एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 31 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 31 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

ती परत आलीय... धमाकेदार लूकसह जेनिफर विंगेटचे इन्स्टाग्रामचे पुनरागमन, एका महिन्यानंतर शेअर केल्या किलर अदा

Jennifer Winget Comeback On Instagram: टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, मात्र ती गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवरून गायब होती. आता या अभिनेत्रीने धमाकेदार पुनरागमन केले असून तिच्या पुनरागमनाने चाहतेही खूश आहेत. जेनिफर विंगेटने एका जबरदस्त लूकसह इन्स्टाग्रामवर कमबॅक केलं आहे.

जेनिफर विंगेटने (Jennifer Winget) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकामागून एक असे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये जेनिफर विंगेटचा किलर लूक पाहायला मिळत आहे. तिने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे, तेच फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत. ब्लू-रेड प्रिंटेड लेहेंग्यात जेनिफरची स्टाईल पाहण्यासारखी आहे. हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Maidaan Teaser:  'मैदान में उतरेंगे...'; अजयच्या मैदानचा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस

Maidaan Teaser:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. नुकताच त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता त्याचा मैदान (Maidaan) हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. अजयनं सोशल मीडियावर मैदान या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अजयनं मैदान या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Anushka Sharma: अनुष्का शर्माला हायकोर्टाचा दणका; विक्री कर विभागाच्या थकबाकी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली

Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushka Sharma) हायकोर्टानं दणका दिला आहे. 2012-13 आणि 2013-14 मधील थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने (Sales Tax Department) बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्काने हायकोर्टात याचिका दाकल केली होती. आता अनुष्काची ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. अपिलीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टानं अनुष्काला दिले आहेत.  तिथं दिलासा नाही मिळाला तर पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा अनुष्काला देण्यात आली आहे. लवादाची व्यवस्था असताना, थेट हायकोर्टात का आलात? असा सवाल हायकोर्टनं अनुष्काला विचारला आहे. विक्रीकर विभागाचा युक्तिवाद हायकोर्टानं मान्य केला आहे. 

 
 
17:25 PM (IST)  •  31 Mar 2023

Javed Akhtar : आरएसएस- तालिबान तुलना प्रकरण; 20 एप्रिलला जावेद अख्तरांची सुनावणी

Javed Akhtar : लोकप्रिय लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर (Javed Akhtar) सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली होती. त्यानंतर याप्रकरणी मुलुंड न्यायालयात त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. आज यावर सुनावणी होणार होती. पण जावेद अख्तर आज न्यायालयात येऊ न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 

16:21 PM (IST)  •  31 Mar 2023

'Brahmastra 2' कधी रिलीज होणार?

Brahmastra 2 : 'ब्रह्मास्त्र'च्या पुढील भागाबद्दल बोलताना अयान मुखर्जी म्हणाला, "ब्रह्मास्त्र 2' हा सिनेमा देवच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. 'ब्रह्मास्त्र 2' आणि 'ब्रह्मास्त्र 3'च्या शूटिंगला एकत्र सुरुवात होणार आहे. 'ब्रह्मास्त्र 2' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित व्हायला आणखी तीन वर्षे लागतील". त्यामुळे 2026 मध्ये 'ब्रह्मास्त्र 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

14:57 PM (IST)  •  31 Mar 2023

Post Office Ughad Aahe : 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिका तीन महिन्यांतच घेणार प्रेक्षकांचा निरोप

Post Office Ughad Aahe Marathi Serial : 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe) या वेगळ्या धाटणीच्या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. नव्वदच्या दशकातला पोस्ट ऑफीसचा काळ या मालिकेत दाखवल्याने प्रेक्षकांनीदेखील या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

14:27 PM (IST)  •  31 Mar 2023

KKBKKJ Song Out : 'किसी का भाऊ किसी की जान' मधील नवं गाणं रिलीज

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan New Song : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता सिनेमातील 'बथुकम्मा' (Bathukamma) हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

13:32 PM (IST)  •  31 Mar 2023

Raavrambha : ओम भूतकरच्या 'रावरंभा'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट

Raavrambha Marathi Movie : गेल्या काही दिवसांत अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हे सिनेमे यशस्वी ठरत आहेत. लवकरच 'रावरंभा' (Raavrambha) हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anup Jagdale (@anupjagdale_official)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Somnath Suryawanshi Case | सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून 50 लाखांचे आमिषABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 05 January 2025Job Majha | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात निम्न श्रेणी लिपिक पदावर भरती ABP MajhaVIDEO |  100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Embed widget