एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 30 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 30 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Disha-Tiger Breakup: दिशा आणि टायगरचं झालं ब्रेकअप? जॅकी श्रॉफ म्हणाला...

Disha-Tiger Breakup : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असणारी  दिशा पटानी (Disha patani) आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असतात. अनेक वेळा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान किंवा कार्यक्रमांमध्ये दिशा आणि टायगरनं त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळलं. सध्या या दोघांचं ब्रेक-अप झालं आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दोघे जवळपास सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. दिशा आणि टायगरच्या ब्रेक-अपच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.   

वाचा सविस्तर बातमी 

Alia Bhatt On Twins : रणबीर कपूरनं जुळ्या मुलांबाबत केलेल्या वक्तव्यावर आलियाची रिअॅक्शन; म्हणाली...

Ranbir Alia : सध्या सगळीकडेच अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे.  काही दिवसांपूर्वी या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तरानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. रणबीरनं दिलेल्या एका उत्तरामुळे त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधत होते. रणवीरच्या जुळ्या मुलांच्या वक्तव्यावर आता आलियानं प्रतिक्रिया दिली आहे.

Pathaan Poster : प्रतीक्षा संपली; 'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लुक आऊट

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच 'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) फर्स्ट लुक आऊट झाला आहे. दीपिका पदुकोणचा 'पठाण' सिनेमातील लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमात दीपिका अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे. दीपिकाचा एक वेगळी लुक या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दीपिका लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शाहरुखने दीपिकाचा लुक शेअर करत लिहिलं आहे,"तिला केवळ गोळीने घायाळ करण्याची गरज नाही".

19:29 PM (IST)  •  30 Jul 2022

प्रेक्षक कमी झाले नाही त्यांच्या कडे ऑप्शन वाढले : अशोक सराफ

नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान अशोक सराफ म्हणाले, आम्ही चांगले सिनेमे देण्याचा प्रयत्न करतो मात्र काही फसतात. प्रेक्षक कमी झालेले नसून त्यांच्याकडे ऑप्शन वाढले आहेत. 

19:27 PM (IST)  •  30 Jul 2022

ओटीटी मुळे काही फरक पडत नाही : सचिन पिळगावकर

नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान सचिन पिळगावकर म्हणाले, ओटीटीमुळे काही फरक पडत नाही. रिजनल सिनेमांवर अजूनही विश्वास आहे. या सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. याचे उत्तम उदाहरण पुष्पा हा सिनेमा आहे. ओटीटी मुळे काही फरक पडत नाही.

18:05 PM (IST)  •  30 Jul 2022

Ram Setu : भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी अक्षय कुमारवर साधला निशाणा

Akshay Kumar Ram Setu Controversy : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'राम सेतु' (Ram Setu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी खिलाडी कुमार आणि राम सेतु सिनेमावर निशाणा साधला आहे. सुब्रमण्यम स्वामी अक्की यांनी राम सेतू या सिनेमात चुकीचे तथ्य मांडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि राम सेतुच्या टीमवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

17:38 PM (IST)  •  30 Jul 2022

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाशचं नाटक नेहा सहन करू शकेल?

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकताच या मालिकेचा विशेष भाग पार पडला. या भागात अविनाशचं सत्य नेहासमोर आलं. मालिकेत अविनाश सध्या कॅन्सर झाल्याचं नाटक करत आहे. 

17:38 PM (IST)  •  30 Jul 2022

'जवान'चा टीझर पाहून शाहरुखच्या चाहत्यांनी सिनेमागृहात वाजवल्या शिट्ट्या

Shah Rukh Khan Jawan Teaser : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'एक विलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमादरम्यान शाहरुखच्या 'जवान'चा टीझर दाखवण्यात आला. 'जवान' सिनेमाची शाहरुखच्या चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'जवान'चा टीझर पाहून शाहरुखच्या चाहत्यांनी सिनेमागृहात वाजवल्या शिट्ट्या वाजवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget