Entertainment News Live Updates 29 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत तो लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत असून आता ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. केआरकेच्या ट्वीटने या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्याने ट्वीट केलं आहे,"आमिर खान आता त्याच्या मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखसोबत लग्न करणार आहे. 'दंगल' या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं".
Adipurush Ram Siya Ram Song : 'आदिपुरुष' (Adipurush) या बहुचर्चित सिनेमातील 'राम सिया राम' (Ram Siya Ram) हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. रिलीज होताच हे गाणं युट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या गाण्याचे बोल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या गाण्याला एका तासात 1.2 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.
Babil Khan ON IIFA 2023 : 'आयफा 2023' (IIFA 2023) या नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांच्या मुलाला बाबिल खानला (Babil Khan) 'काला' (Qala) या सिनेमासाठी पुरस्कार मिळाला आहे. 'आयफा पुरस्कार 2023'मध्ये बाबिलला सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) या कॅटेगरीतील पुरस्कार मिळाला आहे.
Mi Honar Superstar Jallosh Juniorscha Grand Finale : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम आहे. आता हा कार्यकम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.
Malaika Arora Shared Photo Of Arjun Kapoor: बॉलिवूडची छैय्या छैय्या गर्ल अशी ओळख असलेली मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या फॅशनमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका ही सध्या अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच मलायकानं अर्जुनचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Priyanka Chopra Shared Family Unseen Picnic Photo : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत मजल मारणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या चर्चेत आहे. प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता तिने तिची लाडकी लेक मालती मेरी (Malti Marie) आणि निक जोनाससोबतचा (Nick Jonas) एक गोड फोटो शेअर केला आहे.
Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) आजवर एका पेक्षा एक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बॉलिवूडसह तामिळ, तेलुगू, इंग्रजी, मल्याळम आणि कन्नड सिनेमांतदेखील त्याने काम केलं आहे. नुकत्याच एक पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीने खुलासा केला की,"90 च्या दशकात मला अंडरवर्ल्डमधूल फोन येत असे".
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांत या मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येत आहेत. आता या मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. या मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध आणि वीणा आशुतोषच्या ऑफिसमधून काम करताना दिसणार आहेत.
Sambhaji Raje ON Gautami Patil : कलाकारांना संरक्षण मिळाले पाहिजे, महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. सर्वांनी महिलांच्या पाठिशी उभं राहायला हवं. तसेच गौतमी पाटीलला पाठिंबा द्यायला हवा, असं म्हणत स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी गौतमी पाटीलचं (Gautami Patil) समर्थन केलं आहे.
Swatantra Veer Savarkar Teaser : रणदीप हुड्डाच्या आगामी बहुचर्चित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त या सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरनंतर प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
The India House: राम चरणनं केली 'द इंडिया हाऊस' या चित्रपटाची घोषणा
The India House: आरआरआर (RRR) या चित्रपटामुळे अभिनेता ता राम चरणला (Ram Charan) भारतातच नाही तर परदेशात देखील विशेष लोकप्रियता मिळाली. राम चरणच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतीच राम चरणनं त्याच्या एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या या चित्रपटाचं नाव 'द इंडिया हाऊस' असं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन राम चरणनं त्याच्या या चित्रपटाची घोषणा केली आहे.
Roadies - Karm YA Kaand: अश्नीर गोव्हरची रोडीजमध्ये एन्ट्री?
Ashneer Grover In Roadies - Karm YA Kaand: गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक रोडीज (Roadies - Karm YA Kaand) या शोची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. नुकताच रोडीजचा (Roadies) एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. रोडीज या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये काही स्पर्धक ऑडिशन देताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) देखील दिसत आहे. त्यामुळे अश्नीर हा रोडीज या शोचे परीक्षण करणार आहे का? की तो केवळ एका एपिसोडसाठी या शोमध्ये असणार आहे? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. रोडीजच्या प्रोमोमध्ये स्पर्धक हे त्यांचे सिलेक्शन होण्यासाठी काही स्टंट परफॉर्म करताना दिसत आहेत. रोडीजचा प्रोमोपाहून असे वाटते की, यावेळी हा शो प्रेक्षकांचे नेहमीपेक्षा जास्त मनोरंजन करणार आहे.
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती-राघव राजस्थानमध्ये अडकणार लग्नबंधनात
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा शाही लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. 13 मे 2023 रोजी दिल्लीत त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आता त्यांच्या लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -