IND vs SA Head-to-Head Playing 11 : टी20 विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. दक्षिण आफ्रिकेनं आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकाची फायनल गाठली आहे. भारतानं टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची ही तिसरी वेळ आहे. 2007 साली भारतानं पाकिस्तानला हरवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2014 सालच्या विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती. आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकासोबत होत आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया 11 वर्षांचा चषकाचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 2013 नंतर भारतीय संघाने कोणताही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. 


भारतीय संघ वरचढ - 


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये शनिवारी टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. टीम इंडिया 11 वर्षांचा चषकाचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरणार आहे, तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच चषक उंचावण्यासाठी आतुर असेल. भारत की दक्षिण आफ्रिका, टी20 विश्वचषकात कुणाचं पारडे जड? आकड्यांनुसार, टी20 सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आतापर्यंत 26 टी20 सामने झाले आहेत. त्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 14 वेळा पराभव केलाय, तर 11 सामन्यात भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भारत आणि दक्षिण आफ्रिका न्यूट्रल ठिकाणी दोन वेळा आमनेसामने आले आहेत. या दोन्हीवेळा टीम इंडियाने विजय मिळवलाय. यावरुन टी20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा दबदबा असल्याचे दिसतेय. पण फायनलमध्ये काय होणार? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंह.


दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेईंग 11 


क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यानसन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तरबेज शम्सी


भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. तर दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा पराभव करत पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश मिळवला. आता दोन्ही संघ शनिवारी आमनेसामने असतील. भारत आणि दक्षिण आफ्रिक दोन्ही संघ या स्पर्धेत अजय आहेत. त्यामुळे अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.