना दिसत आहे. या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं उर्वशीच्या पोस्टला कमेंट केली, 'ऋषभ पंतला बघायला गेली असेल' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'तू तर क्रिकेट मॅच बघत नाही ना? '





हॅप्पी बर्थडे पंकज त्रिपाठी!

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये शी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!

‘लायगर’ फ्लॉप होताच निर्मार्ती चार्मी कौरने पोस्ट लिहित सोशल मीडियावरून घेतला ब्रेक!

'लायगर' बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर करण जोहर आणि चार्मी कौर यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच, चार्मी कौरने आता काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


सोनालीच्या कुटुंबाकडून गोवा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी हायकोर्टात जाणार!


भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी केलेल्या तपासावर असमाधान व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यासाठी गोवा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा पोलिसांचे पथक गेल्या चार दिवसांपासून हरियाणातील हिसारमध्ये तपासासाठी असून, गोवा पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावेही मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे.


दणक्यात पार पडला ‘सुपरस्टार सिंगर 2’चा महाअंतिम सोहळा, मोहम्मद फैज ठरला विजेता!


छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘सुपरस्टार सिंगर 2’चा (Superstar Singer 2) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. स्पर्धक मोहम्मद फैज (Mohammad Faiz) याने या पर्वाची ट्रॉफी जिंकली आहे. सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर 2’ला अखेर तीन महिन्यांच्या तगड्या स्पर्धेनंतर आपला विजेता (Superstar Singer 2 Winner) मिळाला आहे. जोधपूरच्या मोहम्मद फैजने या शोचे विजेतेपद जिंकत लोकांच्या प्रेमासोबत 15 लाख रुपये बक्षीस म्हणून जिंकले आहेत.


‘कौन बनेगा करोडपती 14’च्या मंचावर कॉमनवेल्थ गेम्स विजेत्यांचा सन्मान


अलीकडे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022(Common Wealth Games 2022)  मधील भारताच्या कामगिरीचा गौरव करत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती 14’मध्ये (KBC 14) येत्या आठवड्यात या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणार्‍या साइखोम मीराबाई चानू (Saikhom Mirabai Chanu) (वेटलिफ्टिंग) आणि निखत झरीन (Nikhat Zareen) (बॉक्सिंग) यांचे हॉटसीटवर स्वागत करण्यात येणार आहे. होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासमोर बसून या दोघी या खेळातही जेव्हा एक एक उत्तरे देत मोठ्या रकमेच्या जवळ पोहोचतील, तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच वाढत जाईल.


लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन


मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील अमृताची लावणी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूप आवडली. परळीच्या नाथ प्रतिष्ठान आयोजित केलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. यानंतर आता अमृता खानविलकर हिने चाहत्यांना आणी प्रेक्षकांना आपल्या महाराष्ट्राच्या कलेला बदनाम करू नका, असे आवाहन केले आहे.


'विक्रम वेधा'चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर!


अभिनेता हृतिक रोशन मोठ्या ब्रेकनंतर ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) अभिनित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि रिलीज डेट नुकतीच जाहीर झाली आहे. बहुप्रतिक्षित 'विक्रम वेधा' हा चित्रपट टीझर लाँच झाल्यापासून लक्ष वेधून घेत आहे. उत्कंठावर्धक टीझरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कुतूहल जागवले आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मेकर्सनी या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे, ज्यात चित्रपटातील दोन्ही कलाकार जबरदस्त अवतारात दिसत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.