Entertainment News Live Updates 5 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 05 Jan 2023 02:45 PM
Tunisha Sharma : 'जेव्हा कोणी माझ्याबरोबर नसताना तुम्ही उभे राहाल'; शिझानच्या आईबरोबर तुनिषाचे चॅट व्हायरल

Tunisha Sharma : 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता तुनिषा शर्माने शीजानच्या आईला मेसेज केला की ती झोपली आहे का? ज्याचे उत्तर आले नाही. त्यानंतर तुनिषाने पुन्हा 12 ऑक्टोबर रोजी मेसेज केला. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की,


हे चॅट 12 ऑक्टोबरचे आहेत. ज्यामध्ये तुनिषाने शिझानच्या आईला मेसेज केला आहे की, 'जेव्हा कोणीही माझ्याबरोबर उभे नाही, तेव्हा मला माहित आहे की तुम्ही किंवा आपी (शिझानची बहिण) नेहमीच उभे राहतील. मी तुम्हा दोघींवर खूप प्रेम करते. काळजी करू नका सर्व काही ठीक होईल. मी तुमच्याबरोबर आहे. या मेसेजला उत्तर देताना शिझानची आई लिहिते की, 'बेटा तू नेहमी आनंदी राहा, तुझी तब्येत चांगली राहो, फक्त आमेन.' तुनिषा आणि शिझानच्या आईची ही चॅट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



Pathaan: पठाण चित्रपटामधील काही दृश्यांना कात्री; सेन्सॉरच्या सूचनेनंतर बदलले 'हे' शब्द

Pathaan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट काही दिनवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. पठाण चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी फिल्ममेकर्सला दिली होती. आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने पठाण चित्रपटाला UA प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटामधील गाण्यामध्ये आणि डायलॉग्समध्ये बदल करण्यात आले आहेत. 


संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Date Bhet: प्रेमाच्या महिन्यात आता होणार 'डेट भेट'; 24  फेब्रुवारीला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Date Bhet:  अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत  'डेट भेट' (Date Bhet) या आगामी चित्रपटाच्या पोस्टर चे अनावरण नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आले. सोनाली कुलकर्णी , हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'डेट भेट' 24  फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. 





Sonu Sood: 'असं करु नका', सोनू सूदच्या व्हिडीओला रेल्वे प्रसाशनाचा रिप्लाय; अभिनेत्यानं मागितली माफी

Sonu Sood: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सोनू हा वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो. काही दिवसांपूर्वी सोनू सूदनं एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला आता उत्तर रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. उत्तर रेल्वे प्रशासनाच्या या रिप्लायनंतर सोनूला माफी मागावी लागली. 



Varisu Trailer:  अॅक्शन आणि रोमान्सचा तडका; विजय अन् रश्मिकाच्या 'वरिसु' चा ट्रेलर रिलीज

Varisu Trailer:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काल (4 जानेवारी) विजयच्या वरिसु (Varisu) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ट्रेलरमधील अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि विजयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


Tunisha Sharma: 'तुझी आठवण येते...'; तुनिषा शर्माच्या बर्थ-डेला शिझानच्या बहिणीनं शेअर केली पोस्ट

Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma)  वयाच्या 20 व्या आत्महत्या केली. तिच्या निधनानं अनेकांना धक्का बसला. तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा-दास्तान ए काबुल' या मालिकेच्या सेटवर गळफास घेतला. काल (4 डिसेंबर) तुनिषाचा वाढदिवस होता. यानिमित्तानं शिझानची बहिण फलक नाजनं (Falaq Naaz) सोशल मीडियावर तुनिषासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. 



Rushad Rana Wedding: वयाच्या 43व्या वर्षी अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर; लग्न सोहळ्याचे फोटो व्हायरल

Rushad Rana Wedding:  हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता रुशद राणा (Rushad Rana) हा वयाच्या 43 व्या  दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. क्रिएटिव्ह डायरेक्टर केतकी वालावलकरसोबत (Ketaki Walavalkar) रुशद राणानं लग्नगाठ बांधली आहे. रुशद राणा हा अनुपमा या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारतो.  रुशद राणाच्या लग्नसोहळ्याला अनुपमा मालिकेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


C Ramchandra Death Anniversary: अभिनेता व्हायचं होतं झाले संगीतकार, 800 पेक्षा जास्त गाणी संगीतबद्ध; जाणून घ्या सी. रामचंद्र यांचा प्रवास...


C Ramchandra : संगीतकार रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र (C Ramchandra) यांनी अनेक गाणी गायली आहेत. संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द कायमच झळाळती राहिली. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी 120 हिंदी, सात मराठी, पाच तामिळ, तीन तेलुगु आणि एका भोजपुरी बोलपटात त्यांनी आठशेहून अधिक गाणी संगीतबद्ध केली. त्यात 35 हून अधिक गाणी त्यांनी स्वत: गायली आहेत. संगीतदिग्दर्शक आणि पार्श्वगायक रामचंद्र नरहर चितळकर हे 'सी. रामचंद्र' या नावाने हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय होते. तसेच त्यांना 'अण्णा' असेही म्हटले जात. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीताची अतोनात आवड होती. नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले. 


Vaalvi Trailer : दिसतं तसं नसतं... 'वाळवी'चा रहस्यमय ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला


Vaalvi Trailer Out : 'वाळवी' हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' (Vaalvi) 
या सिनेमात  पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच या सिनेमाचा जबरदस्त टिझर अगदी अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यामुळे या सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात आता 'वाळवी'चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चं शूटिंग कसं झालं? जाणून घ्या एकाचवेळी कसं जमवलं अभिनय अन् दिग्दर्शन...


Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)


आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) देशमुखचा 'वेड' (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात रितेशने अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका बजावली आहे. रितेशने एकाचवेळी अभिनय आणि दिग्दर्शन कसं जमवलं यासंदर्भात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक रोहन कोतेकर म्हणाला,"दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करताना रितेश देशमुख वेगवेगळ्या दृष्टीने काम करतात. कॅमेऱ्यासमोर काम करताना रितेश आपले शंभर टक्के देतातच पण कॅमेऱ्या मागे काम करतांना देखील त्यांनी आपले शंभर टक्के देले आहेत. दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही भूमिका मध्ये स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ करणं त्यांना उत्तमप्रकारे जमलं आहे".

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.