Entertainment News Live Updates 31 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 31 Jan 2023 03:50 PM
Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Prabhakar More: हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश; सांस्कृतिक कोकण विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी

Prabhakar More: प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे (Prabhakar More) यांनी राष्ट्रवादीमध्ये (Nationalist Congress Party) प्रवेश घेतला आहे. त्यांना सांस्कृतिक कोकण विभागाच्या अध्यक्ष पादाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 


Pathaan : जाणून घ्या शाहरुखच्या 'पठाण'च्या यशाचं रहस्य काय?

Shah Rukh Khan Pathaan Success Story : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) कधीही न पाहिलेला अॅक्शन मोड, चार वर्षांनी लार्जर दॅन लाइफ हिरोचं रुपेरी पडद्यावर झालेलं जोरदार कमबॅक चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. तर दुसरीकडे 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) बिकीनीच्या रंगामुळे या सिनेमाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण तरीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 


Pathaan : 'बेशरम रंग' ते बॉयकॉटच्या धमक्या! अ‍ॅक्शन आणि फाईट सीक्वेन्सची उत्कृष्ट बांधणी; जाणून घ्या शाहरुखच्या 'पठाण'च्या यशाचं रहस्य काय?

Tu Chal Pudha : तू चाल पुढं! मालिकेमुळे गृहिणीला मिळालं प्रोत्साहन; 'अश्विनी ब्युटी पार्लर'चं स्वप्न सत्यात उतरलं!

Tu Chal Pudha : मालिकेचं कथानक आणि त्यांचे सासू-सुनांचे तेच तेच विषय अशा अनेक गोष्टींमुळे मराठी मालिकांना ट्रोल करण्यात येते. पण सध्या मराठी मालिका विश्वात नव-नवे प्रयोग होत आहेत. आता या मालिकेच्या माध्यमातन एका गृहिणीला प्रोत्साहन मिळालं आहे. अश्विनी नामक एका गृहिणीने अश्विनी ब्युटी पार्लर उघडण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आता तिचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. 





Shah Rukh Khan: शाहरुखनं दीपिकासाठी गायलं गाणं

Shah Rukh Khan: पठाणबरोबरच ‘ओम शांति ओम’ आणि 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटांमध्ये शाहरुखनं दीपिकासोबत काम केलं. आहे. पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शाहरुखनं त्याच्या ‘ओम शांति ओम’  या चित्रपटातील ‘आंखों में तेरी’ हे गाणं दीपिकासाठी गायलं. 



Alka Yagnik: गायिका अलका याज्ञिक यांच्या आवाजाची जादू; टेलर स्विफ्ट, BTS ला टाकलं मागे; केला 'हा' रेकॉर्ड

Alka Yagnik: हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) या त्यांच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अलका यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. अलका यांची गाणी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षक आवडीनं ऐकतात. गायिका अलका याज्ञिक यांनी सलग तिसऱ्या वर्षी यूट्यूबच्या (You Tube) स्ट्रिम लिस्टमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. यामुळे त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.  टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यांसारख्या जगातील सर्वात प्रसिद्ध गायकांना मागे टाकत अलका यांनी यूट्यूबवरील स्ट्रिम चार्टमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2022 मध्ये नेटकऱ्यांनी अलका यांची गाणी सर्वाधिक ऐकली आहेत. 



Pathaan Worldwide Box Office Collection Day 6: शाहरुख बॉक्स ऑफिसचा 'बाजीगर'; 'पठाण'नं सहा दिवसांत केली एवढी कमाई

Pathaan Worldwide Box Office Collection Day 6: रमेश बाला यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन पठाण चित्रपटाच्या कलेक्शनची माहिती दिली. रमेश बाला यांच्या ट्वीटनुसार, पठाणनं सहाव्या दिवशी भारतामध्ये 25 कोटींचे कलेक्शन केलं आहे. लवकरच हा चित्रपट भारतात 300 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जात आहे. तर पठाण या चित्रपटानं सहा दिवसांमध्ये जगभरातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 





Prabhakar More: अभिनेते प्रभाकर मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करणार प्रवेश

Prabhakar More:  अभिनेते प्रभाकर मोरे हे थोडयाच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते मोरे हे पक्ष प्रवेश करणार आहेत.  महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन, शेजारी शेजारी या सारख्या मालिकेत मोरे यांनी काम केले. 

पहिल्यांदाच पाहिलंय तिला, तिची नजर काढ; प्रियांका चोप्राच्या मुलीच्या फोटोंवर नेटकरी फिदा

Priyanka Chopra Reveals Daughter Face: 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच (Bollywood) हॉलिवूडमध्येही (Hollywood) विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) हे सरोगसीच्या माध्यमातून 2022 मध्ये आई-वडील झाले. प्रियांकानं तिच्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) असं ठेवलं. प्रियांका ही मालतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण आतापर्यंत प्रियांकानं मालतीचा चेहरा तिच्या चाहत्यांना दाखवला नव्हता. आता 30 जानेवारी रोजी प्रियांकानं तिच्या लेकीसोबत एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी पहिल्यांदाच मालतीचा चेहरा सर्वांना दिसला. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Baloch : मराठ्यांची विजयगाथा सांगणारा 'बलोच'! प्रवीण तरडे झळकणार मुख्य भूमिकेत


Baloch : सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. प्रकाश पवार दिग्दर्शित 'बलोच' (Baloch) या चित्रपटाचे नवीन पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 


बॉक्स ऑफिसचा बादशाह किंग खान.. तरीही आपला भाऊ काही ऐकत नसतो; रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ची वाटचाल 100 कोटींच्या दिशेने


Ved Vaalvi Marathi Movie Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण दुसरीकडे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' हा सिनेमादेखील 'पठाण'च्या त्सुनामीत चाहत्यांना 'वेड' लावण्यात यशस्वी ठरला आहे. 


'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता सिनेमागृहात या सिनेमाचे 31 दिवस पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या सिनेमाने 70.90 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा 100 कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा सिनेमा नागराज मंजुळेच्या 'सैराट'ला मागे टाकू शकतो. रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. 


Pathaan 2 : आता 'पठाण 2' चित्रपट धुमाकूळ घालणार..., 'पठाण'च्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदची घोषणा


Siddharth Anand On Pathaan 2 : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पाच दिवसांत हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पहिल्या भागाला मिळत असलेल्या यशानंतर सिद्धार्थने आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'पठाण 2'ची (Pathaan 2) घोषणा केली आहे. 


Aarya 3 Teaser : आधी सिगारचा झुरका, नंतर बंदुक केली लोड; सुष्मिताच्या 'आर्या 3' च्या टीझरची जोरदार चर्चा


Sushmita Sen Aarya Season 3 Teaser : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) 'आर्या' (Aarya) या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून लवकरच या वेबसीरिजचा तिसरा सीझन (Aarya 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा टीझर आऊट झाला आहे. टीझरमध्ये सुष्मिताचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.