68th National Film Awards 2022 : 68 व्या 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्याला सुरुवात

National Film Awards 2022 Live Updates : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 30 Sep 2022 05:15 PM
68th National Film Awards 2022 : चित्रपटांसाठी अनुकूल राज्य - मध्यप्रदेश

68th National Film Awards 2022 : चित्रपटांसाठी अनुकूल राज्य -  मध्यप्रदेश

68th National Film Awards 2022 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार

68th National Film Awards 2022 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

68th National Film Awards 2022 : 68 व्या 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्याला सेलिब्रिटींची हजेरी

68th National Film Awards 2022 : 68 व्या 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्याला सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. 

National Film Awards : 'गोष्ट एका पैठणी'ची लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

National Film Awards : 'गोष्ट एका पैठणी' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

68th National Film Awards 2022 : 68 व्या 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्याला सुरुवात

68th National Film Awards 2022 : 68 व्या 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्याला सुरुवात झाली आहे. 

Bigg Boss 16 : 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे झळकणार भाईजानच्या 'बिग बॉस'मध्ये

Bigg Boss 16 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. भाईजानचा बिग बॉस सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. युट्यूबर अब्दु राजिकनंतर (Abdu Razik) आता आणखी एक नाव समोर आलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अर्थात मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thakare) 'बिग बॉस 16' या प्रेक्षकांच्या लाडक्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 

Richa Chadha Ali Fazal : रिचा चड्ढा आणि अली फजल लवकरच अडकणार लग्नबंधनात

Richa Chadha Ali Fazal Marriage Pics : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांच्या लग्नासोहळ्याला सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियावर रिचा आणि अलीचे प्री-वेडिंग कार्यक्रमाचे फोटो व्हायरल होत आहेत. 





Rashmika Mandanna : ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करणार रश्मिका मंदना!

‘आशिकी 3’ (Aashiqui 3) या बहुचर्चित चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. तेव्हापासून या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या निवडीबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अशी चर्चा होती की, दीपिका पदुकोण (Deepika Padukone), क्रिती सेनन (Kriti Sanon) किंवा श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यापैकी एक या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकू शकते. मात्र, त्यानंतर रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) देखील या असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता रश्मिकाने या शर्यतीत बाजी मारल्याचे दिसते आहे.


 



Bigg Boss Marathi 4: ‘अर्धवट कपड्यांत नृत्य, मराठी कार्यक्रमात हिंदी गाणी’, ‘मराठी बिग बॉस’च्या प्रोमोवर प्रेक्षक नाराज!

नुकतेच ‘बिग बॉस मराठी सीझन 4’चे दोन प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. यात 2 महिला स्पर्धक मंचावर धमाकेदार नृत्य करताना दिसत आहेत. यातून त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी, प्रेक्षकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रोमोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणाऱ्या अभिनेत्री अतिशय तोकडे कपडे परिधान करून हिंदी गाण्यांवर नृत्य करताना दिसत आहेत. हे पाहून आता मराठी प्रेक्षक आणि चाहते मात्र चिडले आहेत. त्यांनी या प्रोमोवर कमेंट करत मेकर्सना धारेवर धरले आहे.


 





Vikram Vedha Review : ‘हृतिक म्हणजे अमिताभ बच्चन अन् अल्लू अर्जुनची कॉपी’, केआरकेने दिला ‘विक्रम वेधा’चा रिव्ह्यू!

केआरकेने (KRK) चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल ट्विट केले आहे. त्याचवेळी केआरकेने ‘विक्रम वेधा’चा रिव्ह्यू देखील दिला आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये या चित्रपटाची अ‍ॅक्शन भोजपुरी चित्रपटांपेक्षा वाईट असल्याचे म्हटले आहे. केआरकेने अर्थात कमाल राशिद खान याने ट्विटरवर ‘विक्रम वेधा’चा रिव्ह्यू दिला आहे. मात्र, आपण नाही तर आपल्या मित्राने हा चित्रपट पाहिल्याचे त्याने म्हटले आहे.


 





Akanksha Mohan: मॉडेल, अभिनेत्री, डान्सर अन् इंजिनिअर, तरीही संपवावं वाटलं आयुष्य! जाणून घ्या कोण होती आकांशा मोहन

Akanksha Mohan: मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरात खळबळजनक घटना घडली. एका हॉटेलच्या रुममध्ये आकांशा मोहन या 30 वर्षीय मॉडेलने आत्महत्या (Suicide) केली. पंख्याला गळफास घेत या मॉडेलने तिचं आयुष्य संपवलं. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. "आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. कोणाला डिस्टर्ब करु नका," असं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. जाणून घेऊयात आकांशा मोहनबाबत...


आकांशा ही मॉडेल आणि अभिनेत्री होती. तिनं काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 16 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या सिया या चित्रपटामध्ये आकांशानं शेफाली ही भूमिका साकारली होती. सिया चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो आकांशा सोशल मीडियावर शेअर करत होती. आकांशा ही वेगवेगळ्या जाहिरातींसाठी मॉडेल म्हणून काम करत होती. तसेच वेगवेगळ्या ब्रँडसाठी तिनं फोटोशूट देखील केलं.

प्रभासच्या ‘आदिपुरुष’ पहिलं पोस्टर रिलीज! अभिनेत्याच्या लूकवर खिळल्या नजरा

साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे. साऊथ सुपरस्टार प्रभासच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि प्रभासचा जबरदस्त लूक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रभास भगवान श्री रामाप्रमाणे धनुष्यबाण लक्ष्य साधताना दिसत आहे. या पोस्टरवर त्याचा तपस्वी लूक पाहायला मिळाला आहे.


 





Happy Birthday Shaan : आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा गायक शान याचा आज वाढदिवस!

सुप्रसिद्ध गायक शान (Shaan) याचा आज (30 सप्टेंबर) वाढदिवस आहे. हिंदी चित्रपट आणि संगीतातील प्रसिद्ध गायक शान याचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला. शान बंगाली कुटुंबातील आहे. त्याचे पूर्ण नाव शंतनू मुखर्जी (Shantanu Mukherjee) आहे. शानने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत हिंदी, बंगाली, मराठी, उर्दू, तेलगू, कन्नड, नेपाळी, उडिया, पंजाबी आणि मल्याळम यासह अनेक भाषांमध्ये गाणी गाऊन संगीतप्रेमींची मने जिंकली आहेत. 


 





भर कार्यक्रमात गायिकेनं कापले केस; हिजाब विरोधी आंदोलनाला दिला पाठिंबा

Iran Hijab Protest: व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गायिका मेलेक ही भर कार्यक्रमात स्टेजवर कात्रीनं केस कापत आहे. मेलेकनं स्टेजवर स्वत:चे केस कापून हिजाब विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला. व्हिडीओमध्ये प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज देखील येत आहे. मेलेकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 



Saif Ali Khan: 'मुलाचं नाव राम ठेवू शकत नाही...' ; सैफच्या जुन्या व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

Vikram Vedha: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) विक्रम वेधा (Vikram Vedha) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो विक्रम ही भूमिका साकारणार आहे. सध्या एका जुन्या व्हिडीओमुळे सध्या नेटकरी सैफला ट्रोल करत आहेत. तसेच 'बॉयकॉट विक्रम वेधा' असा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड होत आहे. सैफच्या या व्हायरल व्हिडीओचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होईल का? असा प्रश्न सध्या सैफच्या चाहत्यांना पडला आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, निर्माती विरोधात ‘अरेस्ट वॉरंट’ जारी!


बिहारमधील बेगुसराय कोर्टाने बॉलिवूडची प्रसिद्ध चित्रपट, टीव्ही आणि वेब सीरिजची निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. एकता कपूरने बनवलेल्या ‘XXX’  या वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीची आक्षेपार्ह प्रतिमा सादर केल्याच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्यात हे वॉरंट काढण्यात आले आहे. बेगुसराय न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या कोर्टातून हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.


ऐश्वर्या रायने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणं का टाळलं? चाहते म्हणतायत याचं कारण सलमान खान!


बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya RaiBachchan) सध्या तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन'च्या (Ponniyin Selvan) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मणिरत्नम (Mani ratnam) दिग्दर्शित हा भव्य चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ऐश्वर्या राय दक्षिणेत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसते आहे. मात्रे, प्रमोशनसाठी तिने 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) जाणे टाळले आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन भागाचा ट्रेलर नुकताच प्रसारित झाला आणि त्यात ऐश्वर्या राय बच्चन वगळता ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ चित्रपटातील सर्व कलाकार दिसले. मात्र, यावेळी ऐश्वर्या राय न दिसल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. अनेक लोक वेगवेगळे तर्क लावत आहेत.


रिक्षा चालकाची मुलगी झळकणार चित्रपटात, ‘प्रेम म्हणजे काय असतं’मध्ये साकारणार मुख्य भूमिका!


कला असली की, व्यक्तीला आपोआपच संधी मिळू लागतात. असचं काहीसं ऋतुजा टंकसाळे (Rutuja Tanksale) हिच्यासोबत घडलंय. साताऱ्याची ऋतुजा टंकसाळे ही नवोदित अभिनेत्री ‘प्रेम म्हणजे काय असतं’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. नव्या दमाच्या कलाकारांनी केलेला 'प्रेम म्हणजे काय असतं' (Prem Mhanje Kay Asat)  हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


रणवीर-दीपिकाच्या नात्यात बिनसलं? चर्चांवर उत्तर देताना रणवीर सिंह म्हणतोय...


बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि ‘बाजीराव’ अर्थात अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हे प्रेक्षकांचे बॉलिवूडमधील सर्वात लाडके जोडपे आहेत. त्यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. दोघांनी 2012 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती आणि 2018 मध्ये इटली पार पडलेल्या एका खाजगी समारंभात त्यांनी लग्न केले. दरम्यान, आता सोशल मीडियावर रणवीर आणि दीपिकाच्या वैवाहिक नात्यात सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु आहे. ही गोष्ट चाहत्यांना कळताच एकच खळबळ उडाली. मात्र, रणवीर सिंहने यावर स्पष्टीकरण दिले आहे.


प्राजक्ता माळीच्या फेसबुक पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, जाणून घ्या काय आहे कारण


अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील तिने काही फोटो पोस्ट केले आहे. परंतु, या फोटोंसाठी दिलेल्या ओळींवरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. प्राजक्ताने हे फोटो लंडनमधून शेअर केले आहेत. त्यात तिने भारताची खूप आठवण येत असल्याचे म्हटले आहे. यावरून काहींनी तिचे कौतुक केले आहे. परंतु, काहींनी तिला ट्रोल केलंय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.