Entertainment News Live Updates 28 May : 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'प्रपोगंडा चित्रपट...'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 28 May 2023 03:37 PM
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती-राघव राजस्थानमध्ये अडकणार लग्नबंधनात; जाणून घ्या जोडप्याच्या वेडिंग वेन्यूबद्दल...

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा शाही लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. 13 मे 2023 रोजी दिल्लीत त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आता त्यांच्या लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 

Salman Khan : सलमानला लग्नाची मागणी घालणारी 'ही' तरुणी कोण? जाणून घ्या Alena Khalifeh बद्दल...

Salman Khan Alena Khalifeh Video Viral : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) मोठा चाहतावर्ग आहे. सलमान एक लोकप्रिय अभिनेता असला तरी आजही तो बॅचलर आहे. सलमानचं लग्न कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान भाईजानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एलीना खलफीह (Alena Khalifeh) सलमानला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. 


वाचा सविस्तर

Siddharth Chandekar: 'जंगली रमीची जाहिरात करून, फॉरेनला फिरायला...' नेटकऱ्याची कमेंट; सिद्धार्थ चांदेकर रिप्लाय देत म्हणाला, 'काय करणार भाऊ...'

Siddharth Chandekar:  मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फॉरेन ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.  सिद्धार्थ  आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांच्या फॉरेन ट्रीपच्या फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. नुकताच सिद्धार्थनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे. त्या नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 



GHKKPM : लोकप्रियतेनंतर आयशा सिंहचा भाव वाढला; 'या' आघाडीच्या अभिनेत्याची मालिका नाकारली

Ghum Hai Kisi Key Pyaar Meiin Ayesha Singh Rejected Arjun Bijlani Show : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आयशा सिंह (Ayesha Singh) सध्या चर्चेत आहे. 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत ती सईच्या भूमिकेत आहे. या मालिकेच्या माध्यमातून आयशाला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेनंतर तिला आता आणखी एका मालिकेसाठी विचारणा झाल्याचं समोर आलं आहे.


वाचा सविस्तर

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा आणि मल्हार येणार समोरासमोर; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो पाहिलात?

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा आणि मल्हार हे समोरासमोर येणार आहेत. 





The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया

The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. अनेकांनी या चित्रपटावर टीका केली तर काही जण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. आता प्रसिद्ध अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. कमल हसन यांनी अबू धाबी येथील मुलाखतीमध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रपोगंडा चित्रपट असल्याचं सांगितलं आहे. 




Kushal Badrike : "महाराजांचं नेतृत्व मनात नाही रक्तात भिनायला हवं"; लहान मुलं आणि पालकांना उद्देशून कुशल बद्रिकेची खास पोस्ट

Kushal Badrike On Raavrambha Movie : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल बद्रिके (Kushal Badrike) घराघरांत पोहोचला आहे. सध्या तो 'रावरंभा' या सिनेमात झळकत आहे. या सिनेमात त्याने कुरबतखानाची भूमिका साकारली आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत असताना कुशलने लहान मुलं आणि पालकांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. 





Kiran Mane On Gautami Patil : "पाटलीण आहेस... रुबाबात नाच"; किरण मानेचा गौतमी पाटीलला जाहीर पाठिंबा

Kiran Mane On Gautami Patil : सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमी आणि वाद हे आता समीकरण झालं आहे. सध्या ती तिच्या आडनावामुळे चर्चेत आहे. तिच्यामुळे पाटील आडनावाची बदनामी होत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान अभिनेता किरण मानेने फेसबुक पोस्ट करत गौतमी पाटीलला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे,"पाटलीण आहेस... रुबाबात नाच". 


IIFA 2023 Winner List : आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर हृतिक रोशन सर्वात्कृष्ट अभिनेता; जाणून घ्या कोणकोण ठरले 'आयफा 2023'च्या पुरस्काराचे मानकरी....

IIFA 2023 Winner List : बॉलिवूडकरांसाठी मानाचा असलेला 'आयफा' पुरस्कार (IIFA 2023) सोहळा नुकताच पार पडला असून या पुरस्कार सोहळ्यात आलियाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. 'आंतरराष्ट्रीय इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' सोहळ्यात (International Indian Film Awards 2023) आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) आणि 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या सिनेमांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. 


वाचा सविस्तर

Shah Rukh Khan On New Parliament : "नवीन संसद भवन, पण भारताच्या गौरवाचं स्वप्न जुनं"; शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan Shared New Parliament Video : नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने संसद भवनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शाहरुखने "नव्या भारतासाठी नवीन संसद भवन. पण भारताच्या गौरवाचे स्वप्न जुनेच", असे म्हटले आहे.


वाचा सविस्तर

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Mrs Asia GB Sonal Kale : मराठी पाऊल पडते पुढे! 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा किताब मराठमोळ्या सोनल काळेच्या नावावर


Mrs Asia GB Sonal Kale : मराठमोळी, मुंबईकर सोनल काळेने (Sonal Kale) 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा (MRS. Asia Great Britain) किताब आपल्या नावावर केला आहे.  ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. सोनलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.


Ashish Vidyarthi : "आता सगळं संपलं"; आशिष विद्यार्थींच्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत


Ashish Vidyarthi First Wife Piloo Vidyarthi Post : लोकप्रिय अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे नवा संसार थाटण्यासाठी आशिष सज्ज आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पहिल्या पत्नीने राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीने (Piloo Vidyarthi) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सर्व काही संपलं असं म्हणत ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचं या पोस्टमधून कळतं आहे. आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाचं त्यांच्या पहिल्या पत्नीला खूप वाईट वाटत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलं आहे,"तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे का? असा प्रश्न एक चांगला व्यक्ती तुम्हाला विचारणार नाही. तो असा प्रश्न तेव्हाच उपस्थित करेल जेव्हा त्याला माहित असेल की तो तुम्हाला त्रास देईल. हे लक्षात ठेवा". 


Gautami Patil : ज्या कामामुळे तिचं संपूर्ण देशात नाव झालं ते नाव तिने का म्हणून बदलावं? गौतमी पाटीलच्या गावकऱ्यांचा सवाल


Gautami Patil : वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या गौतमी पाटीलवरून (Gautami Patil) आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. आतापर्यंत तिने सादर केलेल्या नृत्यांवर आक्षेप घेतला जायचा. मात्र आता तिच्या आडनावावरुन वाद निर्माण झाला आहे.  गौतमी पाटीलने पाटील आडनाव लावू नये, यासाठी अनेकांनी तीला विरोध केला आहे. गौतमी पाटील ही मराठा समाजाचे नाव खराब करत असल्याचं एका संघटनेचं म्हणणं असून तिने पाटील आडनाव काढावं, अशी धमकी तिला संघटनेकडून देण्यात आली आहे. कला ही कला असते आणि गौतमी पाटील येणे संगीत क्षेत्रातील तिची कला जोपासली आहे. तिच्या कलेचा आणि समाजाचा कुठलाही संबंध नाही. गौतमी पाटील हे नाव संपूर्ण देशभरात गाजत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं धुळे जिल्ह्यातील सिंदखेड गावातील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.