Entertainment News Live Updates 31 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Jul 2022 06:13 PM
आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बहिष्कार घालण्याची नेटकऱ्यांची मागणी

Laal Singh Chaddha on Twitter : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) Laal Singh Chadda : 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chadda) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियावर या सिनेमावर बहिष्कार टाकला जात आहे. #BoycottLaalSinghChaddha हे सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. 

Madhavan Meets Rajinikanth : 'रॉकेट्री'च्या यशानंतर रजनीकांतने घेतली आर. माधवनची भेट

Actor R Madhavan Meets Rajinikanth : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा इस्रो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर रजनीकांतने (Rajinikanth) आता आर. माधवनची भेट घेतली आहे. 

हार्दिक जोशी बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये होणार सहभागी

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रोमो शेअर करण्यात आला. आता या कार्यक्रमात 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्रींचा ट्विटरला रामराम

The Kashmir Files Director Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'चे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सध्या चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्रींनी नुकताच ट्विवटरला रामराम केला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी ट्रोलिंगला कंटाळून ट्विटरला रामराम ठोकला आहे. आता विवेक अग्निहोत्रींनी ट्विटरला अलविदा केल्याने सोशल मीडियावर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. 

Ranveer Singh : रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, 'मला तुला असंच बघायचंय...'

Ranveer Singh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीरच्या न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंना कमेंट करुन अनेकांनी रणवीरचं कौतुक केलं तर काहींनी त्याला ट्रोल देखील केलं. आता रणवीरच्या फोटोशूटवर राखी सावंतनं (Rakhi Sawant) प्रतिक्रिया दिली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

Kangana Ranaut Defamation Case : 'बहिण रंगोली चंदेलचा जबाब नोंदवा'; कंगनाची न्यायालयाकडे विनंती

Kangana Ranaut Defamation Case : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मानहानीची तक्रार दाखल केली होती. यानंतर कंगनानेही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात वेगळी वळणं येतं आहेत. आता ‘पंगा क्वीन’ कंगनान न्यायालयाकडे एक विनंती केली आहे. बहिण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) हिचा जबाब नोंदवण्याची विनंती कंगनानं मुंबई न्यायालयालाकडे केली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

Khatron Ke Khiladi 12 : प्रतीक सहजपाल ‘खतरों के खिलाडी 12’ मधून आऊट? घेत होता एवढं मानधन

Pratik Sehajpal : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता प्रतीक सहजपालचा (Pratik Sehajpal) चाहता वर्ग मोठा आहे. प्रतीकनं नेहमीच त्याच्या पर्सनॅलिटीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) आणि  ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) या शोमधून प्रतीक प्रेक्षकांच्या भेटीस आला. सध्ये तो ‘खतरों के खिलाडी 12’ (Khatron Ke Khiladi 12) मध्ये वेगवेगळे स्टंट परफॉर्म करत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित शेट्टी (Rohit Shetty) करतो.  प्रतीक हा खतरों के खिलाडी 12 मधून आऊट होणार आहे, अशी चर्चा होत आहे. 


वाचा सविस्तर बातमी

Kareena Kapoor: तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवर करीनानं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी मशीन आहे का?'

Kareena Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.  काही दिवसांपूर्वी करीना ही पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि तैमुर, जेह या तिच्या मुलांसोबत लंडनमध्ये ट्रिपला गेली होती. तेव्हा तिचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमुळे करीना तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर करीनानं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करुन ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. आता एका मुलाखतीमध्ये देखील करीरानं तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

Nirmala Mishra : गायिका निर्मला मिश्रा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nirmala Mishra : प्रसिद्ध बंगाली गायिका निर्मला मिश्रा (Nirmala Mishra) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दक्षिण कोलकाता येथील चेतला भागातील राहत्या घरात निर्मला मिश्रा यांनी अखेरचा श्वास घेतला. बालाकृष्णा दास पुरस्कारानं निर्मला मिश्रा यांना गौरवण्यात आलं होतं.  रात्री बारा वाजून पाच मिनीटांना निर्मला मिश्रा यांना हृदयविकाराचा झटका आला होता, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. 


वाचा सविस्तर बातमी 

Mohammed Rafi : जगाचा निरोप घेण्याआधी मोहम्मद रफींनी 'हे' गाणं केलं होतं रेकॉर्ड ; वयाच्या 13 व्या वर्षी केला पहिला परफॉर्मन्स

Mohammed Rafi : बॉलिवूडमधील एव्हरग्रीन गाणी गाणारे मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांचा आज स्मृतीदिन.  मोहम्मद रफींची गाणी आजही लोक आवडीनं ऐकतात. आपल्या सुरेल आवाजाने  मोहम्मद रफींनी अनेकांची मनं जिंकली. सध्याची तरुण पिढी देखील मोहम्मद रफींची गाणी आवडीनं ऐकते. एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या या आवाजाच्या 'जादूगार' चा जीवनप्रवास अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात मोहम्मद रफी यांच्याबद्दल...


वाचा सविस्तर बातमी 

Ek Villain Returns: 'एक व्हिलन रिटर्न्स' ठरणार फ्लॉप? दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली नाही जादू, पाहा कलेक्शन

Ek Villain Returns : जॉन अब्राहम (John Abraham), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि दिशा पाटनी (Disha Patani) अशी तगडी स्टारकास्ट असणारा  'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns)  हा चित्रपट शुक्रवारी (29 जुलै) रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर संथ गतीनं सुरुवात केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...


वाचा सविस्तर बातमी 

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा जबदस्त लूक; शेअर केला खास फोटो

अल्लू अर्जुनचा जबदस्त लूक; शेअर केला खास फो

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Alia Bhatt On Twins : रणबीर कपूरनं जुळ्या मुलांबाबत केलेल्या वक्तव्यावर आलियाची रिअॅक्शन; म्हणाली...



Ranbir Alia : सध्या सगळीकडेच अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे.  काही दिवसांपूर्वी या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तरानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. रणबीरनं दिलेल्या एका उत्तरामुळे त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधत होते. रणवीरच्या जुळ्या मुलांच्या वक्तव्यावर आता आलियानं प्रतिक्रिया दिली आहे.


Pathaan Poster : प्रतीक्षा संपली; 'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लुक आऊट


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच 'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) फर्स्ट लुक आऊट झाला आहे. दीपिका पदुकोणचा 'पठाण' सिनेमातील लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमात दीपिका अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे. दीपिकाचा एक वेगळी लुक या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दीपिका लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शाहरुखने दीपिकाचा लुक शेअर करत लिहिलं आहे,"तिला केवळ गोळीने घायाळ करण्याची गरज नाही".


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.