Entertainment News Live Updates 28 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Kangana Ranaut On Bollywood : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) ट्विटरवर परतली असून 'पठाण' सिनेमासंदर्भात सलग ट्वीट करत आहे. आता कंगनाने ट्वीट करत बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे.
Neena Gupta Daughter Masaba Gupta Wedding Photos : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांची लेक मसाबा गुप्ता (Masaba Gupta) नुकतीच अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Mishra) लग्नबंधनात अडकली आहे. मसाबाच्या लग्नसोहळ्यातील एक फॅमिली फोटो नीना गुप्ता यांनी शेअर केला आहे. या फोटोने मात्र सर्वांचच लक्ष वेधलं आहे.
Shah Rukh Khan Pathan Worldwide Box Office Day 3 : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) हा सिनेमा जगभरात चर्चेत आहे. रिलीजच्या तीन दिवसांत हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. शाहरुखचे चाहते गेल्या चार वर्षांपासून त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता 'पठाण'च्या (Pathaan) माध्यमातून शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं असून लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत.
Suman Kalyanpur : ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचा आज वाढदिवस आहे. सुमन यांचा यंदाचा वाढदिवस खास असणार आहे. मराठी संगीतक्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या सुमन यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमन (Suman Kalyanpur Birthday) यांनी मराठीसह, गुजराती, बंगाली आणि पंजाबी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
Suman Kalyanpur : तलत महमूद यांनी गाणं ऐकलं अन् सुमन कल्याणपूर यांचा संगीतप्रवास सुरू झाला... या मराठी गाण्यांनी केलं रसिकमनावर राज्य
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' मालिकेत नवा ट्वीस्ट; प्रदीप वेलणकर दिसणार तात्यांच्या भूमिकेत
Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतीया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत नवा ट्वीस्ट येणार आहे. या मालिकेत प्रदीप वेलणकर (Pradeep Velankar) तात्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
The Vaccine War : 'द वॅक्सीन वॉर'मध्ये झळकणार नाना पाटेकर; विवेक अग्निहोत्रींनी पोस्ट शेअर करत दिली माहिती
The Vaccine War : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात मुख्य भूमिकेत कोणते कलाकार झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर विवेक अग्निहोत्री यांनी एक खास पोस्ट शेअर करत या सिनेमात नाना पाटेकर (Nana Patekar) मुख्य भूमिकेत असणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
KL Rahul Athiya Shetty : सुख...असं कॅप्शन देत केएल राहुलनं शेअर केले हळदीचे फोटो, सासरेबुवांनीही केली कमेंट
KL Rahul Athiya Haldi Ceremony : बरेच दिवस चर्चा असणाऱ्या क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवासोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. अथियाचे वडिल सुनील शेट्टी यांच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघेही लग्नबंधनात अडकले. दरम्यान विवाहसोहळ्याचे फोटो त्याच दिवशी समोर आल्यानंतर आता हळदी समारंभाचे फोटोही समोर आले आहेत. स्वत: केएल राहुल याने एक खास इन्स्टाग्राम पोस्ट करत दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला त्यानं देवनागरी लिपीत 'सुख' असं कॅप्शन दिलं आहे...
Mahendra Singh Dhoni : सिनेमाच्या मैदानात एमएस धोनीची एन्ट्री, पहिल्याच चित्रपटाची केली घोषणा, जाणून घ्या सर्वकाही...
Mahendra Singh Dhoni First Film : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. निर्माता म्हणून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'धोनी एन्टरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड'च्या बॅनरखाली त्याने आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमाची घोषणा केली आहे. 'एलजीएम : लेट्स गेट मॅरिड' (Lets Get Married) असं या सिनेमाचं नाव आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -