Entertainment News Live Updates 28 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 28 Mar 2023 07:52 PM
Avatar 2 OTT Release : 'अवतार द वे ऑफ वॉटर' ओटीटीवर रिलीज

Avatar The Way Of Water OTT Release : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला. गेल्या काही दिवसांपासून अवतारचे चाहते हा सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार याची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. 





Movie Release This Week : अजयचा 'भोला' ते नानीचा 'दसरा'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी


Movie Release This Week : सिनेरसिक चांगल्या सिनेमांची नेहमीच प्रतीक्षा करत असतात. येत्या शुक्रवारी अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात प्रेक्षकांना थरार, नाट्य, बायोपिक, अॅक्शन, भयपट अशा अनेक प्रकारचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. तर अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 

Akanksha Dubey : भोजपुरी गायक समर सिंहविरोधात गुन्हा दाखल

Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने (Akanksha Dubey) वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता याप्रकरणी भोजपुरी गायक आणि आकांक्षाचा खास मित्र समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाराणसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आकांक्षाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने समर सिंह आणि संजय सिंहविरोधात तक्रार दाखल केली आहे". 

Priyanka Chopra : 'मला वाळीत टाकलं...'; प्रियांकानं शेअर केले बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये जातानाचे अनुभव

Priyanka Chopra On Working In Hollywood : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राची  (Priyanka Chopra) लोकप्रियता जगभरात आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे. हॉलिवूडमध्येदेखील तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नुकतचं एका मुलाखतीत तिने बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये काम करत असताना आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं आहे. 

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ

Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. ओटीटी विश्वातदेखील तिने आपला दबदबा कायम ठेवला आहे. सिनेमांमुळे चर्चेत असलेली तापसी अनेकदा वादाच्या भोवऱ्यातदेखील अडकते. आता पुन्हा एकदा तापसी पन्नू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 





Shah Rukh Khan News Car: पठाणच्या यशानंतर शाहरुखनं घेतली आलिशान कार; किंमत माहितीये?

Shah Rukh Khan News Car:   बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा 'बादशाह' या नावानं ओळखला जातो. त्याचा पठाण हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. 2023 या वर्षाची सुरुवात पठाण या चित्रपटानं दणक्यात केली. आता शाहरुखनं नुकतीच एक लग्झरी कार विकत घेतली आहे. 

Akash Thosar: 'सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...'; आकाश ठोसरच्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष

Akash Thosar: अभिनेता आकाश ठोसरला (Akash Thosar) 'सैराट' या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. आकाशचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच तो  'घर बंदूक बिरयानी' ' (Ghar Banduk Biryani)  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता नुकताच आकाशनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तो अभिनेत्री सायली पाटीलसोबत (Sayli Patil) दिसत आहे. आकाश आणि सायलीनं लग्न केलं आहे का? असा प्रश्न हा फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला होता. पण असं नसून हा फोटो 'घर बंदूक बिरयानी  चित्रपटाच्या सेटवरील आहे. 



MM Keeravani COVID Positive: नाटू नाटू गाण्याचे संगीतकार M. M. Keeravani यांना कोरोनाची लागण; डॉक्टरांकडून बेड रेस्टचा सल्ला

MM Keeravani COVID Positive: प्रसिद्ध  संगीतकार एमएम किरवाणी (MM Keeravani)  यांना कोरोनाची लागण झाली आहे. एमएम किरवाणी यांना बेड रेस्ट घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. एका मुलाखतीमध्ये एमएम किरवाणी यांनी  मुलाखतीमध्ये त्यांच्या हेल्थची अपडेट चाहत्यांना दिली. ही मुलखत किरवाणी यांनी ऑनलाईन दिली. 








 






 











Netflix Gets Legal Notice: शोमध्ये माधुरी दीक्षितबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप, नेटफ्लिक्सला नोटीस

Netflix Gets Legal Notice: बिग बँग थिअरी (Big Bang Theory) या प्रसिद्ध शोमधील एका एपिसोडमध्ये माधुरी दीक्षितबाबत (Madhuri Dixit) आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार (Mithun Vijay Kumar) यांनी केला आहे. या प्रकरणी मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला (Netflix) नोटीस पाठवली आहे. ही नोटीस पाठवून  मिथुन विजय कुमार यांनी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरुन या शोमधील एक एपिसोड हटवण्याची मागणी केली आहे.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'घर बंदूक बिरयानी' चित्रपटाचा साऊथवाले रिमेक करतील: सयाजी शिंदे


Ghar banduk biryani: घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज टीम नागराज पंढरपुरात आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हलग्याच्या कडकडाटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील यांचे आगमन झाले. यावेळी चित्रपटाची सर्व टीम त्यांच्या सोबत होती. पंढरपुरात येताना पहिल्यांदा विठुरायाचे दर्शन घेऊन टीम नागराज प्रमोशनस्थळी आली. यावेळी पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी या टीमचे स्वागत केले. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी दाखवल्यानंतर नागराज आणि त्यांच्या टीमने प्रेक्षकांशी संवाद साधला. फक्त रडूनच डोळ्यातून पाणी येतं, असं नाही. हे हा चित्रपट पाहून लक्षात येईल, असे सांगत आता साऊथ वाले देखील घर बंदूक बिरयानी या मराठी चित्रपटाचा रिमेक करतील, असा दावा सयाजी शिंदे यांनी केला. 


Kiran Mane : सिनेमा प्रसिद्धी देतो, मालिका पैसे देतात, पण...; किरण मानेची पोस्ट चर्चेत


Kiran Mane On World Theatre Day : आज जगभरात जागतिक रंगभूमी दिन (World Theatre Day) साजरा केला जात आहे. रंगकर्मींसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. आज दिवसभर हिंदी सिनेसृष्टीसह मराठी कलाकारांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता किरण मानेनेदेखील (Kiran Mane) 'सिनेमा प्रसिद्धी देतो, मालिका पैसे देतात', असं म्हणत एक खास पोस्ट शेअर केली आहे. 









World Theatre Day 2023: 10 रुपयाचे पॉपकॉर्न थिएटरमध्ये 200 ते 500 रुपयाला का विकतात? जाणून घ्या त्यामागचं कारण








मुंबई : राज्यातील थिएटरमध्ये महाग किमतीत मिळणाऱ्या पॉपकॉर्नवरुन मनसेने आंदोलन केलं होतं. गेल्या जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या भेटीत अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी सिनेमागृहात उपलब्ध पॉपकॉर्नची किंमत कमी करण्याचे आवाहन केले होते. बाहेर 10 रुपयात मिळणारे पॉपकॉर्न थिएटरमध्ये 200 ते 500 रुपयांना विकले जातात. कधीकधी पॉपकॉर्नची किंमत चित्रपटाच्या तिकिटापेक्षा दुप्पट होते. अशा स्थितीत हा प्रश्न नेहमी मनात राहतो की पॉपकॉर्न इतकं महाग का विकलं जातंय आणि त्यावर काही कायदेशीर बंधन आहे की नाही?






























 






 























- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.