Entertainment News Live Updates 27 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 27 Oct 2022 03:07 PM
Kantara : चित्रपट पाहताना अंगावर शहारे आले’; ‘थलायवा’ रजनीकांतकडून ‘कांतारा’चं कौतुक!

साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी नुकतेच ‘कांतारा’ (kantara) चित्रपटाचे कौतुक केले आहे. रजनीकांत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या चित्रपटाचे मुख्य अभिनेते आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. रजनीकांत यांनी ‘कांतारा’ चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट उदाहरण म्हटले आहे. ‘कांतारा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. नुकताच ‘कांतारा’ हा IMDb वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा भारतीय चित्रपट बनला आहे.


 





Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ओंकार भोजनेची एक्झिट! कारण ऐकलंत का?

अभिनेता ओंकार भोजने आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून बाहेर पडणार असून, ‘फू बाई फू’च्या नव्या पर्वात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ओंकारचे चाहते देखील त्याला ‘फू बाई फू’च्या नव्या पर्वात पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. ओंकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून बाहेर पडणार असल्याची माहिती एक सोशल मीडिया पेजवरून देण्यात आली आहे. मात्र, यावर अद्याप अभिनेता किंवा वाहिनीने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.


 





Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसणार वेड्या बहीणींची वेडी माया! स्पर्धक साजरा करणार भाऊबीज सण

Bigg Boss Marathi 4:  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सर्व सदस्य दिवाळी साजरी करणार आहेत. 



 

Shivali Parab : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा बोल्ड अंदाज; ‘काय उमगेना’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

सिंधुदुर्गातील गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा मांडणाऱ्या ‘प्रेमप्रथा धुमशान’ (Prem Pratha Dhumshaan) या चित्रपटात अभिनेत्री शिवाली परबचा (Shivali Parab) बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. चित्रपटातलं ‘काय उमगेना’ हे नवं गाणं लाँच करण्यात आलं असून, 4 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार आहे. या गाण्यात शिवालीनं लीपलॉकिंग सीन्समधून आपला बोल्डनेस दाखवला आहे.


 


Taapsee Pannu : 'असं करु नका'; फोटोग्राफर्सवर पुन्हा संतापली तापसी

Taapsee Pannu : तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तापसी ही वेगवेगळ्या विषयांवर तिचं मत मांडत असते. तापसी ही लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला भन्नाट आणि मजेशीर पद्धतीनं उत्तर देते. अनेक वेळा तापसी फोटोग्राफर्सला खडे बोल सुनावते.  आता पुन्हा तापसी फोटोग्राफर्सवर भडकली आहे. नुकताच तापसीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की तापसी ही फोटोग्राफर्सवर ओरडत आहे. 



Gulshan Grover: बॉलिवूड अभिनेते माझीच कॉपी करतात; अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांचं वक्तव्य चर्चेत!

Gulshan Grover:  बॉलिवूडमधील  प्रसिद्ध अभिनेता  गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गुलशन यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. गुलशन ग्रोव्हर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि सैफ अली खान (saif ali khan) हे खलनायकाची  भूमिका साकारण्यापूर्वी त्यांचे लूक कॉपी करतात आणि त्यांचे चित्रपट बघतात. याशिवाय गुलशन म्हणाले की, त्याचे जवळचे मित्र जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्यामुळे काही प्रोजेक्ट्स त्याच्याकडून काढून घेण्यात आले.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sai Tamhankar: 'उडे जब जब जुल्फें तेरी...'; मराठमोळ्या लूकमध्ये सई दिसते झकास

Sai Tamhankar:  मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग मोठा आहे.नुकतेच सईनं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गुलाबी साडी, गळ्यात सोनेरी रंगाची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो सईनं शेअर केले आहेत. 





PHOTO : ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने जोनास कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी; चाहत्यांना दाखवली लेक मालतीची झलक!

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून एका सुंदर मुलीचे पालक झाले आहेत. यावेळी मुलगी मालतीसोबत त्यांची पहिलीच दिवाळी होती. यंदा या जोडप्याने लॉस एंजेलिसमधील आपल्या घरी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आणि पारंपरिक पद्धतीने पूजा केली. ज्याचे सुंदर फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर भारतात राहात नसली, तरी प्रत्येक सण ती मोठ्या उत्साहात साजरा करते. निक जोनास देखील भारतीय रितीरिवाजानुसार सण साजरे करताना दिसत आहे. दिवाळीतही प्रियांका चोप्रा आणि निक जोनास विधीपूर्वक पूजा करताना दिसले.


 





Ram Setu Box Office Collection: अक्षयच्या 'राम सेतू'वरही प्रेक्षक नाराज? कमाईतही मोठी घसरण; पाहा दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन

Ram Setu Box Office Collection:  पहिल्या दिवशी राम सेतू (Ram Setu)  या चित्रपटानं 15 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. हा चित्रपट जवळपास 3000 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. काही चित्रपट समीक्षकांनी आणि अक्षयच्या चाहत्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. बॉक्स ऑफिसवर राम सेतूची सुरुवात संथ झाली.  दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाच्या तुलनेत राम सेतूच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 25-30 टक्क्यांनी घट झाली आहे. या चित्रपटानं  दुसऱ्या दिवशी जवळपास 11 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांमध्ये राम सेतू या चित्रपटानं 26 कोटींची कमाई केली आहे. 

बॉक्स ऑफिसवरही दुमदुमला ‘हर हर महादेव’चा घोष! पहिल्याच दिवशी चित्रपटाने जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

‘हर हर महादेव’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 2.25 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. निर्मात्यांनी स्वतः ही चांगली बातमी चाहत्यांसोबत शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘स्वराज्याच्या सुवर्णगाथेला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद’, असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.


 





Kantara: '18 वर्षांची मेहनत.. एक रात्रीत काहीच घडलं नाही!'; 'कांतारा'च्या यशावर ऋषभ शेट्टीने व्यक्त केल्या भावना!

Kantara: सध्या 'कांतारा' (Kantara)  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं बॉक्स  ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. आता कांतारा चित्रपटाला मिळालेल्या यशाबाबत अभिनेता ऋषभ शेट्टीनं प्रतिक्रिया दिली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Photo : काय तो नखरा अन् काय त्या अदा.. कृती खरबंदाच्या साडी लूकवर नेटकरी फिदा!

अभिनेत्री कृती खरबंदा हिने दिवाळीचं निमित्त साधत तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कृतीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. कृतीचे सौंदर्य पाहून चाहतेदेखील घायाळ झाले आहेत. कृतीच्या अंदावर नेटकरी फिदा झाले आहेत.


 





कारने धडक देऊन पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न, चित्रपट निर्मात्या विरोधात गुन्हा दाखल!

पत्नीला कारने धडक देऊन, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा (Kamal Kishore Mishra) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोली पोलिसांनी चित्रपट निर्मात्याविरुद्ध भादंवि कलम 279 आणि 338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत त्यांच्या पत्नीच्या डोक्याला मार लागला असून, त्या गंभीर जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कमल किशोर मिश्रा यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी निर्मात्या  विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  


 


Salman Khan: भाऊबीजेच्या शुभेच्छा देत सलमाननं शेअर केला शर्टलेस फोटो; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Salman Khan: बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. काल देशभरात भाऊबीजेचा सण साजरा करण्यात आला. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या चाहत्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. नुकताच बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या अभिनेता  सलमान खाननं (Salman Khan)  सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.   


Alia Bhatt : प्रेग्नंट असल्यामुळे आलिया भट्ट दिवाळी साजरी करत नाही? फोटो शेअर करत केला खुलासा 


मुंबई: आलिया आणि रणबीरसाठी यंदाची दिवाळी विशेष आहे, खासकरून आलिया भट्ट साठी. कारण या वर्षी बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकले नाहीत, पण आलिया भट्टचा गंगूबाई कठियावाड़ी (Gangubai Kathiawadi) आणि ब्रह्मास्त्र (Brahmāstra) या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर जादू केली. तसेच पहिल्यांदाच आलियाने रणबीरसोबत ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रित काम केलं. आलिया आणि रणबीरसाठी यंदाचं वर्ष आणखी एका कारणासाठी स्पेशल आहे. ते म्हणजे त्यांच्या घरी आता लहान पाहुण्याचं आगमन होणार आहे. म्हणूनच आलिया यंदाची दिवाळी दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात साजरी करू शकत नाही. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. 


Mili : '20 दिवस उणे 15 डीग्री फ्रीजरमध्ये...' जान्हवी कपूरसाठी 'मिली'ची भूमिका किती कठीण होती?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 15 ऑक्टोबरला मिलीचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये जान्हवीची व्यक्तिरेखा पाहून सगळेच थक्क झाले. जान्हवी कपूरचा 'मिली' हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. दरम्यान, ही भूमिका किती कठीण होती हे जान्हवी कपूरने सांगितलं आहे. 


ब्रह्मास्त्र या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार 


 OTT अॅप डिस्ने प्लस हॉटस्टारनच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला आहे. यासोबतच या पोस्टमध्ये ब्रह्मास्त्रच्या ओटीटी रिलीज डेटचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील महिन्यात 4 नोव्हेंबर रोजी ब्रह्मास्त्र OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. ब्रह्मास्त्रचा चित्रपट निर्माता करण जोहरनेही हीच पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. आणि म्हटले आहे की, मोठ्या पडद्यापासून तुमच्या हृदयापर्यंत आणि आता तुमच्या पडद्यावर या वर्षातील सर्वात हिट हिंदी चित्रपट ब्रह्मास्त्र ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. ब्रह्मास्त्रच्या ओटीटी रिलीजच्या घोषणेने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.