Entertainment News Live Updates 30 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 30 May 2023 03:33 PM
Marathi Serial : "अप्पी आमची कलेक्टर" ते 'लवंगी मिरची'; मराठी मालिकांमध्ये रंगणार वटपौर्णिमा विशेष भाग

Marathi Serials Vat Purnima Special Episode : मराठी मालिकाविश्वात (Marathi Serial) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. आपली मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. कथानकातही नाविण्य आणण्याचा प्रयत्न होत आहे. आता मराठी मालिकांमध्ये वटपौर्णिमा (Vat Purnima) विशेष भाग रंगणार आहे. 

Amar Singh Chamkila Teaser : पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांचे आयुष्य उलगडणार रुपेरी पडद्यावर

Amar Singh Chamkila Teaser Out : पंजाबचे लोकप्रिय गायक अमर सिंह चमकीला (Amar Singh Chamkila) सध्या चर्चेत आहेत. पंजाबी मनोरंजनसृष्टीतील या लोकप्रिय गायकाच्या आयुष्यावर आधारित असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'अमर सिंह चमकीला' असेच या सिनेमाचे नाव आहे. 



Aai Kuthe Kay Karte: आजी आणि अप्पांनी मानले आशुतोषचे आभार; 'आई कुठे काय करते !' मालिकेचा प्रोमो व्हायरल

Aai Kuthe Kay Karte 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील देशमुख कुटुंब सध्या चिंतेत आहे. मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसले की,  यशच्या घरी पोलीस आले आहेत. ते पोलीस म्हणतात, 'आम्हाला यश देशमुखला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याची ऑर्डर मिळाली आहे. यश देशमुखनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.' त्यानंतर देशमुख कुटुंब पोलिसांना सांगते की, यशचा अपघात झाला आहे. आता  आई कुठे काय करते या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आजी आणि आप्पा हे यशची काळजी घेतल्याबद्दल आशुतोषचे आभार मानत आहेत. 



Dipika Kakar : दीपिका कक्करचा अभिनय क्षेत्राला रामराम? चर्चांवर मौन सोडत अभिनेत्री म्हणाली,"बाळाच्या जन्मानंतरच..."

Dipika Kakar On Quit Acting Rumours : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि शोएब इब्राहिम लवकरच आई-बाबा होणार आहेत. बाळाच्या स्वागतासाठी आता दोघेही सज्ज आहेत. आई झाल्यानंतर दीपिका अभिनय क्षेत्राला रामराम करणार असल्याची चर्चा आहे. आता या चर्चांवर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. 

Gargi Nilu Phule Joins NCP : निळू फुले यांची लेक गार्गी फुले यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

Gargi Nilu Phule Joins NCP : गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार राजकारणात एन्ट्री करत आहेत. आता अभिनेते निळू फुले यांची लेक, अभिनेत्री गार्गी फुले (Gargi Nilu Phule) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 


Gargi Nilu Phule Joins NCP : निळू फुले यांची लेक गार्गी फुले यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

CSK vs GT FInal: आयपीएल फायनल मॅच पाहून भारावले बॉलिवूड कलाकार; सोशल मीडियावर सीएसके आणि गुजरात टायटन्सचं केलं कौतुक

CSK vs GT FInal:  चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा पराभव करुन आयपीएलच्या (IPL 2023 Final) ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरलं आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा आनंद या टीमच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चेन्नई सुपर किंग्सला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh), कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. 



Akshay Kumar : अक्षय कुमारने शेअर केला शर्टलेस फोटो; 'त्या' टॅटूने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Akshay Kumar Latest Post : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडामध्ये आहे. शूटिंगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत आहे. आता त्याने हे शूटिंग पूर्ण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.





Adipurush : 'आदिपुरुष'च्या रिलीजआधी कृती सेनन पोहोचली नाशिकच्या पंचवटीत!

Kriti Sanon Visit Temple Before Adipurush Release : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या तिच्या आगामी 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा सिनेमातील लूक आऊट करण्यात आला असून तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आता सिनेमाच्या रिलीजआधी अभिनेत्री नाशकात दाखल झाली आहे.


वाचा सविस्तर





IPL 2023 CSK VS GT : चेन्नईच्या विजयात सहभागी होताना दिसले विकी कौशल अन् सारा अली खान

Vicky Kaushal Sara Ali Khan Watch CSK Vs GT Match : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्यांच्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. नुकतेच ते आयपीएल 2023'चा अंतिम सामना पाहायला गेले होते. तसेच चेन्नईच्या (CSK) विजयातदेखील ते सहभागी झाले. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Uorfi Javed On Wrestlers Protest: जे भल्याभल्यांना जमलं नाही ते धैर्य उर्फीने दाखवलं, कुस्तीपटूंच्या आंदोलनावर म्हणाली...


Uorfi Javed: आपल्या मॉडेलिंग, फोटोशूटमुळे कायम चर्चेत असणारी उर्फी जावेद (Uorfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यामागचे कारण तिचे फोटोशूट नसून तिने केलेले ट्वीट आहे. उर्फीने थेट कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाष्य केले आहे.  अनेक दिग्गज क्रीडापटू कोणतीही भूमिका घेत नसताना दुसरीकडे उर्फी भूमिका घेतल्याने अनेक युजर्सने तिचे कौतुक केले आहे. विनेश फोगाट आणि संगाीता फोगाट यांचे खोटे फोटो व्हायरल करणाऱ्यांना तिने सुनावले आहे. 


Anupamaa: अनुपमा आणि अनुज पुन्हा एकत्र?, मालिकेला येणार रंजक वळण


Anupamaa: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांच्या ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेमध्ये अनेक वेळा ट्वीस्ट येत असतात. प्रेक्षकांच्या पसंतीची असणारी अनुपमा या मालिकेत प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून अनुज आणि अनुपमा यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील दुरावा दूर होऊन ते कधी एकत्र येत आहेत याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाश छोट्या पडद्यावरची क्विन; 'नागिन 6'च्या एका एपिसोडसाठी घेतले एवढे मानधन


Tejasswi Prakash Nagin 6 Serial Fees : 'नागिन 6' (Nagin 6) या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) घराघरांत पोहोचली आहे. 'बिग बॉस 15'मुळे तेजस्वीच्या लोकप्रियतेत वाढ झाली. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'बिग बॉस 15'ची विजेती असलेली तेजस्वी 'नागिन 6' या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. मीडिया रिपोर्टनुसार, 'नागिन 6' (Nagin 6) या मालिकेच्या एका भागासाठी तेजस्वीने (Tejasswi Prakash) दोन लाख रुपये मानधन घेतलं होतं. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.