Entertainment News Live Updates 5 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 05 Oct 2022 02:44 PM
Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब झळकणार 'प्रेम प्रथा धुमशान' सिनेमात;

Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) आता 'प्रेम प्रथा धुमशान' (Prem Pratha Dhumshaan) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 28 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 





Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’च्या घरात सोशल मीडिया स्टार किली पॉलची एन्ट्री होणार! पाहा खास प्रोमो...

‘बिग बॉस 16’मध्ये (Bigg Boss 16) रोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सुरुवातीपासूनच या शोने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. दरम्यान, आता टांझानियन डान्सर आणि इंटरनेट सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) सलमान खानच्या वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’मध्ये एन्ट्री घेणार आहे.


 





Prasad Kambli : भद्रकाली'चं नाटकाकडून स्क्रीनकडे सीमोल्लंघन

Prasad Kambli On Bhadrakali Studios : 'भद्रकाली प्रोडक्शन' हे मराठी नाट्यसृष्टीतील एक महत्त्वाचं प्रोडक्शन आहे. मच्छिंद्र कांबळी यांनी भद्रकालीची सुरुवात केली असून आता त्यांचा मुलगा प्रसाद कांबळी (Prasad Kambli) हा वारसा पुढे चालवत आहे. 'भद्रकाली प्रोडक्शन'च्या 57 नाट्यकृती आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आता भद्रकाली प्रोडक्शनने नाटकाकडून स्क्रीनकडे सीमोल्लंघन केलं आहे.


Chanakya : पाठीवर दिसतोय वार, 'हा' नेता नक्की कोण असणार? 'चाणक्य'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता!

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या आठ वर्षांत अतर्क्य उलथापालथ झाली असून, या राजकीय नाट्याचा थरार आता आगामी ‘चाणक्य’ (Chanakya) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय महानाट्यांचा हा वास्तवदर्शी चरित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता निलेश नवलाखा या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करत असून, 2023मध्ये हा प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं धडाकेबाज पोस्टर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लाँच करण्यात आले.


 





Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात रंगणार या पर्वातलं पहिलं साप्ताहिक कार्य

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' (Bigg Boss Marathi 4) नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून आता टास्कलादेखील सुरुवात झाली आहे. या पर्वातील पहिल्या साप्ताहिक कार्याला काल सुरुवात झाली आहे. 'दे धडक - बेधडक' असं या कार्याचं नाव आहे. 



Baap Manus Movie: 'बाप माणूस' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस ; पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकरची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

Baap Manus Movie:  निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग (Pushkar Jog) यांच्या निर्मिती संस्था अनुक्रमे आनंद पंडित मोशन पिक्चर्स  आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी एकत्रित निर्मिती करत असलेल्या 'बाप माणूस' या चौथ्या चित्रपटाची घोषणा आज दसरा सणाचे औचित्य साधून सोशल मीडियावर केली. या चित्रपटाचे शूटिंग देखील लंडन मध्ये होणार आहे . 



Ponniyin Selvan box office collection : 'पोन्नियिन सेलवन'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट

Ponniyin Selvan box office collection Day 5 : 'पोन्नियिन सेलवन' (Ponniyin Selvan) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केलेला 'पोन्नियिन सेलवन' बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. अशाप्रकारे आतापर्यंत 'पोन्नियिन सेलवन' या सिनेमाने 153.05 कोटींची कमाई केली आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. 

Nimisha Sajayan : 'द ग्रेट इंडियन किचन'ची नायिका मराठीत

Nimisha Sajayan : 'हवाहवाई' (Hawahawai) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून 'द ग्रेट इंडियन किचन'फेम निमिषा सजयनने (Nimisha Sajayan) मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'हवाहवाई' सिनेमात निमिषाने ज्योती पवार हे पात्र साकारलं आहे. 

PHOTO : पलक तिवारीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले घायाळ! पाहा फोटो...

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आणि 'बिजली बिजली' गाणे फेम अभिनेत्री पलक तिवारी आजकाल सतत चर्चेत असते. पलक तिच्या कामापेक्षा बोल्ड फोटोशूटमुळेच अधिक चर्चेत आहे. दररोज ती वेगवेगळे फोटोशूट करताना दिसते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला फक्त लाईकच करत नाहीत, तर कमेंट करून तिचे कौतुकही करतात. दरम्यान, पलक पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. यादरम्यान तिचा लूक पाहून चाहते पुन्हा घायाळ झाले आहेत.


 





PHOTO : श्रीदेवीच्या लेकीचा बोल्ड अंदाज; सोशल मीडियावर चर्चेत आलेयत खुशी कपूरचे फोटो!



 


Sonu Sood Video : सोनू सूदने पुन्हा जिंकलं चाहत्यांचं हृदय! लक्झरी कार्ससोडून रेल्वेने केला प्रवास, पाहा व्हिडीओ..

नुकतीच सोनू सूदने रेल्वे सफर केली आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे. सोनू सूदने (Sonu Sood Video) आपल्या या व्हिडीओमधून स्टेशनवरचे आयुष्य दाखवले आहे. संघर्षाच्या दिवसात त्याने देखील ट्रेनने खूप प्रवास केला होता. सोनू म्हणतो की, इथले जीवन जसे आहे, तसे इतर कुठेच नाही. या व्हिडीओ तो कधी प्लॅटफॉर्मच्या बाकड्यावर झोपलेला, तर कधी नळाचे पाणी पिताना दिसतो आहे.


 





Bigg Boss 16 : अब्दु रोजिकला नॉमिनेट करणं सौंदर्याला पडलं महाग!

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या पर्वातील पहिला एलिमिनेशन राऊंड लवकरच पार पडणार आहे. यासाठी वोटिंगदेखील सुरू झाले आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये स्पर्धक एकमेकांना नॉमेनेट करताना दिसत आहेत. दरम्यान अब्दु रोजिकला (Abdu Rozik) नॉमिनेट करणं सौंदर्याला (Soundarya Sharma) महाग पडलं आहे. 



Mukesh Khanna on Adipurush : ‘आदिपुरुष’च्या वादात मुकेश खन्नांची उडी; म्हणाले ‘हे कोणतं रामायण?’

'आदिपुरुष'चा (Adipurush) टीझर रिलीज झाल्यानंतर सुरू झालेल्या वादात नेत्यांनंतर आता कलाकारांकडून प्रतिक्रिया येत आहेत. 'रामायण' (Ramayan) या प्रसिद्ध मालिकेमध्ये ‘भीष्म’ साकारणाऱ्या मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी आता या टीझरबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.


 





अभिनेत्री अँजेलिना जोलीने पूर्वपती ब्रॅड पिटवर केला गैरवर्तनाचा आरोप!

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांनी 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या जोडीला 6 मुले आहेत. हे प्रकरण 2016चे आहे.  या केसमध्ये आपली बाजू मांडताना अँजेलिनाने म्हटले होते की, एका खाजगी विमानात ब्रॅडने तिच्याशी गैरवर्तन केले होते. यावेळी दाम्पत्याची मुलेही त्याचा विमानात उपस्थित होती. रिपोर्ट नुसार, अँजेलिनाने एफबीआय अधिकाऱ्याला सांगितले की, ब्रॅडने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यावेळी त्यांची मुलेही त्यांच्यासमोर होती.


वाचा संपूर्ण बातमी

Godfather Advance Booking : चिरंजीवी-भाईजानच्या 'गॉडफादर'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली कोट्यवधींची कमाई

Godfather Advance Booking : 'गॉडफादर' या सिनेमाची दाक्षिणात्य सिनेप्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ओपनिंग डे चे या सिनेमाने 1.10 लाख तिकीट विकले आहेत. तर दाक्षिणात्य सिने-रसिकांनी अॅडव्हांस बुकिंगमध्ये  2.46 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. तर 'गॉडफादर'च्या हिंदी वर्जनचे रिलीजआधीच 10 लाख तिकीट विकले गेले आहेत. त्यामुळे रिलीजआधीच या सिनेमाने पाच कोटींची कमाई केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 





Adipurush : आदिपुरुषच्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊतने सोडलं मौन

ओम राऊत म्हणाला,"सध्याच्या मुलांना रामायणाबाबत जास्त माहित नाही. त्यामुळे रामायणावर आधारित हा सिनेमा बनवला आहे. जेणेकरुन सिनेमाच्या माध्यमातून सिनेरसिकांना यासंदर्भात माहिती मिळेल. हा अॅनिमेशन सिनेमा नसून लाईव्ह अॅक्शन सीन्स या सिनेमासाठी चित्रित करण्यात आले आहेत". 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'पोन्नियिन सेल्वन' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; 250 कोटींचा टप्पा पार


शुक्रवारी (30 सप्टेंबर) 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटानं 39 कोटींचे कलेक्शन केले. तर शनिवारी (1 ऑगस्ट) या चित्रपटानं 36 कोटींचे कलेक्शन केले आहे. तसेच या चित्रपटानं रविवारी (2 ऑगस्ट) या चित्रपटानं 39 कोटींची कमाई केली आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 250 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 80 कोटींचे कलेक्शन केलं. अमेरिकेमध्ये या चित्रपटानं चार दिवसात 4.13 मिलियन डॉलर एवढी कमाई केली आहे.


बॉक्स ऑफिसवरही दिसतेय ‘ब्रह्मास्त्र’ची जादू! पटकावला जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान  


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra)  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने रिलीजनंतरच्या अवघ्या 25 दिवसांत 425 कोटींचा व्यवसाय केला आहे. मणिरत्नम यांचा 'PS-1' चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’चा वेग मंदावला असला, तरी अयान मुखर्जीच्या या चित्रपटाने विक्रम नोंदवला आहे. रणबीर-आलिया स्टारर या चित्रपटाने कन्नड रॉकिंग स्टार यशच्या पॅन इंडिया चित्रपट 'KGF 2'ला बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीतही मागे टाकले आहे. यंदाच्या वर्षात जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान ‘ब्रह्मास्त्र’ने पटकावला आहे.


उर्मिला मातोंडकरचं ओटीटी विश्वात पदार्पण; 50 पेक्षा अधिक सिनेमे नाकारल्यानंतर आता झळकणार Tiwari वेबसीरिजमध्ये


उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) मनोरंजनसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. बालकलाकार ते सुपरस्टार असा उर्मिलाचा प्रवास आहे. या प्रवासात तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. आता उर्मिला ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. लवकरच तिची 'तिवारी' (Tiwari) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सत्या', 'एक हसीना थी', 'भूत', 'रंगीला' 'कौन', 'पिंजर' अशा अनेक सिनेमांत उर्मिलाने काम केलं आहे. आता 'तिवारी' या वेबसीरिजच्या माध्यमातून उर्मिला ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. कमान सौरभ वर्माने या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


'आटली बाटली फुटली'; 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातलं पहिलं वहिलं नॉमिनेशन कार्य


'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून सगळीकडे 'बिग बॉस मराठी 4'ची चर्चा सुरू आहे. कालच्या भागात त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद हे चार सदस्य निरुपयोगी ठरले होते. पण बिग बॉसने सदस्यांना 'रुम ऑफ फॉर्च्युन' हे खास सरप्राईझ दिले. आजच्या भागात 'आटली बाटली फुटली' हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.


लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान ओडिशाचे लोकप्रिय गायक मुरली प्रसाद महापात्रा यांचे निधन


ओडिशाचे (Odia) लोकप्रिय गायक मुरली प्रसाद महापात्रा (Murali Mohapatra) यांचे निधन झाले आहे. दुर्गापूजेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर गाणं गात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ओडिशाच्या जेपोर शहरात दुर्गापूजेदरम्यान एका लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुरली प्रसाद महापात्रादेखील गाणं म्हणत होते. कार्यक्रमादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.